Corona virus : खेड तालुक्यातील स्थिती चिंताजनक; एकाच दिवसांत आढळले १७ नवीन कोरोनाग्रस्त
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2020 02:25 IST2020-06-27T02:24:35+5:302020-06-27T02:25:28+5:30
खेड तालुक्यातील बाधितांची संख्या पोहचली ७५वर

Corona virus : खेड तालुक्यातील स्थिती चिंताजनक; एकाच दिवसांत आढळले १७ नवीन कोरोनाग्रस्त
राजगुरूनगर: खेड तालुक्यातील चाकण परिसरात कोरोनाचा जोर सुरू झाला असुन एका दिवसात १७ कोरोना बाधित आढळुन आल्याने खेड तालुक्यात घबराटीचे वातारण झाले आहे.
तालुक्यात बाधितांची एकूण संख्या ७५ झाली आहे.. चाकणच्या कडाचीवाडी येथील एका लग्न समारंभात सहभागी असलेल्या बाधित व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या तब्बल १३ जणांचे अहवाल शुक्रवारी(दि २६) पॉझिटिव्ह आल्याची माहिती खेड तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. बळीराम गाढवे यांनी दिली.
त्यात कडाचीवाडी ७, कुरुळी ३, चाकणची राक्षेवाडी ३ जणांचा समावेश आहे. याशिवाय खराबवाडी येथे दोन दिवसांपूर्वी आढळुन आलेल्या व्यक्तीच्या संपर्कातील २ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. चऱ्होली,बिरदवडी येथे एक एक रुग्ण आढळुन आला आहे. खेड तालुक्यात एकूण ७५ कोरोनाचे रुग्ण झाले आहेत. त्यातील दोन मृत्यू तर ४० जण बरे झाले आहेत. आता ३३ रुग्ण उपचार घेत आहेत.