शहरं
Join us  
Trending Stories
1
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
2
आजचे राशीभविष्य - ४ मे २०२४; आज आपणास खूप मोठा आर्थिक लाभ होईल
3
जादूटोण्याच्या संशयातून दोघांना जिवंत जाळले; घरात मृत्युसत्र, १५ जणांना अटक
4
मुंबईत मराठी टक्का कोणाच्या फायद्याचा? मराठी मते आपल्याच झोळीत पाडून घेण्यासाठी घमासान रंगणार
5
सरकारने सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील केले; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
6
ॲड. उज्ज्वल निकम २८ कोटींचे मालक; एक कार, अंधेरी, जळगाव आणि दहिसर येथे घरे
7
आता ‘त्या’ महिलेच्या अपहरणाचाही गुन्हा दाखल; पाच दिवसांपासून बेपत्ता असल्याची तक्रार दाखल
8
रवींद्र वायकर यांच्या मालमत्तेत ६ कोटींनी वाढ; २०१९ मध्ये १० कोटी १९ लाखांची संपत्ती
9
या निवडणुकीतला पहिला हेलिकॉप्टर अपघात; महाड येथील दुर्घटना, पायलट किरकोळ जखमी
10
नरेश म्हस्के यांच्याकडे २६ कोटींची संपत्ती; तीन कार, ३ कोटी ६२ लाखांचे कर्ज
11
हैदराबादमध्ये अमित शाह यांच्याविरोधात गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
12
IPL 2024 MI vs KKR: Mumbai Indians ने घरच्या मैदानावर लाज आणली! १२ वर्षांनी कोलकाताचा वानखेडेवर दमदार विजय
13
किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले
14
"काय बोलावं सुचत नाहीये, काही प्रश्न..."; Mumbai Indians च्या लाजिरवाण्या पराभवानंतर Hardik Pandya काय म्हणाला, वाचा
15
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
16
T20 World Cup 2024 मध्ये Virat Kohli ने ओपनिंग करावी, Rohit Sharma ने 'या' नंबरवर खेळावं; माजी भारतीय कर्णधाराचा अजब सल्ला
17
कोथळे खून खटल्यात आता कोणाची नियुक्ती? उज्वल निकम यांचा राजीनामा; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
18
IPL2024 MI vs KKR: नुसते आले नि गेले... रोहित, इशान, तिलक, हार्दिक स्वस्तात बाद; Mumbai Indians चा डाव गडगडला! 
19
Andre Russell Run Out, IPL 2024 MI vs KKR: नुसता गोंधळ! व्यंकटेश धावलाच नाही, रसेल मात्र कुठच्या कुठे पोहोचला अन् मग... (Video)
20
अमित शाह फेक व्हिडिओप्रकरणी दिल्ली पोलिसांची कारवाई; काँग्रेस नेते अरुण रेड्डींना अटक

दौंडमध्ये कोरोनाचा पहिला बळी; सत्तर वर्षीय रुग्णाचा मृत्यू, शहरातील बाधितांची संख्या २०

By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2020 4:51 PM

शहरातील एका नव्वद वर्षाच्या वयोवृध्द महिलेला कोरोना झाल्याचे स्पष्ट

ठळक मुद्देदौंड शहरातील कोरोना रुग्णांची संख्या ३२ पर्यंत गेली होती. मात्र, उपचारादरम्यान काही निगेटिव्ह

दौंंड : दौंड शहरातील एका सत्तर वर्षाच्या कोरोना संसर्ग असलेल्या रुग्णाचा पहाटेच्या सुमारास पुणे येथील एका खासगी रुग्णालयात मृत्यू झाला असल्याची माहिती उपजिल्हा ग्रामीण रुग्णालयाचे अधिक्षक डॉ. संग्राम डांगे यांनी दिली. या ज्येष्ठ रुग्णाचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला होता. या रुग्णास तातडीने पुणे येथे उपचारासाठी पाठविण्यात आले होते. मात्र, उपचार सुरु असताना मंगळवारी या ज्येष्ठ व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. तसेच शहरातील एका नव्वद वर्षाच्या वयोवृध्द महिलेला कोरोना झाला असल्याचे डांगे यांनी स्पष्ट केले.दौडं शहरात चार कोरोना बाधित रुग्ण आढळले होते. त्यापैकी यातील एका ज्येष्ठ व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दरम्यान शहरात आज नव्याने एका वृध्द महिलेचा आरोग्य चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याने सध्य परिस्थितीत शहरात तीन कोरोनाचे रुग्ण आहे. तसेच राज्य राखीव पोलीस बल गट क्र. ७ चे  दोन जवान,आणि दौंडला वास्तव्यास असलेल्या भारतीय रिझर्व्ह बटालीयन  गट क्र.१६ चे  पंधरा जवान अशी शहरातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या २० झाली असून या सर्व रुग्णांवर उपचार सुरु आहे. दौंड शहरातील कोरोना संसर्ग रुग्णांची संख्या ३२ पर्यंत गेली होती. मात्र, यातील काही रुग्ण उपचारा दरम्यान निगेटिव्ह झाल्याने कोरोना रुग्णाची संख्या घटली आहे.................................................पहिला रुग्ण निगेटिव्ह  दौंड शहरात एक ८२ वर्षाच्या व्यक्तीला कोरोना झाला होता. ही ज्येष्ठ व्यक्ती शहरातील पहिला कोरोना रुग्ण होता. या रुग्णाला उपचारासाठी पुणे येथे पाठविले असता त्या व्यक्तीचा वैद्यकीय चाचणी अहवाल निगेटिव्ह आला असून त्यांची प्रकृती ठणठणीत असल्याचे डॉ संग्राम डांगे यांनी सांगितले.

टॅग्स :daund-acदौंडCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसDeathमृत्यू