शहरं
Join us  
Trending Stories
1
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
2
पहिल्या भाषणानंतर बाळासाहेबांनी दिलेला 'तो' सल्ला राज ठाकरेंनी कायम लक्षात ठेवला
3
उद्धव यांच्या आजारपणात मोदी करायचे विचारपूस ; पंतप्रधानांच्या विधानावर राजकीय टोलेबाजी सुरू
4
सरकारने सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील केले; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
5
आजचे राशीभविष्य - ४ मे २०२४; आज आपणास खूप मोठा आर्थिक लाभ होईल
6
रावसाहेब दानवे षटकार मारणार ? जालन्यात चुरशीची लढाई, भाजपचा वरचष्मा; मविआ कमकुवत!
7
तिकीट तर कापले, आता पुनर्वसनाचा प्रश्न, महायुतीने १२ विद्यमान खासदारांना बसवले घरी
8
शेतकरी संकटात असताना केंद्राकडून सत्तेचा गैरवापर सुरू ; शरद पवार यांची टीका
9
जादूटोण्याच्या संशयातून दोघांना जिवंत जाळले; घरात मृत्युसत्र, १५ जणांना अटक
10
मुंबईत मराठी टक्का कोणाच्या फायद्याचा? मराठी मते आपल्याच झोळीत पाडून घेण्यासाठी घमासान रंगणार
11
भाजपने १२ केंद्रीय मंत्र्यांना तिकीट नाकारले; निकालावर ११ केंद्रीय मंत्र्यांचे भवितव्य ठरणार
12
ॲड. उज्ज्वल निकम २८ कोटींचे मालक; एक कार, अंधेरी, जळगाव आणि दहिसर येथे घरे
13
आता ‘त्या’ महिलेच्या अपहरणाचाही गुन्हा दाखल; पाच दिवसांपासून बेपत्ता असल्याची तक्रार दाखल
14
रवींद्र वायकर यांच्या मालमत्तेत ६ कोटींनी वाढ; २०१९ मध्ये १० कोटी १९ लाखांची संपत्ती
15
या निवडणुकीतला पहिला हेलिकॉप्टर अपघात; महाड येथील दुर्घटना, पायलट किरकोळ जखमी
16
नरेश म्हस्के यांच्याकडे २६ कोटींची संपत्ती; तीन कार, ३ कोटी ६२ लाखांचे कर्ज
17
हैदराबादमध्ये अमित शाह यांच्याविरोधात गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
18
किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले
19
"काय बोलावं सुचत नाहीये, काही प्रश्न..."; Mumbai Indians च्या लाजिरवाण्या पराभवानंतर Hardik Pandya काय म्हणाला, वाचा
20
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट

Corona virus : तीर्थक्षेत्र आळंदीत आठ दिवसांचा लॉकडाऊन जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Published: July 04, 2020 7:59 PM

 आळंदी शहरात लॉकडाऊन शिथिल केल्यानंतर कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याचे निदर्शनास येत आहे.

ठळक मुद्देआळंदी पोलिस ठाण्यातील सात पोलिसांनाही कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट

शेलपिंपळगाव : तीर्थक्षेत्र आळंदीत दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. यापार्श्वभूमीवर कोरोना संसर्गाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण शहरात सोमवार (दि.६) पासून १३ जुलैपर्यंत 'लॉकडाऊन' जाहिर करण्यात आले आहे. संबंधित निर्णय जिल्ह्याधिकारी राम तसेच प्रांताधिकारी संजय तेली यांच्या आदेशानुसार घेण्यात आल्याची माहिती मुख्याधिकारी समीर भूमकर यांनी दिली.         आळंदी शहरात लॉकडाऊन शिथिल केल्यानंतर कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याचे निदर्शनास येत आहे. त्यातच आळंदी पोलिस ठाण्यातील सात पोलिसांनाही कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. तर देहू फाट्यावर तीन रुग्ण आढळून आले आहेत. शहरातील कोरोनाचा वाढता शिरकाव लक्षात घेता 'शहर बंद'ची ठेवण्याची मागणी स्थानिकांनी प्रशासनाकडे केली होती.         या अनुषंगाने राजगुरूनगर येथे शनिवारी (दि.४) जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांच्या अध्यक्षतेखाली तसेच आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत उपाययोजनांसाठी विशेष बैठक पार पडली. यामध्ये विशेष खबरदारी म्हणून कठोर पावले उचलण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला असून आळंदी शहरात नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचा तसेच लॉकडाऊन घोषित करण्याबाबत आदेश जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी स्थानिक प्रशासनाला दिला आहे.           यापार्श्वभूमीवर आळंदी नगरपालिका प्रशासनाने शहरात ६ जुलै ते १३ जुलैपर्यंत लॉकडाऊनची घोषणा केली आहे. शहरात बंदच्या काळात बँक, पतसंस्था, हॉस्पिटल, मेडिकल तसेच अन्य अत्यावश्यक सेवा सुरू राहणार असून किराणा दुकाने, भाजीपाला व दूध विक्री सकाळी ७ ते दुपारी १ पर्यंतच सुरू ठेवता येणार आहे. शहरात बंदच्या काळात विवाह सोहळ्याला मज्जाव केला असून मंगल कार्यालये पूर्णपणे बंद असणार आहेत. लॉकडाऊन काळात तसेच त्यानंतर नागरिकांना मास्क वापरणे बंधनकारक केले असून विनामास्क आढळून आल्यास ५०० रुपयांचा दंड ठोठावण्यात येणार आहे.

टॅग्स :AlandiआळंदीCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसNavalkishor Ramनवलकिशोर राम