शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

Corona virus : पुणे शहरातील कोरोनाग्रस्तांचा आकडा ४३ ने वाढला; दिवसभरात तीन रुग्णांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2020 21:28 IST

सोमवार ते शनिवार या गेल्या आठवड्याची आकडेवारी पाहिली तर दरदिवसाला सरासरी ५० रुग्ण वाढत आहेत.

ठळक मुद्देएकूण आठ रुग्ण अत्यवस्थ तर चार रुग्णांना सोडले घरी मृत्यू दर १४ टक्क्यांवरून आला १० टक्क्यांवर

पुणे : पुणे शहरातील कोरोनाबाधितांचा आकडा शनिवारी ४३ ने वाढला असून शहरातील कोरोनाग्रस्त रूग्णांची संख्या ५४४ वर पोहचली आहे. दिवसभरात एकूण तीन रुग्णांचा मृत्यू झाला असून कोरोनामधून पूर्णपणे बरे झालेल्या चार रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. विविध रुग्णालयांमध्ये उपचार घेत असलेले आठ रुग्ण मात्र अत्यवस्थ आहेत. महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी सायंकाळी सहापर्यंत शहरात नव्याने ४३ रुग्ण आढळले आहेत. या रुग्णांपैकी ससून रूग्णालयात ०९, नायडू हॉस्पिटलमध्ये १७, रूबी हॉलमध्ये ०८, सह्याद्री रुग्णालय कर्वे रोड येथे १, केईएममध्ये ०२, दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात ०४ तर नोबल हॉस्पिटलमध्ये ०२ रुग्ण दाखल आहेत. शहरातील उपचार घेत असलेल्या रुग्णांपैकी ०८ जणांची प्रकृती चिंताजनक असून यापैकी ससून रूग्णालयात ४ व खाजगी रुग्णालयातील चार जणांचा समावेश आहे.शहरात मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या ५३ झाली असून यामध्ये ससूनमधील एका आणि खासगी रुग्णालयातील दोघांचा समावेश आहे. हे तिघेही विविध आजारांनी ग्रस्त होते. एकूण चार रुग्ण आजारातून बरे झाल्याने घरी सोडण्यात आले असून बरे झालेल्यांची एकूण संख्या ३७ झाली आहे.----------पालिकेने घरोघर सर्वेक्षण सुरू केलेले आहे. त्यासाठी ७७९ पथके नेमण्यात आली आहेत. आतापर्यंत १० लाख ०३ हजार २२१ घरापर्यंत पालिकेची ही पथके पोचली असून ३३ लाख ४० हजार २६९ लोकांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. ------------मृत्यू दर १४ टक्क्यांवरून आला १० टक्क्यांवरसोमवार ते शनिवार या गेल्या आठवड्याची आकडेवारी पाहिली तर दरदिवसाला सरासरी ५० रुग्ण वाढत आहेत. काही दिवसांपूर्वी रुग्ण संख्या कमी होती आणि मृत्यू होण्याचे प्रमाण अधिक होते. गेल्या आठवड्यात हा मृत्युदर जवळपास १४ टक्के होता. या आठवड्यात रुग्ण संख्या वाढली असली तरी मृत्यूचे प्रमाण कमी होऊन १० टक्क्यांवर आले आहे. दर दिवसाला सरासरी तीन रुग्णांचा मृत्यू होत आहे.----------आठवड्यातील संक्रमित रुग्ण व मृत्यूंचा आकडा

तारीख          नवे रुग्ण       मृत्यू१३ एप्रिल        ३३             ०२१४ एप्रिल       ४४              ०४१५ एप्रिल       ५५              ०४१६ एप्रिल       ६५              ०५१७ एप्रिल       ५९             ०३१८ एप्रिल       ४३              ०३ एकूण            २९९            २१

टॅग्स :PuneपुणेCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसDeathमृत्यूhospitalहॉस्पिटल