शहरं
Join us  
Trending Stories
1
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
2
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
3
धक्कादायक! ४००० देऊन भीक मागणाऱ्यांचे स्पर्म गोळा केले, टेस्ट ट्यूब बेबीसाठी लाखो रुपये आकारून लोकांना फसवले! 
4
आजचे राशीभविष्य ३१ जुलै २०२५ : या राशीला धनलाभाचा दिवस, या राशीला काहीसा प्रतिकूल
5
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
6
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
7
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
8
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
9
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
10
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
11
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
12
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
13
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
14
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
15
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप
16
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
17
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
18
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
19
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
20
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?

Corona Virus : दोन दिवस ‘गायब’ असलेल्या 'त्या' कोरोना रुग्णाच्या मृत्यूचीच आली खबर अन् कुटुंबियांवर आभाळ कोसळले

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2020 12:27 IST

प्रशासकीय गोंधळ थांबेना : रुग्णाचे मोबाईल, घड्याळ, पाकिटही गायब

पुणे : कोरोनावरील उपचारांसाठी गरवारे महाविद्यालयातील कोविड सेंटरमध्ये दाखल करण्यात आलेल्या रुग्णाला परस्पर जम्बो रुग्णालयात हलविल्यानंतर दोन दिवस हा रुग्ण नेमका कुठे आहे याचीच माहिती नातेवाईकांना मिळाली नाही. दोन्हीकडून आमच्याकडे हा रुग्णच नाही अशी उत्तरे देण्यात येत होती. तिसऱ्या दिवशी मात्र पोलिसांचा अंत्यदर्शनासाठी या असा फोन आला आणि कुटुंबियांवर आभाळ कोसळले. प्रशासकीय गोंधळामुळे कुटुंबियांना या रुग्णाशी शेवटचा संवादही साधता आला नाही.

कसबा पेठेतील आलोकनगरी सोसायटीमध्ये राहणाऱ्या एका नागरिकाला कोरोनावरील उपचारांसाठी 23 ऑगस्ट रोजी गरवारे महाविद्यालयातील कोविड केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात आले होते. उपचार सुरु असतानाच त्यांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. ऑक्सिजनची मात्रा कमी झाल्याने त्यांना 30 ऑगस्ट रोजी जम्बो कोविड सेंटरमध्ये हलविण्यात आल्याचे कुटुंबियांना सांगण्यात आले. त्यामुळे सर्व नातेवाईक जम्बो कोविड सेंटरवर चौकशी करण्यासाठी गेले. तेथे  हा रुग्ण जम्बोमध्ये नसल्याचे सांगण्यात आले. कुटुंबियांनी वारंवार विनंती केल्यानंतरही केवळ रुग्णाची नोंद दिसत नाही, इथे रुग्ण नाही अशी उत्तरे दिली जात होती. 30 ऑगस्ट ते 2 सप्टेंबर या कालावधीत नातेवाईक जम्बो रुग्णालयाच्या बाहेर बसून  होते. आपला रुग्ण नेमका गेला कुठे याचा शोध घेत होते. जम्बोचे अधिकारीही त्यांना आम्हीही त्यांचा शोध घेत आहोत असे सांगत होते.

दोन्ही ठिकाणी रुग्ण सापडत नसल्याने हवालदिल झालेल्या कुटुंबियांना अखेर 2 सप्टेंबर रोजी पोलिसांना फोन आला. त्यांनी, रुग्णाचा मृत्यू झाला असून  त्याच्या अंत्यदर्शनासाठी या असे सांगितले. या रुग्णाचा जम्बो रुग्णालयातच मृत्यू झाल्याचे समोर आले. चार दिवस शोध घेऊनही जम्बोमध्येच उपचार घेत असलेल्या रुग्णाचा शोध लागला नाही हे प्रकरण गंभीर आहे. दोन दिवस कोणत्याही नोंदीमध्ये न दिसणारा रुग्ण मृत्यू झाल्यानंतर कसा काय आढळतो असा प्रश्न निर्माण झाला आहे.  या रुग्णाकडे असलेल्या पिशवीसह मोबाईल, पाकीट आदी वस्तू गहाळ झाल्याचे नातेवाईकांचे म्हणणे आहे. या सर्व प्रकाराची चौकशी करुन तात्काळ कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे. 

टॅग्स :Puneपुणेcorona virusकोरोना वायरस बातम्याhospitalहॉस्पिटलPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाcommissionerआयुक्तPoliceपोलिस