शहरं
Join us  
Trending Stories
1
सौदी अरेबियात भीषण अपघात, ४२ भारतीयांचा मृत्यू; प्रवासी बस डिझेल टँकरला धडकली, आगीचा उडाला भडका
2
काँगोमधील तांब्याच्या खाणीत मोठी दुर्घटना; पूल कोसळून ३२ जणांचा मृत्यू, अनेक जण अजूनही बेपत्ता
3
भारताचा अमेरिकेसोबत ऐतिहासिक LPG करार; घरगुती गॅस सिलिंदरची किंमत कमी होणार?
4
Delhi Blast : दिल्ली स्फोटातील डॉ. शाहीनच्या कोट्यवधींच्या फंडिंगबाबत धक्कादायक खुलासा, ATS-NIA चे छापे
5
टॅक्स भरणे झाले सोपे! बँक, नेट बँकिंगचा झंझट नाही; आता UPI ॲपद्वारे मिनिटांत भरा प्राप्तीकर
6
पालघर साधू हत्याकांडात आरोप केले, त्यालाच पक्षात घेतले? चौफेर टीका होताच भाजपानं दिलं असं स्पष्टीकरण
7
देवेंद्र फडणवीसांना भेटला, सत्कार करून घेतला; पंतप्रधान कार्यालयात सचिव म्हणणारा निघाला...
8
नोकरीच्या शोधात असलेल्यांसाठी सुवर्णसंधी! ९०% कंपन्या 'या' पदावर प्रोफेशनल्सची करणार भरती
9
देवेंद्र फडणवीसांचं 'धक्कातंत्र'! उद्धव ठाकरेंसह आदित्य ठाकरेंवर पुन्हा सोपवली जबाबदारी
10
टीम इंडिया ९३ धावांवर 'ऑलआउट', दुसरीकडे करुण नायरने एकट्याने केल्या त्यापेक्षा जास्त धावा
11
अजय देवगणपेक्षाही खतरनाक! विकी कौशलच्या 'तौबा तौबा' गाण्यावर काजोलने केला डान्स, सर्वांची हसून पुरेवाट
12
पुण्यातील या नगर परिषदेत ठाकरे आणि शिंदे गट एकत्र, नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराला पाठिंबा
13
"इंडस्ट्रीत पदार्पण मिळू शकते, पण...", करीना कपूर बॉलिवूडमधील नेपोटिझ्मबद्दल स्पष्टच बोलली
14
पाक विरुद्धच्या पराभवानंतर भारतीय संघासाठी कसे असेल Asia Cup स्पर्धेतील सेमीच समीकरण?
15
जे शिंदेंना मिळालं नाही ते नितीश कुमारांना मिळणार; बिहारमध्ये पुन्हा CM पद, फॉर्म्युला ठरला
16
भ्रष्टाचाराचं Live प्रेझेंटेशन... तरुणाचा महापौरांसमोरच कॉल, अधिकाऱ्यांच्या 'रेट लिस्ट'चा पर्दाफाश
17
ट्रम्प यांचा यु-टर्न! अमेरिकेच्या 'या' निर्णयानं भारताला होणार २६ हजार कोटींचा फायदा, 'यांना' मिळणार मोठा लाभ
18
सौदीचे प्रिन्स ७ वर्षानंतर अमेरिका दौऱ्यावर, ट्रम्प यांचा आनंद गगनात मावेना, कारणही आहे खास
19
Stock Market: किरकोळ तेजीसह शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात; सेन्सेक्समध्ये १०० अंकांची तेजी, निफ्टी २५,९०० च्या वर
20
Chandrayaan 4: भारत चंद्रावर जाणार; तेथील नमुने पृथ्वीवर आणणार, चांद्रयान-४ मोहिमेला सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

Corona virus : कोरोनाविरुद्धच्या लढाईसाठी सेनापती वाढले पण आता सैनिक कधी वाढणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2020 23:55 IST

कोरोना काळात मनुष्यबळाची वानवा

ठळक मुद्देपुणे पालिकेत चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची संख्या कमी

पुणे : कोरोनाविरुद्धच्या लढाईसाठी पालिकेने मोठ्या प्रमाणावर उपाययोजना केल्या. पुणे महापालिकेच्या मदतीकरिता राज्य शासनाने अर्धा डझनपेक्षा अधिक ‘आयएएस’ अधिकाऱ्यांची फौज पाठविली. एकीकडे या सेनापतींची संख्या वाढत असतानाच दुसरीकडे प्रत्यक्ष ‘ग्राऊंड’वर लढत असलेल्या सैनिकांची संख्या मात्र तेवढीच आहे.कोरोनाच्या काळात रस्ते झाडणारे, स्वच्छतागृहे स्वच्छ करणारे तसेच सार्वजनिक स्वच्छता करणारे सफाई कर्मचारी जीवावर उदार होऊन काम करीत आहेत. येरवडा, भवानी पेठेसारख्या अगदी दाटीवाटीच्या भागातही या सेवकांनी आपली सेवा खंडीत होऊ दिली नाही. आपले कर्तव्य बजावित असताना शेकडो स्वच्छता कर्मचारी कोरोनाबाधित झाले. तर अनेकांना आपले प्राण गमवावे लागले. या कर्मचा-यांच्या नातेवाईकांना हक्काच्या विम्याच्या पैशांसाठी प्रशासनाकडे डोळे लावून बसायला लागत आहे.वर्ग एक ते वर्ग चारमधील एकूण 8 हजार कर्मचारी सध्या कोरोनाच्या ड्युटीवर लावण्यात आलेले आहेत. यामध्ये शिक्षण मंडळ, पीएमपीएमएल, शासन आणि  कंत्राटी डाटा एन्ट्री ऑपरेटर्सचा समावेश आहे. पोलिसांनी नेमलेल्या विशेष पोलीस अधिकारी आणि स्वयंसेवक यांची संख्याही त्यामध्ये समाविष्ठ आहे. या सर्वांची संख्या 5 हजार 830 एवढी होत असून ही संख्या वजा केली तर पालिकेचे अवघे अडीच हजारांच्या आसपास मनुष्यबळ कोरोनाचे काम करीत असल्याचे स्पष्ट होत आहे. पालिकेकडूनच ही आकडेवारी उपलब्ध झाली आहे. पालिकेच्या वरिष्ठ अधिका-यांवरील ताण कमी करण्याकरिता वरिष्ठ अधिका-यांची संख्या वाढविण्यात आली. परंतू, प्रत्यक्ष  ‘ग्राऊं ड’वर काम करणा-या शेवटच्या घटकावरील ताण कमी करण्यासाठी मनुष्यबळ कधी उपलब्ध होणार हा प्रश्न आहे.=====कोरोनाविषयक कामकाज असलेले अधिकारी-कर्मचारीवर्ग संख्यावर्ग 1 -79वर्ग 2 -109वर्ग 3 - 1,758वर्ग 4- 360शिक्षण मंडळ कर्मचारी 327शिक्षिका/शिक्षक 486पीएमपीएमएल कर्मचारी 2,898शासनाकडील उपलब्ध सेवक 96 विशेष पोलीस अधिकारी 1,488कंत्राटी डाटा एंट्री ऑपरेटर 51स्वयंसेवक 484एकूण 8,136

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसLabourकामगारEmployeeकर्मचारी