शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
4
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
5
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
6
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
7
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
8
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
9
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
10
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

Corona Virus in Pune:...तर लॉकडाऊन शिवाय पर्याय नाही; अजित पवारांचा पुणेकरांना निर्वाणीचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2021 12:50 IST

Ajit Pawar On Pune Lockdown Decision: 1 एप्रिल पासून जे काही कार्यक्रम आहेत जे कोणी लोकप्रतिनिधी आहेत त्यांनी खासगी कार्यक्रम बंद केले पाहिजेत. लग्न लॉनमध्ये करा किंवा आणखी कुठे संख्या 50 पेक्षा जास्त असता नये, असे नियम पाळण्याचे आदेश अजित पवारांनी दिले.

पुण्यातील परिस्थिती फार गंभीर असून लोकांना मास्क, फिजिकल डिस्टन्स ठेवावं लागणार आहे. पुण्यात कोरोनाची (Corona In Pune) आकडेवारी वाढत आहे. 50 टक्के खासगी बेड ताब्यात घेणार आहेत. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांच्याशी संपर्क साधला. 316 लसीकरण केंद्र शहर आणि ग्रामीण भागात आहेत, ती दुप्पट करण्याचा प्रयत्न करण्यात येणार असून पुढील शुक्रवारी लॉकडाऊनवर निर्णय घेणार असल्याचा इशारा उप मुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी पुणेकरांना दिला आहे. (Ajit Pawar will take Decision on 2 April of pune Corona Lockdown.)

आढावा बैठकीनंतर पुण्याचे पालकमंत्री अजित पवारांनी पत्रकार परिषद घेतली. 1 एप्रिल पासून जे काही कार्यक्रम आहेत जे कोणी लोकप्रतिनिधी आहेत त्यांनी खासगी कार्यक्रम बंद केले पाहिजेत. लग्न लॉनमध्ये करा किंवा आणखी कुठे संख्या 50 पेक्षा जास्त असता नये. अंत्यविधीला 20 पेक्षा जास्त लोक नकोत. कोरोना रुग्णांची संख्या मागील वेळेपेक्षा वाढली आहे. रात्रीची संचारबंदी पुन्हा सुरू होणार आहे. नियमांचे पालन केले नाही, असेच पुढील5-6 दिवस सुरु राहिले तर 2 एप्रिलला कठोर निर्णय घ्यावे लागतील असा इशारा अजित पवारांनी दिला आहे. 

लग्न सोडून इतर समारंभ पूर्ण बंद करावेत. उद्यान, बाग बगीचे सकाळीच सुरू राहणार.  मॉल, मार्केट, चित्रपट गृह 50 टक्के उपस्थितीमध्ये सुरु ठेवण्यात येतील. सार्वजनिक वाहतूक सुरूच ठेवणार, ऑक्सिजन प्लँट चाकण जवळ झालाय त्यामुळे पुरवठा सुरळीत, कमी पडला तर राजगडमध्ये बोलून ठेवत आहोत. पुणे शहराच्या जम्बो केंद्रातील बेड पूर्ण क्षमतेने सुरू करणार, पिंपरी चिंचवडमधील जम्बो 1 एप्रिलपासून पूर्ण वापरत आणणार, ससून 300 ऐवजी 500 कोविड बेड करणार असल्याचे सांगताना अजित पवारांनी कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला ब्रेक करायचे असेल तर लॉकडाऊनला पर्याय नाही, असे म्हटल्याने लॉकडाऊनचा विचार होत असल्याचे सुतोवाच दिले आहेत. 

साखळी तोडायची असेल तर लॉकडाऊनला पर्याय नाही. वैद्यकीय तज्ज्ञ, लोक प्रतिनिधी यांचेही हेच मत आहे. परंतू Mpsc च्या पुढच्या परीक्षा ठरल्याप्रमाणे होतील. 10वी / 12 वी परीक्षा वेळेत होतील.विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ देणार नाही, असे पवार म्हणाले. 

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसPuneपुणे