पुणे : शहरातील कोरोनाग्रस्त रूग्णांमध्ये शनिवारी दिवसभरात २७५ रूग्णांची भर पडली असून रुग्णांचा एकूण आकडा ७ हजार ७२२ वर जाऊन पोहचला आहे. दिवसभरात बरे झालेल्या २५९ जणांना घरी सोडण्यात आले आहे. विविध रुग्णालयातील १९५ रुग्ण अत्यवस्थ असून दिवसभरात एकूण ०६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, प्रत्यक्षात क्टिव्ह रुग्ण २ हजार ४१३ असल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली. शनिवारी रात्री आठपर्यंत शहरात नव्याने नोंद करण्यात आलेल्या २७५ पॉझिटिव्ह रूग्णांपैकी ससून रूग्णालयात ०८, नायडूसह पालिकेच्या विविध रुग्णालयांमध्ये २२३ तर खासगी रुग्णालयांमध्ये ४४ रुग्ण दाखल झाले आहेत. उपचार घेत असलेल्या रुग्णांपैकी १९५ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. यातील ४९ रुग्ण व्हेंटिलेटरवर असून १४६ रुग्ण आयसीयूत उपचार घेत आहेत. शहरात शनिवारी ०६ मृतांची नोंद करण्यात आली. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या ३७५ झाली असून यामध्ये जिल्ह्याबाहेरील तीन रुग्णांचा समावेश आहे. दिवसभरात एकूण २५९ रुग्ण आजारातून बरे झाल्याने घरी सोडण्यात आले आहेत. यामध्ये पालिकेच्या रुग्णालयांतील २०३ रुग्ण, ससूनमधील १५ तर खासगी रुग्णालयांमधील ४१ रुग्णांचा समावेश आहे. आजारातून बरे झालेल्यांची एकूण संख्या ४ हजार ९३४ झाली आहे. तर एक्टिव्ह रूग्णांची संख्या २ हजार ४१३ झाली आहे.-------------दिवसभरात विविध केंद्रांवर एकूण १६४९ नागरिकांची स्वॅब तपासणी करण्यात आली असून आतापर्यंत ५८ हजार ४५५ रूग्णांची तपासणी करण्यात आली आहे. एकूण अॅक्टिव्ह रूग्णांपैकी पालिकेच्या दवाखान्यांमध्ये १६९३, ससून रुग्णालयात १५३ आणि खासगी रुग्णालयांमध्ये ५६७ रुग्ण उपचार घेत आहेत......
Corona virus : बाप रे! पुणे शहरात दिवसभरात २७५ नवीन कोरोना रुग्ण : एकूण रुग्णसंख्या ७ हजार ७२२ वर
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2020 00:24 IST
उपचार घेत असलेल्या रुग्णांपैकी १९५ जणांची प्रकृती चिंताजनक आहे.
Corona virus : बाप रे! पुणे शहरात दिवसभरात २७५ नवीन कोरोना रुग्ण : एकूण रुग्णसंख्या ७ हजार ७२२ वर
ठळक मुद्दे२५९ रुग्ण झाले बरे तर १९५ रूग्ण अत्यवस्थ