Corona virus Pune : पुणे शहरात मंगळवारी २६८ नवे कोरोनाबाधित तर २२६ रुग्णांना मिळाला डिस्चार्ज
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2021 19:31 IST2021-07-06T19:29:47+5:302021-07-06T19:31:02+5:30
खासगी तसेच शासकीय स्वाब तपासणी केंद्रांवर ५ हजार २२८ नागरिकांची तपासणी करण्यात आली.

Corona virus Pune : पुणे शहरात मंगळवारी २६८ नवे कोरोनाबाधित तर २२६ रुग्णांना मिळाला डिस्चार्ज
पुणे : शहरात मंगळवारी दिवसभरात २५८ कोरोनाबाधित आढळून आले असून, २२६ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. दिवसभरात ५ जणांचा मृत्यू झाला असून २ हजार ७१६ सक्रिय रुग्ण आहेत.
खासगी तसेच शासकीय स्वाब तपासणी केंद्रांवर ५ हजार २२८ नागरिकांची तपासणी करण्यात आली.दिवसभरात ५ जणांचा मृत्यू झाला आहे. तर, पुण्याबाहेरील ६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
पालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, २८४ रुग्ण गंभीर असून ४५० ऑक्सिजनवर उपचार घेत आहेत. शहरातील तब्बल २७ लाख २ हजार ९२० जणांची तपासणी करण्यात आली असून, यापैकी ४ लाख ८० हजार १५० नागरिकांना कोरोनाची लागण झाली होती. यापैकी ४ लाख ६८ हजार ८१२ नागरिक कोरोनामुक्त झाले आहेत. शहरात आजपर्यंत ८ हजार ६२२ जणांचा मृत्यू झाला आहे.
--------