शहरं
Join us  
Trending Stories
1
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
2
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
3
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे निधन
4
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
5
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
6
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
7
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
8
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
9
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
10
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना
11
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
12
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 
13
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
14
'हार मानणार नाही..'; कार्तिक आर्यनच्या 'चंदू चँपियन'चा ट्रेलर, मराठमोळ्या हेमांगी कवीने वेधलं लक्ष
15
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास
16
केजरीवाल यांचे माजी पीए बिभव कुमार अखेर अटकेत; स्वाती सहज बाहेर पडल्या, ‘आप’ने जारी केला व्हिडीओ 
17
'सिंघम 3' च्या सेटवरुन अजय देवगण-जॅकी श्रॉफचा फाईट सीन लीक, व्हिडीओ व्हायरल
18
आता भाजप सक्षम, सगळे निर्णय स्वबळावर; रा.स्व. संघाची मदत घेण्याबाबत जे.पी.नड्डा यांचे मत
19
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
20
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 

Corona virus : नायडू, ससूनला जायचंय...सॉरी! खासगी रुग्णवाहिका मिळणे कठीण

By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2020 5:49 PM

कोरोनासदृश लक्षणे म्हणजे सर्दी, ताप, खोकला असेल तर किंवा नायडू, ससूनला जायचे असेल तर अनेक चालकांकडून थेट नकार

ठळक मुद्देपुणे व पिंपरी चिंचवड शहरांमध्ये सुमारे २०० च्या जवळपास खासगी रुग्णवाहिका

पुणे : शहरातील कोरोनो विषाणुचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने आता खासगी रुग्णवाहिका सहजासहजी उपलब्ध होणे दुरापास्त झाले आहे. कोरोनासदृश लक्षणे म्हणजे सर्दी, ताप, खोकला असेल तर किंवा नायडू, ससूनला जायचे असेल तर थेट नकार मिळत आहे. रुग्णवाहिका चालविण्यास चालकही नकार देत असल्याचे रुग्णवाहिका मालकच मान्य करत आहेत. तसेच अनेक चालकांकडून सुरक्षा कीटची मागणी केली जात असल्याने मालकांनीही हात टेकले आहेत.पुणे व पिंपरी चिंचवड शहरांमध्ये सुमारे २०० च्या जवळपास खासगी रुग्णवाहिका आहेत. तसेच रुग्णालयांच्या रुग्णवाहिकाही उपलब्ध आहेत. पण सध्या कोरोना संकटामुळे सहजासहजी रुग्णवाहिका मिळणे कठीण झाले आहे. शासनाची सेवा असलेल्या १०८ ही रुग्णवाहिकाही वेळेत उपलब्ध होत नसल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत. त्यामुळे खासगी रुग्णवाहिकांवर अवलंबून राहावे लागत आहे. पण रुग्णवाहिकांना चालक उपलब्ध होत नसल्याने उभ्या आहेत. रुग्णांना रुग्णालयापर्यंत नेण्यासाठीही अनेकांच्या हातापाया पडावे लागत आहे. याविषयी बोलताना पुणे जिल्हा अ‍ॅम्ब्युलन्स असोसिएशनचे अध्यक्ष हम्पलिंग भद्रे म्हणाले, कोरोनामुळे अनेक चालक आपल्या गावी निघून गेले आहेत. इथे असलेले चालकही सहजपणे उपलब्ध होत नाहीत. तसेच रुग्णालयात जाण्यासाठी फोन आला तरी आधी त्यांच्याकडे आजाराबाबत विचारणा केली जाते. सर्दी, ताप, खोकला अशी कोणतीही लक्षणे असतील तर रुग्णवाहिका जात नाही. त्यांना १०८ ला फोन करायला सांगितले जाते. इतर ससून किंवा नायडूला जायचे असेल तरीही चालक नकार देतात. त्यांच्याकडून सुरक्षेचा मुद्दा उपस्थित केला जातो.ह्यखासगी रुग्णवाहिकांच्या चालकांना सुरक्षा कीट देण्यासंंदर्भात महापौर मुरलीधर मोहोळ यांच्याशी महिनाभरापुर्वी चर्चा केली आहे. पण त्यावर पुढे काहीच झाले नाही. बाहेरगावी गेलेले चालक परत येऊ इच्छितात. पण त्यांना पोलिसांकडून परवानगी मिळत नाही. त्यामुळे काहीवेळा रुग्णवाहिका उपलब्ध करून देता येत नाही. रुग्ण अत्यवस्थ असेल तर काही चालक तयारी दाखवितात. संबंधित रुग्णाला कोरोनाचा संसर्ग झाला आहे किंवा नाही हे माहित नसते. तेव्हा त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे चालकांना सुरक्षा कीट मिळाल्यास रुग्णांना सहजपणे रुग्णवाहिका उपलब्ध होऊ शकते, असे असोसिएशनचे सचिव गोपाळ जांभे यांनी सांगितले.----------------सध्या रुग्णवाहिकांना मागणीही कमी झाली आहे. त्यामुळे प्रशासनाने खासगी रुग्णवाहिकांनाही सोबत घ्यायला हवे. चालकांना सुरक्षा कीट उपलब्ध करून दिल्यास रुग्णांना रुग्णालयापर्यंत पोहचविणे शक्य होईल. तसेच पोलिस परवानगीचे नियमही शिथील करायला हवेत.- गोपाळ जांभे, सचिव,  पुणे जिल्हा अ‍ॅम्ब्युलन्स असोसिएशन---------------असोसिएशनच्या मागण्या -- चालकांना सुरक्षा कीट मिळावे- पोलिस परवानगीचे नियम शिथील करावेत- रुग्णवाहिका धुवण्याची सोय करावी- प्रशासनाने खासगी रुग्णवाहिकांनाही सोबत घ्यावे----------                                                                                                                                           

टॅग्स :PuneपुणेCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसhospitalहॉस्पिटल