शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले, डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा एकदा दावा, पाच विमाने पाडल्याच्या दाव्याची पुनरावृत्ती
2
आजचे राशीभविष्य, १० ऑगस्ट २०२५: ७ राशींना शुभ दिवस, सरकारी कामात यश; धनलाभ योग
3
लाडकी बहीण योजनेचे पैसे योग्य वेळी वाढवणार; योजनेत भ्रष्टाचार असल्याचा मुख्यमंत्र्यांनी केला इन्कार
4
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये कोण जिंकलं? सेना प्रमुखांनी पाकिस्तानला थेट उत्तर दिलं! म्हणाले...
5
वाराणसीच्या मंदिरात पूजेदरम्यान आग; पूजाऱ्यासह ९ जण होरपळले, ४ जणांची प्रकृती गंभीर  
6
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
7
विद्यार्थ्यांची जबाबदारी शासन घेणार का? गणपती विसर्जन, दहीहंडीची सुट्टी रद्द केल्याने शिक्षक नाराज
8
फसवणुकीच्या गुन्ह्यातील कैद्यांनी चार तास ढोसली दारू! ऑन ड्युटी नसलेल्या पाेलिस हवालदाराचा ‘हात’
9
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
10
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
11
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
12
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
13
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
14
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
15
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
16
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
17
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
18
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
19
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
20
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य

Corona virus : हॅलो, परदेशातून एक जण आलाय, त्याला घेऊन जा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2020 20:06 IST

आरोग्य विभागाच्या हेल्पलाइन ऐवजी पोलिसांनाच केला जातोय कॉल...

ठळक मुद्देकोरोना विषाणुच्या प्रादुर्भावाची भीती : पोलिसांची डोकेदुखी वाढली

पिंपरी : कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वच यंत्रणांकडून उपाययोजना करण्यात येत असून, आरोग्य विभागाकडून हेल्पलाइन क्रमांक उपलब्ध करून देण्यात आले आहेत. मात्र असे असले तरी, सर्वसामान्य नागरिकांकडून पोलीस ठाण्यात फोन करण्यात येत आहेत. हॅलो, परदेशातून एक जण आलाय, त्याला घेऊन जा... असे सांगून नागरिक पोलिसांकडून मदतीची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. त्यामुळे पोलिसांची डोकेदुखी वाढली आहे.   कोरोना विषाणुचा संसर्ग झालेले रुग्ण देशात सर्वाधिक महाराष्ट्रात आहेत. त्यात पुणे व पुण्यात पिंपरी-चिंचवड शहरात सर्वाधिक रुग्ण आहेत. त्यामुळे पिंपरी-चिंचवड शहराकडे सर्व यंत्रणांचे लक्ष लागून आहे. सर्व यंत्रणांनी सजग राहून दक्षता घेण्याचे निर्देश शासन व आरोग्य विभागाकडून देण्यात आले आहेत. त्याचबरोबर नागरिकांनी खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. सार्वजनिक ठिकाणी गर्दी करू नये, अत्यंत महत्त्वाच्या व आवश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये, प्रवास टाळावा, असे आवाहन केले आहे. परदेशी पर्यटक व विमान प्रवास करून आलेल्या नागरिकांची माहिती देण्यात यावी, असा आदेश हॉटेल, लॉज, गेस्ट हाऊस व टूर्स अ?ॅण्ड ट्रॅव्हल्स कंपन्यांना देण्यात आले आहेत. पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई यांनी याबाबत निर्देश दिले आहेत. तसेच  ह्यकोरोनाह्णबाबत सहज मदत उपलब्ध करून देण्यासाठी पोलिसांकडून हेल्पलाइन क्रमांक दिला आहे. त्यामुळे नागरिकांनी या क्रमांकावर संपर्क साधून पोलिसांची मदत घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. पोलिसांनी हेल्पलाइन क्रमांक उपलब्ध करून दिला असला तरी, सामान्य नागरिकांकडून त्याचा वापर होताना दिसून येत नाही. बुधवारी (दि. १८) सायंकाळी सातपर्यंत एकही ह्यकॉलह्ण या हेल्पलाइनवर आला नव्हता. मात्र शहरातील काही पोलीस ठाण्यांतील क्रमांकावर काही नागरिकांनी मदतीसाठी कॉल केले. आमच्या सोसायटीतील नागरिक परदेशात गेला होता. तो आला आहे, त्याला घेऊन जा, असे संबंधित नागरिकांकडून पोलिसांना सांगण्यात येत होते. आरोग्य विभागाच्या हेल्पलाइनवर संपर्क साधण्याबाबत पोलिसांकडून सांगण्यात येत होते. मग तुम्ही काय करताय, आम्ही कसे रहायचे, तुम्हीच सांगा त्यांना, असे कॉल करणाºया नागरिकांकडून पोलिसांना सांगण्यात येत होते. नागरिकांनी ह्यकॉलह्ण केल्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र परदेशातून आलेला नागरिक कोरोनाग्रस्त आहे किंवा नाही, याबाबत साशंकता असल्याने त्याला ताब्यात घेण्याची पुरेशी यंत्रणा नसल्याने पोलिसांची अडचण झाली. आरोग्य विभागाने निर्देशित केल्यानुसार ह्यसुरक्षा किटह्ण नसल्याने पोलीस संबंधित नागरिकाजवळ जाण्याचे टाळत आहेत. आरोग्य विभागाच्या हेल्पलाइन क्रमांकावर याबाबत पोलिसांकडून माहिती देण्यात आली.

हॅलो, मी दुबईतून आलोय....दुबई येथून आलेल्या एका नागरिकाने पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला बुधवारी १०० क्रमांकावर ' कॉल ' केला. हॅलो, मी दुबईतून आलोय, काय करू, मला मदत करा, असे संबंधित नागरिकाने सांगितले. त्यानुसार नियंत्रणक कक्षातून पोलिसांच्या हेल्पलाइन क्रमांकावर त्याला ह्यकनेक्टह्ण करून देण्यात आले. त्यानंतर आरोग्य विभागाच्या हेल्पलाइन क्रमांकावरून मदत घेऊन त्यांच्या सल्ल्यानुसार कार्यवाही करण्याच्या ' त्या' नागरिकाला सूचना देण्यात आल्या.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसPoliceपोलिसhospitalहॉस्पिटलdoctorडॉक्टर