शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
5
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
6
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
7
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
8
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
9
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
10
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
11
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
12
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
13
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
14
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
15
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
16
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
17
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
18
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
19
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
20
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून

Corona virus : पीएमपी कर्मचाऱ्यांनाही हवे ‘सुरक्षा कवच’

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2020 19:35 IST

महापालिकेकेने कर्मचाऱ्यांना एक कोटी रुपयांचे सुरक्षा कवच दिले..

ठळक मुद्देपुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) कर्मचाऱ्यांना वगळण्यात आल्याने नाराजी

पुणे : पुणे महानगरपालिकेतील अधिकारी व कर्मचारी यांना कोरोना विषाणुचा संसर्ग होऊन मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटूंबियांसाठी सुरक्षा कवच ही योजना लागु केली आहे. या योजनेतून पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) कर्मचाऱ्यांना वगळण्यात आल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभुमीवर या योजनेत पीएमपी अधिकारी व कर्मचाऱ्यांचाही समावेश करण्याची मागणी महामंडळाने पालिका आयुक्तांकडे केली आहे.महापालिकेकेने कर्मचाऱ्यांना एक कोटी रुपयांचे सुरक्षा कवच दिले आहे. कर्मचाऱ्याचा कोरोनामुळे मृत्यू झाल्यास कुटूंबियांना एक कोटी रुपये तसेच अनुकंपा तत्वावर नोकरी दिली जाणार आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेनेही अशाच प्रकारचे सुरक्षा कवच तेथील कर्मचाऱ्यांना दिले आहे. मात्र, या योजनेतून पीएमपी कर्मचाऱ्यांना वगळण्यात आले आहे. याबाबत राष्ट्रवादी पीएमपी कामगार युनियनने पीएमपी अध्यक्षा व व्यवस्थापकीय संचालक नयना गुंडे यांच्याकडे सुरक्षा कवच योजनेत समावेशाबाबत मागणी केली होती. त्यानुसार सहव्यवस्थापकीय संचालक अजय चारठणकर यांनी गुरूवारी एका पत्राद्वारे पालिका आयुक्तांकडे ही मागणी केली आहे. पीएमपीकडून सध्या अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना ५० हून अधिक मार्गांवर सुमारे ११० बसमार्फत सेवा पुरविली जात आहे. या बस दररोज रात्री स्वच्छ केल्या जातात. पीएमपीची पुष्पक शववाहिनीही पुरविली जात आहे. पुणे महापालिकेच्या विविध रुग्णालयातील १२८ परिचारिकांना शुक्रवारपसाून मोफत प्रवासाची सवलत देण्यात आली आहे. तसेच महापालिकेने त्यांच्या वाहनांसाठी पीएमपीचे २५ चालकही घेतले आहेत. या यंत्रणेमध्ये पीएमपी अधिकाºयांसह शेकडो कर्मचारी कार्यरत आहेत. या कर्मचाऱ्यां नाही कोरोनाचा धोका आहे. त्यामुळे त्यांनाही सुरक्षा कवच योजना लागु करण्याची मागणी युनियनने केली आहे.

टॅग्स :PuneपुणेPMPMLपीएमपीएमएलNayana Gundeनयना गुंडेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस