शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंनी दोनदा फसवण्याचा प्रयत्न केला; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा दावा
2
तुम्ही बिनशर्त पाठिंबा सगळं गुजरातला देण्यासाठी दिलाय का? आदित्य ठाकरेंचा मनसैनिकांना खोचक टोला
3
अरविंद केजरीवाल पहिल्यांदाच करणार काँग्रेसचा प्रचार; आज दिल्लीत घेणार जाहीर सभा
4
बीसीसीआय सेहवाग, गंभीरला डावलणार? मुख्य प्रशिक्षक पदासाठी व्हीव्हीएस लक्ष्मण देखील इच्छुक
5
Baba Ramdev Patanjali Foods : बाबा रामदेव यांच्या कंपनीला मोठा झटका, मार्च तिमाहीत २२ टक्क्यांनी घसरला नफा 
6
17000 राजकारणी, अब्जाधीशांनी देश बुडविला; पाकिस्तानींनी दुबईत घेतली तब्बल 23000 घरे
7
पंतप्रधान मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर; दिंडोरी अन् कल्याणमध्ये सभा, मुंबईत होणार रोड शो
8
आजचे राशीभविष्य १५ मे २०२४; आजची सकाळ फलदायी, अनेक राशींची परिस्थिती दुपारनंतर बदलणार
9
पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे ना घर आहे, ना गाडी; कर भरला ३ लाखांवर, ३ कोटींची एकूण संपत्ती
10
उद्धव ठाकरे माझाही कार्यक्रम करणार होते; 'लोकमत'ला दिलेल्या मुलाखतीत CM शिंदेंचा हल्लाबोल
11
उद्धव ठाकरेंचा भाजपा आमदार फोडायचा, फडणवीसांना अटक करण्याचा होता डाव: CM शिंदे
12
धारावीतच घर, दुकान मिळणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आश्वासन
13
राहुल गांधींच्या प्रचारासाठी काँग्रेसचा नवा फंडा; भाषणांसोबत रील्स ठरल्या भारी
14
वसई-विरार पलीकडे मराठी माणूस का गेला? उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सवाल
15
यंदाची निवडणूक देशाचे भवितव्य ठरवणारी; कांजूरमार्ग येथील सभेत शरद पवार यांचे मत
16
मजबूत अर्थव्यवस्थेसाठी स्थिर सरकार आवश्यक; केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे मत
17
मध्यमवर्गीयांची पिळवणूक हेच काँग्रेसचे धोरण; पीयूष गोयल यांची टीका
18
पालिकेच्या मान्यताप्राप्त ऑडिटरचाच स्ट्रक्चरल स्टेबिलिटीचा रिपोर्ट! धक्कादायक माहिती समोर
19
रोड शो, रथयात्रांमुळे वाहतूककोंडी; वाहतुकीचे नियोजन करता करता मुंबईत पोलिसांच्या येते नाकीनऊ
20
धीरज वाधवानला सीबीआयकडून अटक; १७ बँकांकडून घेतलेल्या कर्जापैकी ३४ हजार कोटींचा अपहार

Corona virus : परदेशातून आलेल्या नागरिकांकडून नियमांचे उल्लंघन, पुण्यात पहिला गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2020 7:39 PM

परदेशातून आलेल्या सर्व प्रवाशांना सात दिवस संस्थात्मक क्वरंटाईन करणे बंधनकारक..

ठळक मुद्देसंस्थात्मक क्वारंटाइन होण्यास नकार देणाऱ्याविरुध्द गुन्हा दाखल करणार

पुणे : केंद्र शासनाच्या आदेशानुसार परदेशातून आलेल्या सर्व प्रवाशांना सात दिवस संस्थात्मक क्वारंटाईन करणे बंधनकारक आहे. असे असताना काही लोक प्रशासनाच्या आदेशाच्या पालन न करता संस्थात्मक क्वारंटाईनचे उल्लंघन करत असून, स्वत: सह इतर लोकांचे जीव धोक्यात घालत आहेत. यामुळे संस्थात्मक क्वारंटाइन होण्यास नकार देणाऱ्याविरुध्द गुन्हा दाखल करणार असल्याचे उपजिल्हाधिकारी सारंग कोडोलकर यांनी स्पष्ट केले आहे. शासनाच्या दिनांक 24 मे 2020 च्या मार्गदर्शक तत्वांनुसार परदेशातून आलेल्या प्रवाशांना सात दिवसांसाठी संस्थात्मक क्वारंटाइन होणे बंधनकारक आहे. असे असून सुद्धा अश्विन कुमार सिंग (वय वर्षे 31) हे दिनांक 16 जून रोजी विमानाने लंडन येथून मुंबईला आले व नंतर हांडेवाडी (तालुका हवेली, जिल्हा पुणे) येथील त्यांच्या घरी परस्पर निघून गेले. त्या वेळी कार्यरत असलेल्या पुणे महापालिकेचे नोडल अधिकारी अजित सणस यांनी घरी जाऊन त्याला समजावून सांगितले. तथापि, त्याने इन्स्टिट्यूशनमध्ये क्वारंटाइन होण्यास नकार दिला. त्यामुळे जिल्हा परिषदेचे गट विकास अधिकारी प्रशांत शिर्के यांच्या आदेशावरुन संबंधितांविरुद्ध प्रथम माहिती अहवाल (एफआयआर) दाखल करून भारतीय दंड संहिता 1860 कलम 188, 270 आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 कलम 51, महाराष्ट्र कोविड 19 विनियमन 2020 कलम 11 व साथीचे रोग अधिनियम 1897 कलम 2 प्रमाणे प्रगती उल्हास कोरडे यांनी लोणी काळभोर पोलीस स्टेशन (पुणे ग्रामीण) येथे गुन्हा दाखल केला असल्याचे उपजिल्हाधिकारी सारंग कोडोलकर यांनी कळवले आहे.

टॅग्स :PuneपुणेCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसNavalkishor Ramनवलकिशोर रामPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका