Corona virus : पुरंदर वगळता संपूर्ण जिल्ह्याला कोरोनाचा विळखा,  एकूण रुग्णांची संख्या ४ हजार ३७० वर

By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2020 12:32 AM2020-05-20T00:32:37+5:302020-05-20T00:33:24+5:30

एका दिवसांत १९३ कोरोनाबाधित रुग्ण

Corona virus : With the exception of Purandar corona spread into all district; total number of patient 4 thousands 370 | Corona virus : पुरंदर वगळता संपूर्ण जिल्ह्याला कोरोनाचा विळखा,  एकूण रुग्णांची संख्या ४ हजार ३७० वर

Corona virus : पुरंदर वगळता संपूर्ण जिल्ह्याला कोरोनाचा विळखा,  एकूण रुग्णांची संख्या ४ हजार ३७० वर

Next

पुणे : पुणे जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या आता प्रचंड वेगाने वाढू लागली आहे. जिल्ह्यात आठ दिवसांपूर्वी पाच तालुके कोरोना विषाणूच्या संसगार्पासून दूर होते. परंतु, आता केवळ पुरंदर तालुका वगळता अन्य सर्व तालुक्यात कोरोनाची लागण झाली आहे. दरम्यान मंगळवारी एका दिवसांत १९३ कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण सापडले. यामध्ये सर्वाधिक बाधित रुग्ण पुणे शहरातील आहेत, तर ग्रामीण भागात नव्याने ५ व्यक्तींना कोरोनाची लागण झाली. 
कोरोनाचा प्रादुर्भाव सुरूवातीला काही दिवस केवळ शहरी भागापुरता मर्यादित होता. परंतु शहरी भागातील लोकांचे ग्रामीण भागात आणि ग्रामीण भागातील लोकांचे शहरातील प्रवास व संपर्क यामुळे आता कोरोनाची लागण ग्रामीण भागात देखील पोहचली आहे. यामध्ये देखील गेल्या आठ-दहा दिवसांपर्यत केवळ काही तालुक्या पर्यंत मयार्दीत होता परंतु आता पुरंदर तालुका वगळता संपूर्ण जिल्हा कोरोनाच्या विळाख्यात सापडला आहे. दरम्यान मंगळवार (दि.१९) रोजी जिल्ह्यात नव्याने १९३ कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण सापडले. यामुळे एकूण रुग्णांची संख्या ४ हजार ३७० वर जाऊन पोहचली आहे. परंतु यापैकी २१८४ रुग्ण बरे देखील झाले आहेत. तर मंगळवारी १० रुग्णांचा कोरोनामुळे बळी गेला. यामुळे आता पर्यंत २२१ लोकांचा कोरोनामुळे बळी गेला आहे. 
---
एकूण बाधित रूग्ण : ४३७०
पुणे शहर :३७८२
पिंपरी चिंचवड : २२७
कॅन्टोनमेन्ट व ग्रामीण : ३६१
मृत्यु :२२१
घरी सोडलेले : २१८४
 

Web Title: Corona virus : With the exception of Purandar corona spread into all district; total number of patient 4 thousands 370

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.