Pune Coronavirus news: जिल्हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग यांचे कोरोनाने निधन
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2021 10:21 IST2021-04-03T08:58:39+5:302021-04-03T10:21:03+5:30
Pune Coronavirus news: उपमुख्यमंत्री आणि जिल्हाधिकारी यांच्या प्रयत्नांनाही अपयश.

Pune Coronavirus news: जिल्हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग यांचे कोरोनाने निधन
पुण्याचे जिल्हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. सरग यांना चांगले उपचार मिळावे यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार व जिल्हाधिकारी डाॅ.राजेश देशमुख यांनी खूप प्रयत्न केले, पण त्याच्या प्रयत्नांना यश आले नाही.
राजेंद्र सरग यांना मागील आठवड्यात कार्यालयात असतानाच त्रास होऊ लागल्याने कोरोना चाचणी करण्यात आली. त्याचा कोरोना चाचणीचा रिपोर्ट पाॅझिटिव्ह आल्यावर एका खाजगी हाॅस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. दोन दिवसांतच त्याची प्रकृती प्रचंड खालावल्याने त्यांना ससून रुग्णालयात हलविण्यात आले.ससूनमध्ये शनिवारी पहाटे उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मावळली.
मनमिळावू अधिकारी म्हणून माध्यम क्षेत्र व प्रशासकीय क्षेत्रात त्याचे नावलौकिक होते. जिल्हाधिकारी डॉक्टर राजेश देशमुख यांना सरग यांना कोरोना झाल्याचे समजाताचं त्यांनी अनेक वेळा डॉक्टरांशी संपर्क साधून मदत करण्याच्या सूचना केल्या. मात्र कोरोना पुढे जिल्हाधिकाऱ्यांचे प्रयत्न अपयशी ठरल्याचे वास्तव समोर आले. कालच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील मला फोन केला तरी बेड उपलब्ध होणार नाही असे सांगितले. त्यामुळे परिस्थिती किती भयंकर असल्याचे वास्तव पुढे आले आहे. सरग यांचा माध्यम क्षेत्रात दांडगा संपर्क होता. सामाजिक क्षेत्रातील कार्याबद्दल त्यांना अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले होते. अवघ्या पंधरा दिवसांनी त्यांचे प्रमोशन असल्याने माहिती खात्यामध्ये हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.