Corona Virus News : पुणे शहरात गुरूवारीही कोरोनाबाधितांची संख्या ४५० च्यावर; १८४ जण कोरोनामुक्त

By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2021 08:02 PM2021-02-18T20:02:29+5:302021-02-18T20:02:57+5:30

शहरात आजपर्यंत १० लाख ८५ हजार ५३९ हजार जणांची कोरोना तपासणी करण्यात आली.

Corona Virus News : The number of corona victims in Pune city also exceeded 450 on Thursday; 184 corona free | Corona Virus News : पुणे शहरात गुरूवारीही कोरोनाबाधितांची संख्या ४५० च्यावर; १८४ जण कोरोनामुक्त

Corona Virus News : पुणे शहरात गुरूवारीही कोरोनाबाधितांची संख्या ४५० च्यावर; १८४ जण कोरोनामुक्त

googlenewsNext

पुणे : शहरातील कोरोनाचा संसर्ग सातत्याने वाढत असून, पुन्हा नव्या कोरोनावाढीचे आकडे वाढत चालले आहेत. गुरूवारी ४६५ नवे कोरोनाबाधित रूग्ण आढळून आले असून, तपासणीच्या तुलनेत ही टक्केवारी १०. ५१ टक्के इतकी आहे.

पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सायंकाळी सव्वासातपर्यंत शहरातील विविध तपासणी केंद्रांवर ४ हजार ४२४ संशयितांची तपासणी करण्यात आली़ यामध्ये ४६५ जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले. शहरातील सक्रिय रूग्ण संख्याही आता दोन हजाराच्या वर गेली असून, शहरात सक्रिय रूग्ण संख्या आज २ हजार १५६ इतकी झाली आहे. तर विविध रूग्णालयांत ३०८ रूग्ण हे ऑक्सिजनसह उपचार घेत असून, १५४ रूग्ण गंभीर आहेत. दरम्यान कोरोना रूग्ण वाढीच्या प्रमाणात कोरोनामुक्त होण्याचे प्रमाण निम्म्यावर आले असून, गुरूवारी १८४ जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर आज दिवसभरात ९ जणांचा मृत्यू झाला असून, यापैकी ३ जण पुण्याबाहेरील आहेत.

शहरात आजपर्यंत १० लाख ८५ हजार ५३९ हजार जणांची कोरोना तपासणी करण्यात आली असून, यापैकी १ लाख ९६ हजार ३८९ जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. यापैकी १ लाख ८९ हजार ४२१ जण कोरोनामुक्त झाले आहेत. 

Web Title: Corona Virus News : The number of corona victims in Pune city also exceeded 450 on Thursday; 184 corona free

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.