शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

Corona virus : पुणे विभागात एकाच दिवसांत 186 नवीन कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांची वाढ; 10 रूग्णांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2020 20:09 IST

आजपर्यंत विभागामधील 78 लाख 94 हजार 830 घरांचे सर्वेक्षण पूर्ण.

ठळक मुद्देपुणे विभागातील 673 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन गेले घरी

पुणे : पुण्यासोबतच आता सातारा आणि सोलापूर जिल्ह्यात देखील कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या प्रचंड वेगाने वाढत आहे. पुणे विभागात मंगळवारी सायंकाळी 4 ते बुधवार (दि.6) सायंकाळी 4 या चोवीस तासांमध्ये तब्बल 186 नवीन कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या वाढ झाली आहे, तर 10 रूग्णांचा कोरोनामुळे बळी देखील गेला आहे. यामध्ये सर्वाधिक वाढ अर्थातच पुणे जिल्ह्यात 165, सोलापूर 10 , सातारा 10 सांगली जिल्ह्यात एका नवीन रूग्णांची भर पडली आहे . तर कोल्हापूर जिल्ह्यात नवीन रूग्ण वाढला नाही. तर गेल्या 24 तासांमध्ये विभागात मृत्यु होणाऱ्या रूग्णांची संख्या देखील वाढली असून एका दिवसांत 10 रूग्णांनी आपला जीव गमावला आहे. पुणे विभागातील 673 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून, कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 2 हजार 574 वर जाऊन पोहचली आहे. तर ॲक्टीव रुग्ण 1 हजार 764 आहेत. विभागात कोरोनाबाधीत एकुण 137 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 93 रुग्ण गंभीर असून उर्वरीत निरीक्षणाखाली आहेत, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिली.    यापैकी पुणे जिल्हयातील 2 हजार 287 बाधीत रुग्ण असून 608 कोरोना बाधित रुग्ण बरे होवून घरी गेलेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 1 हजार 555 आहे. कोरोनाबाधित एकूण 124 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 86 रुग्ण गंभीर असून उर्वरित निरीक्षणाखाली आहेत.     सातारा जिल्हयात 92 बाधीत रुग्ण असून 2 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सोलापूर जिल्हयात 145 बाधीत रुग्ण असून 9 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सांगली जिल्हयात 35 बाधीत रुग्ण असून 1 रुग्णाचा मृत्यू झाला आहे. कोल्हापूर जिल्हयात 15 बाधीत रुग्ण असून 1 रुग्णाचा मृत्यू झाला आहे.    आजपर्यत विभागामध्ये एकुण 26 हजार 326 नमूने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते त्यापैकी 25 हजार 4 चा अहवाल प्राप्त झाला आहे. तर 1 हजार 322 नमून्यांचा अहवाल प्रतीक्षेत आहे. प्राप्त अहवालांपैकी 22 हजार 106 नमून्यांचा अहवाल निगेटीव्ह असून 2 हजार 574 चा अहवाल पॉझिटिव्ह आहे.    आजपर्यंत विभागामधील 78 लाख 94 हजार 830 घरांचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले असून त्याअंतर्गत 3 कोटी 12 लाख 96 हजार 465 व्यक्तींची तपासणी केली आहे. त्यापैकी 1 व्यक्तींना अधिक तपासणीसाठी संदर्भीत करण्यात आले आहे.    

----:पुणे विभागाची माहितीजिल्हा कोरोना    रूग्ण     मृत्यु पुणे                    2287      124सातारा               92           02सोलापूर              145         09सांगली               35           01कोल्हापूर            15             01एकूण                2574         137

 

टॅग्स :PuneपुणेCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसDeathमृत्यूcommissionerआयुक्तNavalkishor Ramनवलकिशोर राम