Corona virus : पुणे शहरात सोमवारी १८० तर पिंपरीत २४६ जण नवे कोरोनाबाधित

By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2021 07:50 PM2021-05-31T19:50:45+5:302021-05-31T22:21:12+5:30

पुणे शहरातील सक्रिय रूग्ण संख्या ही आजमितीला ६ हजार २० इतकी खाली आहे.

Corona virus Pune : Only 180 new corona-affected and 751 corona free people on Monday in the pune | Corona virus : पुणे शहरात सोमवारी १८० तर पिंपरीत २४६ जण नवे कोरोनाबाधित

Corona virus : पुणे शहरात सोमवारी १८० तर पिंपरीत २४६ जण नवे कोरोनाबाधित

googlenewsNext

पुणे : पुणे शहरात सोमवारी विविध तपासणी केंद्रांवर केवळ ४ हजार ३४९ कोरोना संशयितांनी आपली तपासणी करून घेतली असून, यामध्ये अवघे १८० कोरोनाबाधित आढळून आले आहेत.तपासणीच्या तुलनेत ही टक्केवारी ४.१३ टक्के आहे.  कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत तपासणीच्या तुलनेत प्रथमच कोरोना पॉझिटिव्हीटी रेट ५ टक्क्यांच्या आत आला आहे.

दरम्यान दिवसभरात ७५१ कोरोनाबाधित कोरोनामुक्त झाले असून, शहरातील सक्रिय रूग्ण संख्या ही आजमितीला ६ हजार २० इतकी खाली आहे. दिवसभरात ३३ जणांचा मृत्यू झाला असून, यापैकी ९ जण हे पुण्याबाहेरील आहेत. आजचा शहरातील मृत्यूदर हा १.७५ टक्के इतका आहे.

पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शहरातील विविध रूग्णालयांमध्ये सध्या १ हजार ५८१ जणांवर ऑक्सिजनसह उपचार सुरू असून, शहरातील गंभीर रूग्ण संख्या ही ८४४ इतकी आहे. शहरात आत्तापर्यंत २४ लाख ९६ हजार ७३७ जणांची कोरोना तपासणी करण्यात आली असून, यापैकी ४ लाख ६९ हजार ९२७ जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. तर यापैकी ४ लाख ५५ हजार ६५१ जण कोरोनामुक्त झाले आहेत.  तर आतापर्यंत शहरात ८ हजार २५६ जणांचा मृत्यू झाला आहे.

-----------

पिंपरीत खूपच दिलासादायक ! केवळ २४६ जण पॉझिटिव्ह
 
पिंपरी :  महापालिका परिसरात वाढलेली दुसरी लाट ओसरत असून तीन महिन्यांपूर्वी दिवसाला अडीचशे रुग्ण आढळत होते. साडेतीन हजारांवर गेलेली रुग्णसंख्या पहिल्यांदाच अडीचशेवर आली आहे. सक्रिय रुग्णांची संख्या अडीच हजारांवर आली आहे. २४६ जण पॉझिटिव्ह आढळले आहेत. ३३६ जण कोरोनामुक्त झाले आहेत. १८ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.  

पिंपरी-चिंचवड महापालिका परिसरात कोरोना रुग्णांचा आलेख कमी होत आहे. साडेपाचशे असणारी शंभरने कमी झाली आहे. महापालिकेच्या विविध रुग्णालयात ५ हजार ०३८ जणांना दाखल केले होते. त्यापैकी पुण्यातील एनआयव्हीकडे पाठविलेल्या रुग्णांच्या घशातील द्रवाच्या नमुण्यांपैकी निगेटिव्ह अहवालांची माहिती आज उपबल्ध झाली नाही. त्यामुळे दाखल रुग्णांची संख्या २ हजार ५९८ वर पोहोचली आहे. तर दिवसभरा

Web Title: Corona virus Pune : Only 180 new corona-affected and 751 corona free people on Monday in the pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.