Corona Virus Pune : पुणे शहरात मंगळवारी १०२१ नवे कोरोनाबाधित रुग्ण; २ हजार ८९२ जणांची कोरोनावर मात
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2021 19:23 IST2021-05-18T19:23:35+5:302021-05-18T19:23:47+5:30
पुणे शहरातील विविध रूग्णालयांमध्ये सध्या ५ हजार १० कोरोनाबाधित रूग्ण हे ऑक्सिजनसह उपचार घेत आहेत.

Corona Virus Pune : पुणे शहरात मंगळवारी १०२१ नवे कोरोनाबाधित रुग्ण; २ हजार ८९२ जणांची कोरोनावर मात
पुणे : पुणे शहरात मंगळवारी दिवसभरात केवळ १०२१ जण नवे रूग्ण आढळून आले आहे. तर २ हजार ८९२ जणांनी कोरोनावर मात केली आहे. आज दिवसभरात ९ हजार २५८ जणांनी तपासणी करून घेतली आहे. आजमितीला शहरात १६ हजार ५२३ सक्रिय रूग्ण आहेत.
पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, दिवसभरात ४६ जणांचा मृत्यू झाला असून, यापैकी २२ जण पुण्याबाहेरील आहेत.शहरातील विविध रूग्णालयांमध्ये सध्या ५ हजार १० कोरोनाबाधित रूग्ण हे ऑक्सिजनसह उपचार घेत असून, १ हजार ३६४ रूग्ण हे गंभीर आहेत. शहरात आत्तापर्यंत २३ लाख ८१ हजार २९२ जणांची कोरोना तपासणी करण्यात आली असून, यापैकी ४ लाख ६१ हजार ८ जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. तर यापैकी ४ लाख ३६ हजार ६९० जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर आतापर्यंत शहरात ७ हजार ७९५ जणांचा मृत्यू झाला आहे.