Corona virus : पुणे शहरात सोमवारी १ हजार ८१७ कोरोनाबाधित रूग्णांची वाढ : ८३० जण कोरोनामुक्त

By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2020 12:04 PM2020-07-21T12:04:22+5:302020-07-21T12:04:46+5:30

शहरातील कोरोना बाधितांची एकूण संख्या ३९ हजार २०३

Corona virus : Increase of 1 thousand 817 corona patients in Pune city on Monday: 830 corona free | Corona virus : पुणे शहरात सोमवारी १ हजार ८१७ कोरोनाबाधित रूग्णांची वाढ : ८३० जण कोरोनामुक्त

Corona virus : पुणे शहरात सोमवारी १ हजार ८१७ कोरोनाबाधित रूग्णांची वाढ : ८३० जण कोरोनामुक्त

Next

पुणे : शहरात पुकारण्यात आलेल्या सहाव्या लॉकडाऊनमध्ये जास्तीत जास्त नागरिकांच्या तपासण्या करून कोरोनाबाधित रूग्णांना विलग करण्याचे काम सध्या सुरू आहे. याचमुळे दिवसेंदिवस कोरोनाबाधित रूग्णांची संख्या वाढत असून, सोमवारी तब्बल १ हजार ८१७ कोरोनाबाधित रूग्ण नव्याने आढळून आले आहेत. दरम्यान आज दिवसभरात ८३० कोरोनाबाधित रूग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. 

पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शहरातील एकुण कोरोनबाधितांची संख्या  ३९ हजार २०३ इतकी झाली आहे. सद्यस्थितीला शहरातील विविध रूग्णालयात उपचार घेत असलेल्या गंभीर रूग्णांची संख्या ही ५९१ वर गेली असून, ९६ कोरोनाबाधित व्हेंटिलेटरवर आहेत.

सोमवारी रात्री साठेआठपर्यंत नोंदविण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, ६ हजार ९१८ नागरिकांचे स्वाब तपासणीसाठी घेण्यात आले असून, आत्तापर्यंत २ लाख ९ हजार २२२ जणांचे स्वाब घेण्यात आले आहेत. यापैकी ३९ हजार ३०३ जण कोरोना पॉझिटिव्ह आले आले आहेत. 

सद्यस्थितीला शहरातील विविध हॉस्पिटलमध्ये तसेच महापालिकेच्या आयसोलेशन सेंटरमध्ये १४ हजार ७५७ कोरोनाबाधित रूग्ण उपचार घेत असून, आत्त्तापर्यंत २३ हजार ४४१ जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत.

सोमवारी कोरोनामुळे मूत्यू झालेल्यांचा आकडा हा एक हजाराच्या पुढे गेला असून, आज ३१  कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. आज कोरोनामुळे शहरात ३१ जणांचा मृत्यू झाला.

--------------------------------

Web Title: Corona virus : Increase of 1 thousand 817 corona patients in Pune city on Monday: 830 corona free

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.