शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
2
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
3
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
4
15 दिवसांत उत्तर द्या, अन्यथा...; विजय वडेट्टीवार यांना न्यायालयाचा अवमान केल्याची नोटीस
5
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
6
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
7
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
8
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
9
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
10
४,४,४,४,४,४,६,४,६,६! जॅक फ्रेझर मॅकगर्कची वादळी फिफ्टी; आर अश्विनने RR मिळवून दिली पहिली विकेट 
11
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!
12
रिषभची विकेट घेऊन युझवेंद्र चहलने इतिहास घडवला; ट्वेंटी-२०त पराक्रम करणारा पहिला भारतीय
13
EVM मशीनची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल 
14
'अडीच कोटीत EVM हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...
15
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : महाराष्ट्रात तिसऱ्या टप्प्यात ५४.०९ टक्के मतदान
16
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
17
पॅट कमिन्सने असं काय सांगितलं की हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव यांना बसला शॉक?
18
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
19
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
20
रवींद्र महाजनींच्या निधनानंतर आत्महत्या करायला गेला होता गश्मीर, म्हणाला -"मी टेरेसवर गेलो आणि..."

Coronavirus Mini Lockdown in Pune: अजित पवारही प्रशासनासमोर झुकले; पुण्यात 'मिनी लॉकडाऊन'ची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 02, 2021 4:19 PM

Coronavirus Mini Lockdown in Pune: जाणून घ्या काय आहे नियमावली, काय बंद अन् काय सुरू?

ठळक मुद्देसायं. ६ ते सकाळी ६ वाजेपर्यंत संचारबंदी, दिवसा जमावबंदी

पुणे : कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे पुण्यात शनिवारपासून (दि. ३) सात दिवस कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत.  सायंकाळी ६ ते सकाळी ६ वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात येणार आहे. दिवसभर जमावबंदी लागू असणार आहे. हाॅटेल, बार, माॅल, धार्मिक स्थळे बंद राहणार आहेत.  पीएमपी बससेवा बंद राहणार आहे. 

पुण्यातील विभागीय आयुक्त कार्यालयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आणि सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत कोरोनाचा आढावा घेण्यासाठी बैठक झाली. या वेळी पुणे शहर, पिंपरी चिंचवड आणि जिल्ह्यात कडक निर्बंध लावण्याचा निर्णय घेण्यात आला. 

विभागीय आयुक्तसौरभ राव म्हणाले,  लोकांना त्रास होऊ नये म्हणून मध्यम मार्ग स्वीकारण्याचा प्रयत्न केला आहे. मायक्रो कंटेन्मेंट झोनमध्ये नियम कडक केले जाणार आहेत. होम आयसोलेशनमधील रुग्णांच्या तपासणीवर भर देण्यात येणार आहे. त्यांची ब्लड टेस्ट करून त्यांच्यावर लक्ष ठेवण्यात येईल. खासगी रुग्णालयांच्या बिलांचे ॲाडिट पुन्हा सुरू केले जाईल. पॅाझिटिव्हिटी २७% वरून ३२% वर गेला आहे. आठवड्याचा ग्रोथ रेट हाच राहिला तर दिवसाला ९ हजार रुग्ण सापडतील. हॉस्पिटल बेडसंदर्भात काल बैठक झाली. काही रुग्णालये १००% कोविड हॅास्पिटल करण्याची वेळ येऊ शकते.

पुण्याचे सहपोलीस आयुक्त रवींद्र शिसवे म्हणाले, चेक पोस्ट, पेट्रोलिंग सुरू करणार आहोत. खासगी कार्यालयांवर काही बंदी नाही. आधीप्रमाणेच सुरू राहणार असून  शाळा, कॉलेज बंद राहणार आहे. पुण्यात दिवसा जमावबंदी तर रात्री संचारबंदी राहणार आहे. शहरातील हॉटेलमध्ये सायंकाळी ६ पर्यंत अन्नपदार्थ मिळतील, पण त्यानंतर ॲपद्वारे ऑर्डर स्वीकारल्या जाणार आहे. 

लसीकरणाबाबत बोलताना राव म्हणाले, पुण्यात सर्वात जास्त लसीकरण सुरू आहे. शंभर दिवसांत लसीकरण पूर्ण करण्यासाठी मिशन १०० डेज सुरू करण्यात येणार आहे. 

मंडई आणि मार्केट यार्ड सुरू राहणार आहे. पण ग्राहकांना सुरक्षित अंतर ठेवून खरेदी करावी लागणार आहे. गार्डन आणि जिम सकाळच्या वेळेत सुरू राहणार आहे.

निर्बंधाच्या नावाखाली लाॅकडाऊनच लादल्याने नागरिकांत प्रचंड संतापपुण्यामध्ये निर्बंधाच्या नावाखाली लाॅकडाऊनच लावल्याने प्रचंड संताप व्यक्त हाेत आहे. सायंकाळी सहा वाजल्यापासूनच संचारबंदी लागू करण्याचे कारणच काय, असा प्रश्न विचारला जात आहे. सहा वाजल्यापासून संचारबंदीमुळे राेजंदारीवर काम करणाऱ्यांच्या राेजगाराचा प्रश्न निर्माण हाेणार आहे. त्यांना कामच करणे शक्य हाेणार नाही. हाॅटेलची वेळही सहा वाजेपर्यंतच केल्याने या उद्याेगावर विपरीत परिणाम हाेणार आहे. त्याचबराेबर नागरिकांनाही त्रास हाेणार आहे. एकटे राहणाऱ्यांना, विद्यार्थ्यांना त्याचा फटका बसणार आहे. पुण्यातील पीएमपी सेवा बंद करण्यासही विराेध केला आहे. भारतीय जनता पक्षानेही या निर्णयाला विरोध केला आहे. पुणे आणि  परिसरातून हजाराे कामगार दरराेज पीएमपी बसने प्रवास करून कामाच्या ठिकाणी जातात. त्यांना पाेहाेचता येणार नसल्याने उद्याेगचक्रावर परिणाम हाेणार असल्याचे खासदार गिरीश बापट यांनी सांगितले.  संचारबंदी नको तर जमावबंदी करा, अशी मागणीही बापट यांनी केली. 

अत्यावश्यक सेवा सुरू राहणारमेडिकल दुकाने, दूध, भाजीपाला या अत्यावश्यक सेवांसह वृत्तपत्र सेवा सुरू राहणार आहे. औद्याेगिक आस्थापना, कार्यालयांवर काेणतेही निर्बंध नाहीत. कार्यालयांमध्ये ५० टक्के उपस्थितीची अट कायम आहे. किराणा मालाची दुकाने मात्र सकाळी सहा ते सायंकाळी सहा वाजेपर्यंतच सुरू राहणार आहेत, असे साैरभ राव यांनी स्पष्ट केले. 

कामावरून परतणाऱ्यांना पोलीस त्रास देणार नाहीतसायंकाळी सहानंतर संचारबंदी असली तरी कामावरून परतणाऱ्यांना पोलीस त्रास देणार नाहीत. कारण बहुतांश कार्यालये सायंकाळी सहानंतरच बंद होतात, असे सहपोलीस आयुक्त रवींद्र शिसवे यांनी स्पष्ट केले. 

मिनी लाॅकडाऊनचे नियम* अत्यावश्यक गोष्टी सोडून सायंकाळी ६:०० ते सकाळी ६:०० सर्व गाेष्टी बंद* दिवसा जमावबंदी. रात्री संचारबंदी, सर्व धार्मिक स्थळे बंद, उद्याने सकाळी सुरू राहणार* लग्न, अंतिम संस्कार सोडून सर्व कार्यक्रम बंद* हॉटेल, रेस्टॉरंट, मॉल पुढील ७ दिवसांसाठी बंद, होम डिलिव्हरी मात्र सुरू राहणार* पीएमपीएमएलची बससेवा सात दिवसांसाठी बंद*  लग्नसमारंभात ५० पेक्षा अधिक लोक चालणार नाही, अंत्यविधीसाठी २० लोकांचीच परवानगी* सार्वजनिक उद्याने, बागबगीचे फक्त सकाळीच सुरू, आठवडा बाजार सात दिवस बंद*  शनिवारपासून सर्व निर्णयांची अंमलबजावणी होणार *  शाळा, कॉलेज ३० एप्रिलपर्यंत बंद राहणार. मात्र परीक्षा वेळेत होणार

.........

पुण्यात मागच्या आठवड्यापेक्षा गंभीर परिस्थिती आहे. बेडच उपलब्ध झाले नाही तर काय करायचे? एखाद्या घरात कोरोना रुग्ण असेल तरी घरातील लोक गावभर फिरतात. संख्या आवाक्याबाहेर गेली तर अजित पवार यांना फोन केला तरी बेड मिळायचे नाही. काही हाॅस्पिटल पूर्णपणे काेराेनासाठी ठेवा. नाॅन कोविड हाॅस्पिटलची यादीही  जाहीर करा. आरोग्य यंत्रणेवर, पोलिसांवर ताण असून प्रशासनाला नागरिकांनी सहकार्य करण्याची आवश्यकता आहे.  - अजित पवार, उपमुख्यमंत्री

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसcorona virusकोरोना वायरस बातम्याAjit Pawarअजित पवारcommissionerआयुक्तSaurabh Raoसौरभ राव