Corona virus : ससूनमधून पाच दिवसांतच रुग्ण घरी; दहा दिवस होण्यापूर्वीच मिळतोय डिस्चार्ज

By ऑनलाइन लोकमत | Published: June 1, 2020 02:16 PM2020-06-01T14:16:15+5:302020-06-01T14:16:53+5:30

मागील काही दिवसांत २० हून अधिक रुग्णांना दहा दिवस रुग्णालयात होण्यापुर्वीच घरी सोडण्यात आले आहे.

Corona virus : Patient are going home in 5 days from sasoon hospital; discharg before 10 days incomplete | Corona virus : ससूनमधून पाच दिवसांतच रुग्ण घरी; दहा दिवस होण्यापूर्वीच मिळतोय डिस्चार्ज

Corona virus : ससूनमधून पाच दिवसांतच रुग्ण घरी; दहा दिवस होण्यापूर्वीच मिळतोय डिस्चार्ज

googlenewsNext
ठळक मुद्देसलग तीन दिवस ताप किंवा अन्य लक्षणे नसल्यास दहा दिवसांनी घरी सोडणे अपेक्षित

राजानंद मोरे
पुणे : ससून रुग्णालयातून पाच दिवसांतच रुग्ण बरे होऊन घरी जाऊ लागले आहेत. रुग्णालयात दाखल होण्यापुर्वी लक्षणे सुरू झाल्याच्या दिवसापासून पुढील दहा दिवसांचा कालावधी डिस्चार्जसाठी ग्राह्य धरला जात आहे. त्यामुळे मागील काही दिवसांत २० हून अधिक रुग्णांना दहा दिवस रुग्णालयात होण्यापुर्वीच घरी सोडण्यात आले आहे. दरम्यान, काही खासगी रुग्णालयांकडूनही रुग्णालयात दहा दिवस होण्यापुर्वीच घरी सोडण्यात येत असल्याची माहिती आरोग्य विभागातील सुत्रांनी दिली.
केंद्र सरकारने मे महिन्याच्या दुसऱ्या  आठवड्यात डिस्चार्च प्रोटोकॉल बदलला आहे. या नवीन प्रोटोकॉलनुसार सौम्य लक्षणे असलेले किंवा लक्षणे नसलेल्या रुग्णांना सलग तीन दिवस ताप किंवा अन्य लक्षणे नसल्यास दहा दिवसांनी घरी सोडणे अपेक्षित आहे. पुर्वी सर्व कोरोनाबाधित रुग्णांना १४ दिवसांनंतर दोनदा चाचणी करून ती निगेटिव्ह आल्यास घरी सोडले जात होते. नवीन प्रोटोकॉलमुळे घरी सोडण्यात येणाऱ्या रुग्णांची संख्याही वाढली आहे. ससून रुग्णालयामध्ये सुरूवातीला या प्रोटोकॉलनुसार रुग्णालयात दहा दिवस पुर्ण झाल्यानंतर रुग्णांना घरी सोडले जात होते. पण मागील काही दिवसांपासून हा प्रोटोकॉल बदलण्यात आल्याचे दिसते. महापालिका तसेच काही खासगी रुग्णालयांमध्येही रुग्णालयात दहा दिवस पुर्ण झाल्यानंतरही घरी सोडण्यात येत आहे.
ससून रुग्णालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार, दि. २५ मे रोजी दोन प्रसुती झालेल्या महिलांना रुग्णालयात दाखल झाल्यानंतरच्या सातव्या दिवशी तर एका प्रसुती झालेल्या महिलेला सहाव्या दिवशी तसेच दि. २९ मे रोजी आणखी एका प्रसुती झालेल्या महिलेला पाचव्या दिवशीच घरी सोडण्यात आले. इतर काही रुग्णांनाही सहा ते नऊ दिवसांत घरी सोडण्यात आले आहे. दि. २५ मे पासून या रुग्णांचा आकडा जवळपास २० हून अधिक आहे. याबाबत रुग्णालयाच्या म्हणण्यानुसार, ह्यकेंद्र सरकारच्या प्रोटोकॉलनुसारच डिस्चार्ज दिला जात आहे. लक्षणे असल्यापासूनचे पुढील दहा दिवस गृहित धरले जात आहेत. घरी सोडण्यापुर्वी सलग तीन दिवस लक्षणे नसल्याबाबत तपासणी केली जाते. त्यानंतर घरी सोडण्यात येते. त्यांना पुढील सात दिवस होम क्वारंटाईनच्या सुचना दिल्या जातात.ह्ण दरम्यान, याबाबत प्रभारी अधिष्ठाता डॉ. मुरलीधर तांबे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता होऊ शकला नाही.
--------------
प्रोटोकॉलनुसार रुग्णाचा पॉझिटिव्ह अहवाल आल्यानंतर पुढील दहा दिवसांनी घरी सोडणे अपेक्षित आहे. त्यानुसार पालिकेच्या रुग्णालये व कोविड सेंटरमधून तीन दिवस लक्षणे नसलेल्या रुग्णांना दहा दिवसांनी घरी सोडले जात आहे.
- डॉ. रामचंद्र हंकारे, आरोग्य प्रमुख, पुणे महापालिका
--------------
रुग्णालयाच्या ओपीडीमध्ये रुग्णांचे स्वॅब घेऊन तपासणीसाठी पाठविले जाते. त्यासाठी रुग्णालयात दाखल केल्यानंतर पुढचे दहा दिवसांनी प्रोटोकॉलप्रमाणे घरी सोडण्यात येते.
- डॉ. संजय ललवाणी, वैद्यकीय संचालक, भारती हॉस्पीटल
--------------

Web Title: Corona virus : Patient are going home in 5 days from sasoon hospital; discharg before 10 days incomplete

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.