शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात ३९४ ठिकाणी 'नमो उद्यान' विकसित करणार; नरेंद्र मोदींच्या वाढदिवशी एकनाथ शिंदे यांची घोषणा
2
माँसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर रंग फेकला, ठाकरे गट आक्रमक, दादरमध्ये तणाव
3
सॉवरेन गोल्ड बॉंड गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी! ६ वर्षांत १८३% परतावा, RBI ने जाहीर केली मुदतीपूर्वीची किंमत
4
आता जेवढा जीएसटी कमी झालाय ना, तेवढ्याला १९८६ मध्ये बुलेट मिळत होती...
5
पंतप्रधान नरेंद्र मोदींवरील बायोपिकची घोषणा, हा अभिनेता साकारणार भूमिका, पोस्टर रिलीज
6
"२४ तासांच्या आत कळलं पाहिजे"; मीनाताईंच्या पुतळ्यावर रंग फेकल्याच्या प्रकरणावरुन राज ठाकरेंचा इशारा
7
जय शाह आणि अनुरग ठाकूर शाहिद आफ्रिदीला भेटले? जाणून घ्या 'त्या' VIDEO चे सत्य...
8
मारुती व्हिक्टोरिससाठी २ लाखांचे डाऊनपेमेंट केले तर किती बसेल EMI? बेस मॉडेलसाठी...
9
लग्नाच्या अवघ्या २०व्या दिवशी नवरी झाली फरार; नवऱ्याला म्हणाली लवकर जाऊन येते अन्...
10
पगारापेक्षा जास्त घरभाडे; SEBI ने आपल्या प्रमुखांसाठी घेतले अपार्टमेंट, मासिक भाडे तब्बल ₹७ लाख
11
एटीएममधून पैसे निघाले नाहीत, तरी अकाउंटमधून कट झाले? फक्त या स्टेप फोलो करा, बँक स्वतः देईल भरपाई
12
"आज आजोबा हयात असते, तर धर्माच्या नावाखाली जे..."; प्रबोधनकारांसोबतचा फोटो, राज ठाकरेंनी कुणाचे टोचले कान?
13
Chota Rajan: गँगस्टर छोटा राजनला सर्वोच्च न्यायालयाचा दणका, जया शेट्टी हत्या प्रकरणात जामीन रद्द!
14
५८ किलो सोने, ८ कोटी रोकड चोरीला; SBI बँकेत दरोडा, महाराष्ट्र-कर्नाटक पोलिसांकडून चोरांचा शोध
15
"अभिषेकच्या शेजारीच माझ्यावर अंत्यसंस्कार करा"; भावाच्या मृत्युनंतर बहिणीने संपवलं आयुष्य, हातावरच लिहिली शेवटची इच्छा
16
अपघाताने आयुष्य उद्ध्वस्त! स्ट्रेचरवर जखमी पत्नी अन् शेजारी पतीचा मृतदेह; डोळे पाणावणारा फोटो
17
चिंताजनक! मेंदू खाणाऱ्या अमिबाने घेतला १८ जणांचा जीव, तापासह 'ही' लक्षणं दिसताच व्हा सावध
18
PM Modi Birthday: ७५ वर्षांचे झाले नरेंद्र मोदी! ११ वर्षांच्या कार्यकाळात शेअर बाजार सुस्साट, २४०% ची वाढ, काय आहेत कारणं?
19
अदलाबदली! २ मुलांचा बाप 'मेहुणी'सोबत पळाला; भाऊ चिडला, भावोजीच्या 'बहिणी'सोबत छूमंतर

Corona Virus News: पुणे शहरात शनिवारी ३२८ तर पिंपरीत १६१ नवे कोरोना रुग्ण 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2020 21:20 IST

पुणे शहरातील आतापर्यंत ८ लाख ८२ हजार १३५ रूग्णांची तपासणी

पुणे : शहरातील कोरोनाबाधित रुग्णांमध्ये शनिवारी दिवसभरात ३२८ रूग्णांची वाढ झाली. तर, दिवसभरात बरे झालेल्या २७९ रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. विविध रुग्णालयातील ३८८ रुग्ण अत्यवस्थ असून दिवसभरात एकूण ८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, प्रत्यक्षात सक्रिय रुग्णसंख्या ५ हजार १०२ झाली आहे.   

उपचार घेत असलेल्या रुग्णांपैकी ३८८ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. यातील २३७ रुग्ण व्हेंटिलेटरवर असून १५१ रुग्ण आयसीयूत उपचार घेत आहेत. तर, ८३० रुग्ण ऑक्सिजनवर आहेत. दिवसभरात ८ मृतांची नोंद करण्यात आली आहे.  कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या ४ हजार ५७२ झाली आहे. पुण्याबाहेरील ८ मृत्यूची नोंद करण्यात आली.

दिवसभरात एकूण २७९ रुग्ण आजारातून बरे झाल्याने घरी सोडण्यात आले आहेत. आजारातून बरे झालेल्यांची एकूण संख्या १ लाख ६६ हजार ६९ झाली आहे. तर, एकूण रुग्णसंख्या १ लाख ७५ हजार ७४३ झाली आहे. सक्रिय रूग्णांची संख्या ५ हजार १०२ झाली आहे.   -------------   दिवसभरात विविध केंद्रांवर एकूण २ हजार ९२९ नागरिकांची स्वाब तपासणी करण्यात आली असून आतापर्यंत ८ लाख ८२ हजार १३५ रूग्णांची तपासणी करण्यात आली आहे. .... पिंपरीत दिवसभरात ७७ कोरोनामुक्त : २३२३ जणांना डिस्चार्जपिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रात कोरोना विषाणूंचा संसर्ग वाढत आहे. शनिवारी १६१ जणांचा कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यामुळे शहरातील पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ९५२३१ झाली. तर दिवसभरात १६१ जण कोरोनामुक्त झाले. २४०७ संशयित रुग्ण रुग्णालयात दाखल झाले. तसेच दिवसभरात १९६७ जणांचे कोरोना तपासणीचे अहवाल निगेटिव्ह आले.

शहरात शनिवारी दिवसभरात महापालिका हद्दीतील एक रुग्ण दगावला. महापालिका हद्दीतील कोरोना पॉझिटिव्ह मृतांची संख्या आतापर्यंत १७३४ तर महापालिका हद्दीबाहेरील ७१३ रुग्ण शहरात उपचारादरम्यान दगावले आहेत. शनिवारी दिवसभरात १९१३ जणांचे कोरोना चाचणीचे अहवाल प्रलंबित आहेत. रुग्णालयातून २३२३ जणांना घरी सोडण्यात आले. तर ७५४ रुग्ण रुग्णालयात दाखल आहेत.पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीबाहेरील १०२ रुग्ण शहरातील रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत. महापालिका हद्दीबाहेरील ७२८२ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर महापालिका हद्दीतील ९१७८४ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. 

टॅग्स :Puneपुणेcorona virusकोरोना वायरस बातम्याPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाShraddha Kapoorश्रद्धा कपूर