Corona virus Pune : पुणे शहरात २२८ नवे कोरोनाबाधित तर ३४४ रुग्णांना मिळाला डिस्चार्ज
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2021 20:12 IST2021-07-13T20:12:36+5:302021-07-13T20:12:47+5:30
पुणे शहरात आत्तापर्यंत तब्बल २७ लाख ४६ हजार ८७७ जणांची तपासणी...

Corona virus Pune : पुणे शहरात २२८ नवे कोरोनाबाधित तर ३४४ रुग्णांना मिळाला डिस्चार्ज
पुणे : शहरात मंगळवारी दिवसभरात २२८ कोरोनाबाधित आढळून आले असून, ३४४ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. दिवसभरात ७ जणांचा मृत्यू झाला असून ८ हजार ८६८ सक्रिय रुग्ण आहेत.
खासगी तसेच शासकीय स्वाब तपासणी केंद्रांवर ५ हजार ८४० नागरिकांची तपासणी करण्यात आली. दिवसभरात ८ जणांचा मृत्यू झाला आहे. तर, पुण्याबाहेरील ४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
पालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, २२८ रुग्ण गंभीर असून ५१० ऑक्सिजनवर उपचार घेत आहेत. शहरातील तब्बल २७ लाख ४६ हजार ८७७ जणांची तपासणी करण्यात आली असून, यापैकी ४ लाख ८२ हजार २५१ नागरिकांना कोरोनाची लागण झाली होती. यापैकी ४ लाख ७० हजार ७२० नागरिक कोरोनामुक्त झाले आहेत. शहरात आजपर्यंत ८ हजार ६६३ जणांचा मृत्यू झाला आहे.
--------