coronavirus: शासकीय हलगर्जीपणामुळे पत्रकार रायकर यांचा मृत्यू, पुण्यातील जम्बो हॉस्पिटलचा फोलपणा उघड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2020 05:23 AM2020-09-03T05:23:19+5:302020-09-03T05:24:01+5:30

मुळचे नगर जिल्ह्यातील रहिवासी असलेले रायकर पत्रकारितेनिमित्ताने पुण्यात स्थायिक झाले होते. पार्थिवावर दुपारी पुण्यातच अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, मुलगी आणि आई-वडील असा परिवार आहे.

coronavirus: Journalist Raikar dies due to government negligence, emptiness of Pune Jumbo Hospital revealed | coronavirus: शासकीय हलगर्जीपणामुळे पत्रकार रायकर यांचा मृत्यू, पुण्यातील जम्बो हॉस्पिटलचा फोलपणा उघड

coronavirus: शासकीय हलगर्जीपणामुळे पत्रकार रायकर यांचा मृत्यू, पुण्यातील जम्बो हॉस्पिटलचा फोलपणा उघड

Next

पुणे : कोट्यवधी रूपये खर्च करून, मोठा गाजा-वाजा करीत कोविड-१९ च्या रूग्णांसाठी उभारण्यात आलेल्या जम्बो हॉस्पिटलचा फोलपणा बुधवारी उघड झाला. अ‍ॅम्ब्युलन्सची अनुप्लब्धता, व्हेंटिलेटर-आॅक्सिजन खाटांच्या नियोजनातील ढिसाळपणा आणि मुर्दाड यंत्रणेचा फटका बसल्याने खासगी वृत्तवाहिनीचे पत्रकार पांडुरंग रायकर यांचा ४२ व्या वर्षी हकनाक बळी गेला.

मुळचे नगर जिल्ह्यातील रहिवासी असलेले रायकर पत्रकारितेनिमित्ताने पुण्यात स्थायिक झाले होते. पार्थिवावर दुपारी पुण्यातच अंत्यसंस्कार करण्यात
आले. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, मुलगी आणि आई-वडील असा परिवार आहे.

रायकर यांना ३१ आॅगस्टला रात्री सीईओपीच्या मैदानावरील कोविड-१९ जम्बो हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते.उपचारादरम्यान त्यांनी इतर पत्रकारांना केलेले मेसेज हे अतिशय धक्कादायक होते. मंगळवारी रात्री दीड वाजता ‘मला खूप वाईट वाटतंय’, मला जेवायला द्या, औषध द्या,’ असे संदेश त्यांनी पाठवले होते./'

‘‘त्यांची स्थिती खूपच खालावल्यानंतर त्यांना खासगी रुग्णालयात हलवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यावेळी अनेक सरकारी अधिकारी-पदाधिकाऱ्यांना फोन केल्यानंतरही एक कार्डियाक अ‍ॅम्ब्युलन्स उपलब्ध होऊ शकली नाही. हा बळी प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराचा आणि असंवेदनशिलतेचा आहे,’’ असा आरोप पुणे श्रमिक पत्रकार संघाने केला आहे.

चौकशीसाठी समिती
‘‘पांडुरंग रायकर यांच्या ट्रीटमेंट प्रोटोकॉलमध्ये काही कमतरता होती किंवा कसे या करिता चौकशी करण्यासाठी ससून रुग्णालयाच्या अधिष्ठाता यांना विनंती करण्यात आली आाहे,’’ असे पुणे महापालिकेचे आयुक्त विक्रम कुमार यांनी स्पष्ट केले. महापौर मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले, की जम्बो हॉस्पिटल सज्ज नसतानाही त्याचे उद्घाटन करण्यात आले. यंत्रणेअभावी रायकर यांचा मृत्यू झाला.

Web Title: coronavirus: Journalist Raikar dies due to government negligence, emptiness of Pune Jumbo Hospital revealed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.