शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

Corona virus : लॉकडाऊनच्या काळातही ' स्वच्छतेचे दूत ' म्हणताहेत आम्ही आहोत खंबीर!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2020 4:00 PM

फक्त नागरिकांना सहकार्य करण्याचे आवाहन 

ठळक मुद्देफक्त नागरिकांना ओला व सुका कचरा वेगळा देऊन सहकार्य करण्याचे आवाहन  सध्या हातमोजे, कागदी टिश्यूपेपर या कचऱ्याचे प्रमाण जास्तनागरिकांनी या कर्मचाऱ्यांना काही दिवस पुरेल इतका शिधाही द्यावा असेही आवाहन

पुणे: शहरात घरोघरी फिरून कचरा जमा करणारे स्वच्छ संस्थेचे साडेतीन हजार कर्मचारी संचारबंदी काळातही कार्यरत आहेत. आम्ही खंबीर आहोत, आम्हाला तसेच राहण्यासाठी सहकार्य करा असे आवाहन स्वच्छ संस्थेने केले.आहे.कचयार्चा ताण कमी करण्यासाठी म्हणून पालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने स्वच्छ संस्थेची मदत घेतली आहे. शहराच्या सर्व भागात घरोघरी फिरून हे कर्मचारी कचरा जमा करतात. कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावण्याचे महत्व लक्षात घेऊन या कर्मचाऱ्यांनी आपले काम अनेक अडचणी येत असूनही कायम ठेवले.आहे. त्यात अगदीच अपवाद वगळता खंड येऊ दिलेला नाही.

संस्थेचे पदाधिकारी हर्षद बर्डे म्हणाले, या कर्मचाऱ्यांना ओला व सुका कचरा वेगळा देऊन नागरिक सहकार्य करू.शकतात. सध्या हातमोजे, कागदी टिश्यूपेपर या कचऱ्याचे प्रमाण जास्त आहे. ते कागदात गुंडाळून कचऱ्यात टाकावेत, अन्यथा कर्मचाऱ्यांना त्याचा संसर्ग होऊ.शकतो. कर्मचारीही हातमोजे वापरूनच त्यांचे काम करतात, मात्र ही काळजी नागरिकांनीही घ्यावी. हे कर्मचारी पालिकेचे पगारी कर्मचारी नाहीत. घरांमधून मिळणारी मासिक रक्कम व संस्था देत असलेली तोकडी रक्कम हाच त्यांचा आधार आहे. त्यामुळे शक्य आहे त्या नागरिकांनी या कर्मचाऱ्यांना काही दिवस पुरेल इतका शिधाही द्यावा असेही आवाहन संस्थेने केले आहे. कर्मचाऱ्यांना संचारबंदीमुळे प्रवास करताना अनेक अडचणी येत आहेत. संस्थेने त्यांना ओळखपत्र दिली आहेत. अडचणी येत असूनही ते त्यांच्या कामाचे महत्व लक्षात घेऊन कामावर येत आहेत. नागरिकांनाही त्यांना सहकार्य करावे असे बर्डे यांनी सांगितले.

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस