शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्हाला राजकारणात मुलं होत नाही, त्यात आमचा दोष काय?; उद्धव ठाकरेंचा घणाघात
2
"स्मृती इराणींना निवडणुकीनंतर गोव्यात पाठवणार, गांधी परिवार कोणाला घाबरत नाही"
3
रिकामे झाले, दुसरीकडे काम, भाजपचा फॉर्म्युला; अनेक नेत्यांना दुसऱ्या मतदारसंघात पाठवले
4
...म्हणून काँग्रेसने राहुल गांधींना अमेठी ऐवजी रायबरेलीतून दिली उमेदवारी, असं आहे मतांचं गणित
5
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
6
संविधान बदलणार बाेलले अन् पक्षाने तिकीट कापले; विश्वेवर हेगडे-कागेरी यांना उमेदवारी
7
मोबाइल चोरी नाहीच; पण, मृत्यूचे गूढ कायम; विशाल पवार संशयास्पद मृत्यू प्रकरण
8
PPF Vs NPS: रिटायरमेंटसाठी कोणता प्लान ठरेल बेस्ट? 'हे' आहेत पीपीएफ आणि एनपीएसचे फायदे
9
एकनाथ खडसेंच्या प्रवेशाला विरोध कशाला असेल ? वार्तालापात विनाेद तावडे यांनी मांडली भूमिका
10
भाजप अन् काँग्रेससमोर ‘पिंचहिटर’चे आव्हान ; पठाणच्या ‘एन्ट्री’मुळे देशाच्या नजरा
11
Wipro चे संस्थापक अझीम प्रेमजी बँकिंग क्षेत्रात उतरणार; 'या' बँकेतील हिस्सा खरेदी करण्याच्या तयारीत
12
पहिल्या भाषणानंतर बाळासाहेबांनी दिलेला 'तो' सल्ला राज ठाकरेंनी कायम लक्षात ठेवला
13
अमेठीत २५ वर्षांत प्रथमच मैदानात नसेल गांधी घराणे; बालेकिल्ल्यातून काॅंग्रेसने उमेदवार बदलला, भाजप नेत्यांचे टीकास्त्र
14
उद्धव यांच्या आजारपणात मोदी करायचे विचारपूस ; पंतप्रधानांच्या विधानावर राजकीय टोलेबाजी सुरू
15
Akshaya Tritiya 2024: चैत्रगौरीला निरोप देताना कुंकवाची पावलं काढा आणि 'पुनरागमनायच' म्हणा; कारण...
16
खासदारांना डावलून आमदार रिंगणात, नव्या चेहऱ्यांमुळे चुरस; रणनीती ठरणार का यशस्वी?
17
'ही' साऊथ अभिनेत्री, जी प्रेमासाठी बनली वयानं २७ वर्ष मोठ्या असलेल्या माजी CM ची दुसरी पत्नी
18
आजचे राशीभविष्य - ४ मे २०२४; आज आपणास खूप मोठा आर्थिक लाभ होईल
19
रावसाहेब दानवे षटकार मारणार ? जालन्यात चुरशीची लढाई, भाजपचा वरचष्मा; मविआ कमकुवत!
20
तिकीट तर कापले, आता पुनर्वसनाचा प्रश्न, महायुतीने १२ विद्यमान खासदारांना बसवले घरी

Corona virus : बाप रे! पुणे शहरात दिवसभरात २७५ नवीन कोरोना रुग्ण : एकूण रुग्णसंख्या ७ हजार ७२२ वर

By ऑनलाइन लोकमत | Published: June 07, 2020 12:24 AM

उपचार घेत असलेल्या रुग्णांपैकी १९५ जणांची प्रकृती चिंताजनक आहे.

ठळक मुद्दे२५९ रुग्ण झाले बरे तर १९५ रूग्ण अत्यवस्थ

पुणे : शहरातील कोरोनाग्रस्त रूग्णांमध्ये शनिवारी दिवसभरात २७५ रूग्णांची भर पडली असून रुग्णांचा एकूण आकडा ७ हजार ७२२ वर जाऊन पोहचला आहे. दिवसभरात बरे झालेल्या २५९ जणांना घरी सोडण्यात आले आहे. विविध रुग्णालयातील १९५ रुग्ण अत्यवस्थ असून दिवसभरात एकूण ०६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, प्रत्यक्षात क्टिव्ह रुग्ण २ हजार ४१३ असल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली. शनिवारी रात्री आठपर्यंत शहरात नव्याने नोंद करण्यात आलेल्या २७५ पॉझिटिव्ह रूग्णांपैकी ससून रूग्णालयात ०८, नायडूसह पालिकेच्या विविध रुग्णालयांमध्ये २२३ तर खासगी रुग्णालयांमध्ये ४४ रुग्ण दाखल झाले आहेत. उपचार घेत असलेल्या रुग्णांपैकी १९५ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. यातील ४९ रुग्ण व्हेंटिलेटरवर असून १४६ रुग्ण आयसीयूत उपचार घेत आहेत. शहरात शनिवारी ०६ मृतांची नोंद करण्यात आली. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या ३७५ झाली असून यामध्ये जिल्ह्याबाहेरील तीन रुग्णांचा समावेश आहे. दिवसभरात एकूण २५९ रुग्ण आजारातून बरे झाल्याने घरी सोडण्यात आले आहेत. यामध्ये पालिकेच्या रुग्णालयांतील २०३ रुग्ण, ससूनमधील १५ तर  खासगी रुग्णालयांमधील ४१ रुग्णांचा समावेश आहे. आजारातून बरे झालेल्यांची एकूण संख्या ४ हजार ९३४ झाली आहे. तर एक्टिव्ह रूग्णांची संख्या २ हजार ४१३ झाली आहे.-------------दिवसभरात विविध केंद्रांवर एकूण १६४९ नागरिकांची स्वॅब तपासणी करण्यात आली असून आतापर्यंत ५८ हजार ४५५ रूग्णांची तपासणी करण्यात आली आहे. एकूण अ‍ॅक्टिव्ह रूग्णांपैकी पालिकेच्या दवाखान्यांमध्ये १६९३, ससून रुग्णालयात १५३ आणि खासगी रुग्णालयांमध्ये ५६७ रुग्ण उपचार घेत आहेत......

टॅग्स :PuneपुणेCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसDeathमृत्यूcommissionerआयुक्तNavalkishor Ramनवलकिशोर राम