शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
2
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...
3
भाजपा खासदार व्ही. श्रीनिवास प्रसाद यांचं निधन, चार दिवसांपासून ICUमध्ये घेत होते उपचार  
4
अमित शाहांच्या बनावट व्हिडीओप्रकरणी एफआयआर दाखल; तेलंगणा काँग्रेसकडून व्हिडीओ शेअर
5
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
6
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
7
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
8
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
9
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
10
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
11
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
12
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
13
एक-एक वर्षासाठी पंतप्रधानपदाचे वाटप ; ‘इंडिया’चे हेच समीकरण : पंतप्रधान मोदी
14
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
15
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
16
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
17
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
18
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
19
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
20
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर

Corona Virus News : पुणे शहरात सलग चौथ्या दिवशी कोरोनाबाधितांचा आकडा ७०० च्या पार; पिंपरीत ३७० रुग्ण

By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2021 8:00 PM

पुणे शहरात प्रत्यक्षात सक्रिय रुग्णसंख्या ४ हजार ८९६ झाली आहे...  

ठळक मुद्दे४१२ रुग्ण झाले बरे : ६ रुग्णांचा मृत्यू 

पुणे : शहरातील कोरोनाबाधित रुग्णांमध्ये सलग चौथ्या दिवशी ७०० च्या पुढे वाढ झाली असून सक्रीय रुग्णांचा आकडाही वाढला आहे. शनिवारी दिवसभरात ७३९ रूग्णांची वाढ झाली. तर, बरे झालेल्या ४१२ रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. विविध रुग्णालयातील २६० रुग्ण अत्यवस्थ असून दिवसभरात एकूण ६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, प्रत्यक्षात सक्रिय रुग्णसंख्या ४ हजार ८९६ झाली आहे.   

उपचार घेत असलेल्या रुग्णांपैकी २६० जणांची प्रकृती चिंताजनक  आहे. तर, ५०९ रुग्ण ऑक्सिजनवर आहेत. दिवसभरात ६ मृतांची नोंद करण्यात आली आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या ४ हजार ८५३ झाली आहे.  दिवसभरात एकूण ४१२ रुग्ण आजारातून बरे झाल्याने घरी सोडण्यात आले आहेत. आजारातून बरे झालेल्यांची एकूण संख्या १ लाख ९२ हजार ५०१ झाली आहे. तर, एकूण रुग्णसंख्या २ लाख १ हजार ९२८ झाली आहे. सक्रिय रूग्णांची संख्या ४ हजार ८५३  झाली आहे.   -------------   दिवसभरात विविध केंद्रांवर एकूण ८ हजार ४१ नागरिकांची स्वाब तपासणी करण्यात आली असून आतापर्यंत ११ लाख ३६ हजार ३७३ रूग्णांची तपासणी करण्यात आली आहे.

 .... 

पिंपरीत दिवसभरात नवे ३७० रुग्ण : शहरातील चाैघे दगावलेपिंपरी : कोरोनाच्या रुग्णांची संख्या दररोज वाढतच आहे. शहरात शनिवारपर्यंत एकूण एक लाख पाच हजार २८१ नागरिकांना कोरोना विषाणूंचा संसर्ग झाला. त्यात दिलासादायक बाब म्हणजे त्यातील एक लाख ७३ रुग्ण आतापर्यंत कोरोनामुक्त झाले आहेत. शनिवारी दिवसभरात ३७० जणांचा कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला. तर ३३० जण कोरोनामुक्त झाले. 

शहरात शनिवारी महापालिका हद्दीतील चार रुग्णांचा मृत्यू झाला. महापालिका हद्दीतील कोरोना पॉझिटिव्ह मृतांची संख्या आतापर्यंत १८४१ झाली आहे, तर महापालिका हद्दीबाहेरील ७७२ रुग्ण शहरात उपचारादरम्यान दगावले आहेत. शनिवारी दिवसभरात २३२१ संशयित रुग्ण रुग्णालयात दाखल झाले. तसेच दिवसभरात १६४१ जणांचे कोरोना तपासणीचे अहवाल निगेटिव्ह आले. ११८५ जणांचे कोरोना चाचणीचे अहवाल प्रलंबित आहेत. रुग्णालयातून २२८१ जणांना घरी सोडण्यात आले. तर ८३१ रुग्ण रुग्णालयात दाखल आहेत.

टॅग्स :Puneपुणेcorona virusकोरोना वायरस बातम्याPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाhospitalहॉस्पिटल