शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
3
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
4
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
5
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
6
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
7
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
8
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
9
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
10
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
11
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
12
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
13
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
14
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
15
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
16
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
17
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
18
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
19
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
20
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन

Corona virus positive news : दिलासादायक! पुणे जिल्ह्यात आत्तापर्यंत ७ हजार ६१९ रुग्ण झाले कोरोनामुक्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2020 12:05 IST

पुणे जिल्ह्यात रविवारी एका दिवसांत ३६५ नवीन कोरोना बाधित 

ठळक मुद्देजिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या ११ हजार ९२५ वर; एकूण मृत्यू ४९८

पुणे : पुणे जिल्ह्यात रविवार (दि.14) रोजी एका दिवसांत तब्बल ३६५ नवीन रुग्णांची भर पडली. तर १३ रुग्णांचा मृत्यू झाला.यामुळे आत्तापर्यंत जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या ११ हजार ९२५ वर जाऊन पोहचली आहे. गेल्या काही दिवसांत कोरोना बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण देखील वाढले असून, आता पर्यंत ७ हजार ६१९ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर एकूण मृत्यू ४९८ एवढे झाले आहेत. जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या सध्या सर्वांचाच चिंतेचा विषय ठरला आहे. गेल्या काही दिवसांत कोरोना पॉझिटीव्ह रूग्णांची संख्या प्रचंड वेगाने वाढत आहे. त्या तुलनेत बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण मात्र कमी असल्याचे आकडेवारी वरून स्पष्ट होते. जिल्ह्यात रविवारी एका दिवसांत 365 नवीन रुग्ण वाढले तर १६२ रुग्ण बरे होऊन घरी गेले. दरम्यान गेल्या दोन-चार दिवसांत तपासणीचे प्रमाण कमी असताना रूग्ण संख्येचा अंक मात्र मोठे आहेत. ही बाबा सर्वांसाठीच धोक्याचा इशारा असू शकते. 

 पुणे शहरात रविवारी ३२० रूग्णांची वाढ : १२३ जण कोरोनामुक्त पुणे : पुणे शहरात रविवारी ३२० कोरोनाबाधित रूग्णांची वाढ झाली असून, पुणे शहरातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आत्तापर्यंत ९ हजार ५५६ इतकी झाली आहे़ यापैकी ६ हजार २१० रूग्ण कोरोनामुक्त होऊन घरी गेले असून, यातील १२३ जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहे़     पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सद्यस्थितीला शहरातील विविध हॉस्पिटलमध्ये २०३ रूग्ण गंभीर असून, ४५ रूग्ण हे व्हेंटिलेटरवर आहेत़ तर आज दिवसभरात ९ जणांचा मृत्यू झाला आहे़ यामध्ये  ससूनमधील ४ तर खाजगी हॉस्पिटलमधील ५ जणांचा समावेश आहे़       रविवारी वाढ झालेल्या ३२० कोरोनाबाधितांपैकी २६१ जण पालिकेच्या नायडू हॉस्पिटल व आयसोलेशन सेंटरमध्ये तर ससूनमध्ये ७ व खाजगी हॉस्पिटलमध्ये ५२ रूग्ण उपचारासाठी दाखल आहेत़ आज कोरोनामुक्त झालेल्या १२३ जणांपैकी ९० जण हे विविध आयासोलेशन सेंटरमधील असून, खाजगी हॉस्पिटलमधील २४  जण तर ससून हॉस्पिटलमधील ९ जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत़     पुणे शहरात ९ मार्चपासून आजपर्यंत ९ हजार ५५६ कोरोनाबाधित आढळून आले आहेत़ यापैकी ४४८ जणांचा मृत्यू झाला आहे़    आज दिवसभरात २२३ जणांचे स्वॅब तपासणीसाठी प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले असून, आत्तापर्यंत पुणे महापालिका हद्दतील ७१ हजार ४२५ जणांचे स्वॅब  घेण्यात आले आहेत़ प्रयोगशाळेकडून अद्याप १ हजार १३२ जणांचे तपासणी अहवाल येण्याचे बाकी आहेत़     दरम्यान पुणे शहरातील कोरोनाबाधितांचा एकूण आकडा साडेनऊ हजाराच्या पुढे गेला असला तरी,  शहरातील अ?ॅक्टिव (उपचार घेत असलेले कोरोनाबाधित) रूग्ण संख्या २ हजार ९९८ इतकीच आहे़ --------------------------एकूण बाधित रूग्ण : ११,९२५पुणे शहर : ९७६४पिंपरी चिंचवड : ११४५कॅन्टोनमेन्ट व ग्रामीण : १०१६मृत्यु : ४९८बरे झालेले रुग्ण : ७६१९ 

टॅग्स :PuneपुणेNavalkishor Ramनवलकिशोर रामCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाcommissionerआयुक्त