शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
3
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
4
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
5
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
6
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
7
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
8
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
9
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
10
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
11
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
12
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
13
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
14
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
15
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
16
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
17
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
18
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
19
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
20
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?

कोरोनाचा संदर्भात नवा खुलासा! फुफ्फुसात सहज राहू शकतात किमान पाच ते दहा हजार विषाणू

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2021 18:30 IST

कोरोना विषाणूचे वजन केवळ १०० ते १५० नॅनोमीटर

ठळक मुद्देडॉ. नानासाहेब थोरात : अमेरिकेच्या नॅशनल अँकेडमी ऑफ सायन्सच्या जर्नलमध्ये संशोधन प्रसिद्ध

प्रज्ञा केळकर-सिंग

पुणे : कोरोना विषाणूपेक्षा फुफ्फुसातील पेशी हजारो पटींनी मोठ्या असतात. फुफ्फुसातील पेशीत किमान पाच ते दहा हजार कोरोना विषाणू सहज राहू शकतात. एवढ्या छोट्या कोरोना व्हायरसचे वजन शोधण्याचा इस्राईल आणि अमेरिकेतील शास्त्रज्ञांनी प्रयत्न केला. इस्राईलमधील वेईझमँन इन्स्टिटयूट ऑफ सायन्स आणि अमेरिकेतील कॅलिफोर्निया इन्स्टिटयूट ऑफ टेक्नॉलॉजीमधील शास्त्रज्ञांनी विषाणूच्या वजनाचे अनुमान काढले आहे. अमेरिकेच्या नॅशनल अँकेडमी ऑफ सायन्सच्या जर्नलमध्ये ते प्रसिद्ध झाले आहे. त्यानुसार कोरोना विषाणू १०० ते १५० नॅनोमीटर एवढया लहान आकाराचा असतो, अशी माहिती इंग्लडमधील ऑक्सफर्ड विद्यापीठातील वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. नानासाहेब थोरात यांनी दिली.

डॉ. थोरात म्हणाले, 'कोरोना उघड्या डोळ्यांनी दिसत नाही. त्यासाठी किचकट तंत्रज्ञान वापरून तयार केलेला सूक्ष्मदर्शक वापरावा लागतो. त्याची किंमत अंदाजे दहा कोटीपेक्षा अधिक आहे आणि तो ठेवण्यासाठी दोन कोटीची एक रूम तयार करावी लागते. अमेरिका चीन, जपान आणि युरोपियन देशांमध्ये काही सूक्ष्मदर्शक आहेत. यामधून १०० ते १५० नॅनोमीटर एवढ्या लहान आकाराचा कोरोना व्हायरस पाहू शकतो. शास्त्रज्ञांच्या अनुमानानुसार एका व्यक्तीला सुरुवातीला संसर्ग होतो तेव्हा त्याच्या शरीरात शंभर कोटीच्या आसपास व्हायरस असतात. संसर्ग खूपच वाढला तर व्हायरसचे प्रमाण एक हजार ते दहा हजार कोटीपर्यंत जाते. एका व्यक्तीत दहा हजार कोटी एवढे व्हायरसचे प्रमाण धरले तर त्या सर्वांचे वजन भरते. फक्त शंभर मायक्रोग्रॅम म्हणजेच एका मिलिग्रॅम पेक्षा दहा पटीने कमी म्हणजेच जगभरातील सध्याच्या संसर्गग्रस्त व्यक्तींमध्ये मिळून व्हायरसचे वजन जास्तीत जास्त फक्त १० किलोग्रॅम एवढेच भरेल.'    

जेव्हा कोरोनाचा संसर्ग फुफुसांमध्ये पसरतो तेव्हा तो रोखणे अवघड 

शास्त्रज्ञांच्या प्रयोगशाळेतील प्रयोगातून तयार केलेल्या मॉडेलनुसार फुफ्फुसामधील जास्तीत जास्त एक कोटी पेशींना कोरोना व्हायरसचा संसर्ग होतो. आपल्या शरीरात एकूण ३ ट्रिलियन पेशी असतात. सुरवातीच्या संसर्गामध्ये फक्त दहा व्हायरस एका पेशीमध्ये प्रवेश करतात आणि सुरवातीला या पेशींची संख्या फक्त दहा हजार असते. कोव्हीडच्या अत्युच्य पातळीवर संख्या वाढून व्हायरस एक कोटी पेशींना संसर्गित करतात आणि त्यावेळी एका पेशीमध्ये सरासरी एक हजार ते दहा हजार व्हायरस वाढलेले असतात. व्हायरसने शरीरात प्रवेश केल्यावर आपली प्रतिकारशक्ती त्याला ओळखते आणि त्याला बाहेर काढण्यासाठी अँटीबॉडीज तयार करते. अँटीबॉडीज तयार होण्याचे प्रमाण रक्तामध्ये अधिक असते तर फुफ्फुसामध्ये फारच कमी असते. त्यामुळेच जेव्हा कोरोनाचा संसर्ग फुफ्फुसांमध्ये पसरतो तेव्हा तो रोखणे अवघड होते. एका व्हायरसवर एक हजारापेक्षा अधिक अँटीबॉडीज चिकटलेल्या असतात. दहा व्हायरसवर शंभर अँटीबॉडीज जाऊन चिकटल्या तरी व्हायरसची संख्या वाढतच जाते. दहा हजारापासून दहा कोटी पेशींना संसर्ग करून व्हायरस स्वतःची संख्या शंभर कोटीपेक्षा अधिक करतो, तेव्हासुद्धा त्याचे वजन फक्त काही मायक्रोग्रॅम असते. असेही त्यांनी सांगितले आहे. 

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडcorona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसMaharashtraमहाराष्ट्र