शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
2
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
3
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
4
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
5
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
6
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
7
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
8
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
9
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
10
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
11
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
12
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
13
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
14
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
15
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
16
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
17
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
18
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
19
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
20
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय

Corona Virus : चिंताजनक! पुण्यात कोरोनाचा धोका वाढला; बुधवारी तब्बल ७४३ नवीन कोरोनाबाधितांची भर 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2021 5:16 PM

पुन्हा एकदा आता काळजी घेण्याची वेळ आली आहे.

पुणे : गेल्या काही दिवसांपासून पुणे शहरातील कोरोना पुन्हा डोके वर काढू लागला आहे. त्यामुळे पुणेकरांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. मंगळवारी ६६१ कोरोनाबाधित आढळल्यानंतर बुधवारी ही संख्या तब्बल ७४३ वर पोहचली आहे. आजची कोरोनारुग्णांची संख्या काही महिन्यांमधील सर्वाधिक वाढ आहे. 

पुणे : शहरात कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढतच चालला असून, बुधवारी तब्बल ७४३ नवे कोरोनाबाधित आढळून आले आहेत. गेल्या पाच महिन्यातील ही सर्वाधिक रूग्णवाढ आहे़. दुसरीकडे संशयितांच्या तपासणीचे प्रमाणही शहरात मोठ्या प्रमाणात वाढले असून, आज दिवसभरात ६ हजार ५१४ जणांची तपासणी करण्यात आली़ तपासणीच्या तुलनेत आजच्या रूग्णांची टक्केवारी ११. ४० टक्के इतकी आहे. 

पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सायंकाळी साडेपाचवाजेपर्यंत शहरातील विविध रूग्णालयांत ऑक्सिजनसह उपचार घेणाºया कोरोनाबाधितांची संख्या ४१० इतकी असून, शहरातील गंभीर रूग्णसंख्या ही २०७ इतकी आहे. तर आज दिवसभरात ३८२ कोरोनाबाधित कोरोनामुक्त झाले असून, शहरातील सक्रिय रूग्ण संख्या ही ३ हजार ५५९ इतकी झाली आहे. शहरात आजपर्यंत ११ लाख १४ हजार ६६८ हजार जणांची कोरोना तपासणी करण्यात आली असून, यापैकी १ लाख ९९ हजार ६९६ जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. यापैकी १ लाख ९१ हजार ३०० जण कोरोनामुक्त झाले आहेत़. आज दिवसभरात ४ जणांचा मृत्यू झाला असून, यापैकी १ जण पुण्याबाहेरील आहेत. आजपर्यंत शहरात कोरोनामुळे ४ हजार ८३७ जणांचा मृत्यू झाला आहे.

पुणे शहरात आजमितीला २८९६ कोरोनाग्रस्तांवर उपचार सुरु आहे. यापैकी १६४ रुग्णांची प्रकृती चिंताजनक आहे. पुण्यात आतापर्यंत १ लाख ९७ हजार ९६४ रुग्णांची नोंद झाली आहे. यापैकी १ लाख ९० हजार २४२ रुग्णांनी कोरोनामुक्त झाले आहे. शहरात या घडीला कोरोना रुग्णांसाठी एकूण बेड्सची संख्या ४,४५७ इतकी आहे. यामध्ये आयसीयू बेड्सची संख्या २३३ आहेत. यापैकी सध्या १५५ आयसीयू बेड्स रिकामे आहेत. पुण्यात व्हेंटिलेटर बेड्सची संख्या ही ३८३ इतकी आहे.  कोरोना रुग्णांची सध्याची संख्या पाहता पुण्यात उपचारांसाठी पुरेसे बेड्स उपलब्ध आहेत

 

टॅग्स :Puneपुणेcorona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका