शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
4
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
5
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
6
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
7
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
8
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
9
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
10
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
11
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
12
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
13
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
14
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
15
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
16
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
17
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
18
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
19
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
20
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
Daily Top 2Weekly Top 5

corona virus : प्रशासनाने ठरवून दिलेल्या वेळेत मार्केटयार्ड सुरू ठेवणे अशक्य; वेळमर्यादा वाढवून मिळावी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2020 19:27 IST

शहरातील लॉकडाऊनचे निर्बंध रविवारपासून काही प्रमाणात शिथील करण्यात येणार

ठळक मुद्देबाजार समिती प्रशासनाचे जिल्हाधिकारी व आयुक्तांना पत्र 

पुणे : पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील लॉकडाऊनमध्ये रविवार (दि. १९) पासून काही प्रमाणात शिथील करण्यात येणार आहे. या रविवारपासून काही व्यवहार सकाळी ८ ते दुपारी १२ या वेळेत सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात येणार आहे. परंतु प्रशासनाने ठरवून दिलेल्या वेळेत मार्केटयार्डातील भुसार, भाजीपाला, फळे, कांदा-बटाटा, फुले आदी विभाग सुरू ठेवणे अशक्य होणार आहे. त्यामुळे मार्केटयार्डातील व्यवहारासाठी वेळ मर्यादा वाढवून मिळावी. किंवा बाजार सुरू ठेवण्यासाठी मार्गदर्शन मिळावे अशी मागणी करणारे पत्र बाजार समितीच्या प्रशासनाने जिल्हाधिकारी व महापालिका आयुक्त यांना शुक्रवारी पाठविले आहे.फळे, भाजीपाला, कांदा-बटाटा, फुले विभागात रात्रीपासून पहाटेपर्यंत शेत मालाच्या गाड्या येतात. त्यानंतर खरेदी विक्रीचे व्यवहार सुरू होतात. गुळ-भुसार विभागाची परिस्थिती अशीच आहे. त्यामुळे प्रशासनाने ठरवून दिलेल्या वेळेत व्यवहार करणे अशक्य आहे. गुळ-भुसार, कांदा-बटाटा, फळे, फुले आणि भाजीपाला विभागातील व्यवहारासाठी मागील लॉकडाऊनमध्ये जो कालावधी ठरला होता. तोच कालावधी या वेळीही असावा. असे बाजार समितीने पाठविलेल्या पत्रामध्ये स्पष्ट केले आहे.लॉकडाऊनमुळे मंगळवारपासून संपूर्ण शहर कडकडीत बंद आहे. पहिल्या लॉकडाऊनच्या चारही टप्यात गुळ-भुसार विभाग सुरू होता. तर फळे, भाजीपाला, कांदा-बटाटा, केळी आणि फुल विभाग काही दिवसांचा अपवाद वगळता बंदच होते. मात्र या लॉकडाऊनमध्ये मार्केटयाडार्तील सर्वच विभागातील व्यवहार बंद ठेवण्यात आले आहेत. जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्त यांच्या मार्गदर्शनुसार मार्केटयाडार्तील विभाग सुरू होऊ शकतात.वेळेबाबत मार्गदर्शन हवे, प्रशासनाने ठरवून दिलेल्या वेळच्या मयार्देत बाजार सुरू करणे सर्व घटकांसाठी अशक्य आहे. त्यामुळे मागील लॉकडाऊनमध्ये जी वेळ ठरली होती. त्याच वेळेत बाजार सुरू ठेवण्याची परवानगी मिळावी. किंवा बाजार कशा पद्धतीने सुरू ठेवता येईल याबाबत मार्गदर्शन मिळावे. असे पत्र जिल्हाधिकारी तसेच महापालिका आयुक्तांना पाठविण्यात आले आहे. त्यांच्या सुचना आणि मार्गदर्शनानुसारच बाजार सुरू होईल असे बाजार समितीचे प्रशासक बी. जे. देशमुख यांनी सांगितले.

टॅग्स :PuneपुणेMarket Yardमार्केट यार्डCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसNavalkishor Ramनवलकिशोर रामcommissionerआयुक्तFarmerशेतकरी