शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

Corona virus : कोरोना नियंत्रणासाठी पुणे शहरासह जिल्ह्यात ‘मुंबई पॅटर्न’राबवा : आरोग्य मंत्री राजेश टोपे

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2020 18:57 IST

जिल्ह्यात खासगी रुग्णालयातील बेड्स ताब्यात घ्या.

ठळक मुद्देशासकीय निर्देशाचे पालन न करणाऱ्या रुग्णालयांवर कडक कारवाईचे आदेश

 पुणे : पुणे शहरासह जिल्ह्यात कोरोना चाचण्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. परिणामी दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांची वाढ होत आहे. त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी मुंबई शहराच्या धर्तीवर पुण्यात उपाययोजना करण्याची गरज असून, पुणे शहरासह जिल्ह्यात ‘मुंबई पॅटर्न’राबवा अशा सूचना राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी जिल्हा प्रशासनास दिल्या.कोरोना प्रतिबंधात्मक उपायोजनेचा भाग म्हणून मुंबई शहराच्या धर्तीवर पुणे शहरासह जिल्ह्यात खासगी रुग्णालयातील बेड्स ताब्यात घेऊन, त्या रुग्णालयात एक जबाबदार अधिकाऱ्याची नियुक्ती करावी. संबंधित अधिकाऱ्याांनी कार्यालय व्यवस्थापनाच्या मदतीने एक फ्लोचार्ट करावा. त्यामध्ये रुग्णालयात किती बेड्स उपलब्ध आहेत. त्यापैकी आयसीयूचे बेड, व्हेंटीलेटर बेडस, पीपीई कीट, मास्क इत्यादी बाबी नमूद कराव्यात. जेणेकरुन नागरिकांना त्याचा लाभ होईल. तसेच कोरोनाबाधित रुग्णांकडून जादा पैसे घेणाऱ्या शासकीय निदेर्शाचे पालन न करणाऱ्या खासगी रुग्णालयावर कडक कारवाई करण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या. याचबरोबर महात्मा फुले जन आरोग्य योजनेतून रुग्णावर मोफत उपचार करण्यास प्राधान्य द्यावे असेही त्यांनी सांगितले.स्थानिक प्रशासनाने लोकप्रतिनिधींना सोबत घेवून काम करतानाच, लोकांच्या मनात कोरोना विषाणू विषयीची भीती कमी करण्यासाठी सोशल मीडिया तसेच दूरचित्रवाणी, होर्डिग्ज, भिंतीपत्रके, रेडीओ यांचा वापर करून जनजागृती करावी. आज लहान बाळापासून ते वयोवृध्द आजीपर्यंत अनेकजण कोरोनामुक्त झाले आहेत. अशा व्यक्तींच्या अनुभवातून यशकथा तयार कराव्यात. कंटेन्मेंट झोनमध्ये किती लोकांना संसर्ग झाला याची माहिती जास्तीत जास्त चाचणीद्वारे मिळणार आहे. त्यामुळे नागरिक हा केंद्रबिंदू मानून माणुसकी आणि मानवतेच्या दृष्टिने सर्वांनी एकत्र येवून कोरोना विषाणूवर मात करावे, असे आवाहनही टोपे यांनी केले.

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाRajesh Topeराजेश टोपेhospitalहॉस्पिटलCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस