शहरं
Join us  
Trending Stories
1
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
2
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
3
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
4
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
5
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
6
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
7
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
8
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
9
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
10
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
11
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
12
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
13
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
14
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
15
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
16
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
17
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
18
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
19
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
20
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'

Corona virus : कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी ‘एक मीटर ग्रीप्स हँडल’ची निर्मिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2020 18:08 IST

या हँडलच्या भांड्यांचा वापर करून एक मीटर अंतरावरून भाजीपाला, औषधे, वस्तू यांची सुरक्षित अंतर ठेवून देवाणघेवाण करणे शक्य होणार आहे.

ठळक मुद्देरघुनाथ येमुल गुरुजी यांचा पुढाकारसरकारने आणि संशोधकांनी ही कल्पना ऑटोमॅटीक अथवा रोबोटिक स्वरूपात विकसित करावी

पुणे : कोरोनाचा उद्रेक सुरू असताना सोशल डिस्टन्सिंग अतिशूय गरजेचे बनले आहे. एकमेकांपासून अंतर राखून राहणे सुरक्षेच्या दृष्टीने महत्वाचे आहे. हीच बाब लक्षात घेऊन दिव्यांग इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे रघुनाथ येमुल गुरुजी यांनी कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी घरगुती हँडलची निर्मिती केली आहे. या हँडलच्या भांड्यांचा वापर करून एक मीटर अंतरावरून भाजीपाला, औषधे, वस्तू यांची सुरक्षित अंतर ठेवून देवाणघेवाण करणे शक्य होणार आहे. सोशल डिस्टनसिंगची सध्याची गरज लक्षात घेऊन त्यांनी ही संकल्पना प्रत्यक्षात आणली आहे. येमुल यांनी घरगुती वापरासाठी ही संकल्पना तयार केली असून, सरकारने आणि संशोधकांनी ही कल्पना ऑटोमॅटीक अथवा रोबोटिक स्वरूपात विकसित करावी, असे आवाहन केले आहे.कोरोनाच्या संसर्गाची साखळी तोडली जावी, यासाठी शासनाकडून लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे सोशल डिस्टन्सिंग पाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे. याच आवाहनाला प्रतिसाद देत ध्यानगुरु रघुनाथ येमुल गुरुजी यांनी मोठे हँडल असलेल्या भांड्यांची संकल्पना पुढे आणली आहे. वस्तूंची देवाणघेवाण करताना सुरक्षित अंतर राखता यावे, हा यामागचा हेतू आहे. करून येमुल हँडलवर सॅनिटायझरचा वापर करण्यात आला आहे. ऑटोमॅटिक, सेमी ऑटोमॅटिक आणि रोबोटिक्स ग्रीप्स हँडल तयार करताना संशोधकांची, वैद्यकीय तज्ञांचीही मदत घेता येऊ शकते.'दिव्यांग इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्सतर्फे पुण्यातील नागरिकांना स्वत:मध्ये कोरोनाची लक्षणे असतील तर आपणहून पुढे येऊन प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. आपणहून पुढे येणाऱ्या १०८ लोकांना मानधन देण्यात येणार आहे. कोरोनाबाधित आढळलेल्या व्यक्तींना १००० रुपये तर इतरांना १०० रुपये मानधन देण्यात येईल, असे सांगण्यात आले आहे. -----शासन सातत्याने सोशल डिस्टन्सिंग पाळण्याचे नागरिकांना आवाहन करत आहे. दूध, भाजीपाला, औषधे अशा दररोजच्या वस्तूची देवाणघेवाण करताना सुरक्षित अंतर राखणे गरजेचे आहे. त्यासाठीच घरगुती वस्तूंचा वापर करून मी एक मीटर हँडल असलेली भांडी माज्या घरगुती वापरासाठी बनवली आहेत. ही संकल्पना सरकार मोठ्या स्वरूपात विकसित करू शकते. ऑटोमॅटिक अथवा रोबोटीक हँडल तयार केल्यास त्याचा मोठा उपयोग होऊ शकतो. - रघुनाथ येमुल

टॅग्स :PuneपुणेCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसHealthआरोग्य