Corona virus : लोणी स्टेशन येथील रुग्णालयातले एक डॉक्टर व २ परिचारिका कोरोनाबाधित
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2020 00:27 IST2020-04-23T00:26:26+5:302020-04-23T00:27:21+5:30
लोणी स्टेशन येथील रुग्णालयात मिळून आलेल्या कोरोना बाधित महिलेच्या उपचारादरम्यान संपर्कात

Corona virus : लोणी स्टेशन येथील रुग्णालयातले एक डॉक्टर व २ परिचारिका कोरोनाबाधित
कदमवाकवस्ती : लोणी स्टेशन (कदमवाकवस्ती)येथील रुग्णालयात मिळून आलेल्या कोरोना बाधित महिलेच्या उपचारादरम्यान संपर्कात आलेल्या ५१ पैकी एक डॉक्टर व दोन नर्स असे तीन जण कोरोना बाधित असल्याचे आढळून आले आहे. ५१ पैकी ४८ जणांचे कोरोना चाचणी अहवाल बुधवारी (दि. २२) सायंकाळपर्यंत रुग्णालयाला मिळाले आहेत. ४८ पैकी पंचेचाळीस जण निगेटिव्ह आढळून आले आहेत. तीन जणांचे अहवाल प्रलंबित आहेत.
दरम्यान, संबधित महिलेच्या संपर्कात आलेले उरुळी कांचन येथील तिचे नातेवाईक, उपचार करणारे डॉक्टर व दुध, भाजीपाला पुरवणारे लोक असे अठरा जणांचे कोरोना चाचणी अहवाल निगेटिव्ह आले असले तरी, लोणी स्टेशन येथील रुग्णालयात संबंधित महिलेवर उपचार करणा?्यांपैकी एक डॉक्टर व दोन नर्स असे तीन जण कोरोना बाधित आढळून आल्याने लोणी काळभोर व कदमवाकवस्ती ग्रामपंचायत हद्दीत भितीचे वातावरण निर्माण झाले आहे .
या कोरोना बाधित डॉक्टर व दोन नर्स यांना वेगळ्या इमारतीत कोरोटांईन करण्यात आले आहे. तर उर्वरित पंचेचाळीस जनांना रुग्णालयाच्या सहाव्या मजल्यावर कोरोटांईन करण्यात आले आहे. रुग्णालयात व्यवस्थापन पूर्णपणे काळजी घेत असून, कोरोना बाधित तीन जणांच्या नातेवाइकांचीही स्वतंत्र काळजी घेण्यात आली आहे, असे रुग्णालय सुत्रांनी सांगितले