शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
2
सामंतांनी मदत केली तर... रत्नागिरी-सिंधुदूर्गात राणे - ठाकरे संघर्षाचा सामना; बालेकिल्ला कोणाचा याचाही फैसला
3
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
4
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
5
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
6
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
7
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
8
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
9
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
10
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
11
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
12
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
13
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
14
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
15
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
16
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
17
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
18
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
19
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
20
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 

Corona Virus Pune पुणे जिल्ह्याबाहेरील तब्बल ३५ टक्के रुग्ण घेताहेत शहरात उपचार; पालिकेच्या यंत्रणेवर अतिरिक्त ताण

By ऑनलाइन लोकमत | Published: May 05, 2021 10:28 PM

एकट्या जम्बोमध्ये हद्दीबाहेरच्या ६५० रुग्णांवर उपचार ...

पुणे : महापालिकेच्या हद्दीबाहेरील तसेच जिल्ह्याबाहेरील कोरोना रुग्णांचे पुण्यात येऊन उपचार घेण्याचे प्रमाण तब्बल ३५-४० टक्के आहे. एकट्या जम्बो कोविड सेंटरमध्ये गेल्या महिन्याभरात पालिकेच्या हद्दीबाहेरील ६५० रुग्णांनी उपचार घेतले आहेत. या रुग्णांवर पालिकेलाच खर्च करावा लागत असून स्थानिक आरोग्य यंत्रणेवर अतिरिक्त ताण पडला आहे. 

फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यापासून पुण्यात कोरोनाची दुसरी लाट येऊन धडकली. साधारणपणे मार्च आणि एप्रिल महिना पुणेकरांसाठी धोकादायक ठरला. या काळात रुग्णालयात खाटा मिळते अत्यन्त अवघड झाले होते. पालिकेच्या जम्बो रुग्णालयासह बाणेर येथील कोवीड रुग्णालय, लायगुडे, दळवी, नायडूसह पालिकेची विविध रुग्णालये अल्पावधीत रुग्णांनी भरून गेली. शासकीय यंत्रणांवरही ताण आला. 

शहरातील खासगी आणि शासकीय रुग्णालयांमधील ऑक्सिजन व व्हेंटिलेटर खाटा वाढविण्यावर भर देण्यात आला. याच काळात पिंपरी-चिंचवड, पुणे ग्रामीण भागात रुग्ण वाढत गेले. स्थानिक यंत्रणा यंत्रणा अपुरी पडत गेली. त्यामुळे या भागातून पुण्यात मोठ्या प्रमाणावर रुग्ण येऊ लागले. यावसबतच अहमदनगर, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर आदी जिल्ह्यांमधूनही कोरोना रुग्ण पुण्यात खासगी आणि पालिकेच्या दवाखान्यात उपचारासाठी येऊ लागले. स्थानिक नातेवाईकांचा पत्ता दाखवून हे रुग्ण उपचार घेऊ लागले. त्यामुळे पुण्यातील आरोग्य यंत्रणेवर पुन्हा ताण आला आहे.------जम्बो रुग्णालय पुन्हा सुरू करण्यात आल्यापासून २३ मार्च ते २३ एप्रिल या कालावधीत एकूण २ हजार २५० रुग्ण दाखल झाले. त्यापैकी १ हजार ६०० रुग्ण महापालिकेच्या हद्दीतील आहेत. तर पिंपरी चिंचवड १००, पुणे ग्रामीण २०० तर  परजिल्ह्यातील ३५० रुग्णांचा यामध्ये समावेश आहे.-----एक रुग्ण सरासरी दहा ते बारा दिवस उपचार घेतो. एका रुग्णावर दिवसाला सरासरी ६ ते ७हजार रुपये खर्च होतो. परजिल्ह्यातील रुग्णांच्या खर्चाचा आर्थिक भार पालिकेवर पडत आहे. परंतु, नागरिक कोणत्या भागातला आहे याचा विचार आम्ही करीत नाही. त्याचे प्राण वाचणे अधिक महत्त्वाचे असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.----- 

२३ मार्च ते २३ एप्रिल जम्बो कोविड सेंटरमधील रुग्णसंख्यापुणे शहर - १६००पिंपरी-चिंचवड-१००पुणे ग्रामीण - २००पुणे जिल्ह्याबाहेरील - ३५०एकूण - २२५०-

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाhospitalहॉस्पिटलcorona virusकोरोना वायरस बातम्याMayorमहापौरcommissionerआयुक्त