Corona virus : ... तर स्टॅगर्ड लॉकडाऊन उपयुक्त; कोरोना रुग्ण वाढत असल्याने पर्याय
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2020 14:29 IST2020-06-30T14:29:47+5:302020-06-30T14:29:58+5:30
संपूर्ण लॉकडाऊन करणे शक्य नसल्याने कामानिमित्त बाहेर पडणारी लोक आणि घरी थांबणारी लोक अशा विभागणीचा समावेश प्रतिमानात करण्यात आला आहे.

Corona virus : ... तर स्टॅगर्ड लॉकडाऊन उपयुक्त; कोरोना रुग्ण वाढत असल्याने पर्याय
पुणे : कोरोनाबाधितांची संख्या वाढू लागल्याने पुन्हा लॉकडाऊन करावे लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पण संपुर्ण लॉकडाऊनऐवजी ‘स्टॅगर्ड’ लॉकडाऊनचा पर्याय उपयुक्त ठरू शकतो, असे ‘इंडसाय-सिम’ या कोरोनाच्या संगणकीय प्रतिमानावर काम करणाऱ्या देशभरातील शास्त्रज्ञांच्या गटाने सुचविले आहे. यामध्ये लोकांनी सात दिवसांच्या अंतराने तीन गटांत कामानिमित्त घराबाहेर पडणे अपेक्षित आहे. असे केल्यास एक गट सलग चौदा दिवस घरामध्ये राहू शकतो.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीतातील सेंटर फॉर मॉडेलिंग अँड सिम्युलेशन या विभागातील डॉ. स्नेहल शेकटकर आणि डॉ. भालचंद्र पुजारी यांचा ‘इंडसाय-सिम’ हे कोरोना संगणकीय प्रतिमान विकसित करण्यात हातभार आहे. या प्रतिमानात आता बरेचसे बदल करण्यात आले आहेत. अधिकाधिक वस्तुनिष्ठ बारकाव्यांचा समावेश करण्यात आलेला आहे. देशभरातील संस्था या प्रतिमानाचा निर्णयप्रक्रियेत वापर करीत आहेत. लॉकडाऊन शिथिल केल्यानंतर रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. त्यामुळे पुन्हा लॉकडाऊन होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
संपुर्ण लॉकडाऊन करणे शक्य नसल्याने कामानिमित्त बाहेर पडणारी लोक आणि घरी थांबणारी लोक अशा विभागणीचा समावेश प्रतिमानात करण्यात आला आहे. यामुळे कोरोनाचा प्रसार आटोक्यात ठेवून लॉकडाऊन कसे उठवता येईल, याचा अंदाज बांधणे शक्य झाले आहे. रुग्णसंंख्या वाढू लागल्याने काही शहरांमध्ये पुन्हा टाळेबंदीची घोषणा करण्यात आली आहे. या प्रतिमानातून असेही दिसून येते आहे की संख्या वाढली की टाळेबंदी करणे यापेक्षा ‘स्टॅगड’ पद्धतीची टाळेबंदी जास्त उपयुक्त आहे, असे शेकटकर यांनी स्पष्ट केले आहे.
.......
कामानिमित्त बाहेर पडणाºया व्यक्तींना तीन गटात विभागले जाते. यानंतर प्रत्येक गट एका आठवड्यासाठी कामासाठी बाहेर पडतो आणि बाकी दोन गट घरी थांबतात. त्यापुढील आठवड्यात दुसरा गट आणि तिसºया आठवड्यात तिसरा गट कामासाठी जातो. यामुळे संसर्ग झालेला व्यक्ती साधारण दोन आठवडे घरी राहत असल्याने तो इतरांना संसर्ग करण्याची शक्यता अत्यंत कमी होते. संसर्ग झाला तरी तो एका गटापुरताच मर्यादित राहतो असे गणितीय प्रतिमानातून दिसून येत आहे.
...........
असा असेल स्टॅगर्ड लॉकडाऊन...
संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊन हा एकमेव पर्याय नाही. गणितीय प्रतिमानानुसार स्टॅगर्ड लॉकडाऊन फायदेशीर ठरू शकतो. यामध्ये कामानिमित्त बाहेर पडणारे लोक विभागले जातात. तसेच अधिकाधिक चाचण्या वाढविणेही आवश्यक आहे.- डॉ. स्नेहल शेकटकर
.....