शहरं
Join us  
Trending Stories
1
जयंत पाटलांची प्रदेशाध्यपद सोडण्याची इच्छा, म्हणाले, "शरद पवार यांना विनंती करतो, त्यांनी..."
2
“चंद्रहार पाटीलसाठी प्रतिष्ठा पणाला लावली, पण बेईमानी केली”; संजय राऊतांनी बोलून दाखवली खंत
3
सोनम रघुवंशीनं किती रुपयांत केली होती पती राजाच्या जीवाची 'डील'? कुणाला किती रुपये दिले अ‍ॅडव्हॉन्स? जाणून थक्क व्हाल!
4
११ रुपयांचा शेअर पोहोचला ५७१ रुपयांवर, 'या' कंपनीने गुंतवणूकदारांना दिला '५०००%' परतावा!
5
Corona Virus : बापरे! कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने पुन्हा भरवली धडकी, XFG रोगप्रतिकारक शक्तीला देतोय चकवा
6
अजित पवारांसोबत जाण्याबाबत सुप्रिया सुळेंचे मोठे विधान; पक्षाच्या वर्धापनदिनी म्हणाल्या...
7
२४ तास उलटूनही आग शमेना, अजूनही येतायत स्फोटांचे आवाज! केरळच्या समुद्रात सुरू आहे मोठं रेस्क्यू ऑपरेशन
8
Raj Kushwaha : "माझा मुलगा २० वर्षांचा, पोलीस खोटं बोलताहेत"; सोनमचा बॉयफ्रेंड राज कुशवाहच्या आईचा दावा
9
आर्थिक अडचणींना वैतागून एमबीबीएस विद्यार्थ्याची आत्महत्या; जेजे रुग्णालयाच्या वसतिगृहातील घटना!
10
'मी विधवा होऊन...', सोनम रघुवंशीनं दिलं होतं आश्वासन; ओरडून म्हणाली, 'मार दो इसे...!' 'खतरनाक' होतं संपूर्ण प्लॅनिंग
11
Vat Purnima Vrat 2025: वट पौर्णिमेची पूजा झाली, पण घाईघाईत कथा वाचायची राहून गेली? वाचा 'ही' कथा!
12
फक्त या कारणामुळे आशुतोष राणाने रेणुका शहाणेसोबत केलं लग्न, २४ वर्षांनंतर अभिनेत्रीचा खुलासा
13
"मला लग्नच करायचं नव्हतं...", उषा नाडकर्णींनी पहिल्यांदाच लग्नावर केलेलं भाष्य
14
भरमैदानात महिला अंपायरवर भडकला, आर अश्विनला चुकवावी लागली किंमत, ठोठवला मोठा दंड
15
चांदीने मोडले सर्व रेकॉर्ड! 'रिच डॅड पुअर डॅड' पुस्तकाच्या लेखकाचं भाकीत खरं ठरतंय! अजूनही आहे संधी?
16
Sonam Raghuvanshi : "राजा जवळ येतो, जे मला अजिबात आवडत नाही"; सोनमच्या चॅटमधून खळबळजनक खुलासा
17
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईनवर वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे प्रचंड हाल, रेल्वेने दिलं स्पष्टीकरण
18
Video: हातात बेड्या, जमिनीवर फेकले अन्...अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्यासोबत अमानुष वागणूक
19
Uber Bike: उबेर बाईक चालकाचे महिला प्रवाशाशी गैरवर्तन; गोरेगाव येथील संतापजनक प्रकार!
20
५०० कर्मचाऱ्यांना फर्स्ट क्लास विमान तिकिट, खर्चासाठी ८.५ लाख अन्.. नक्की कोण आहे ही 'दिलदार' महिला?

Corona virus : खेडच्या प्रांताधिकाऱ्यांना कोरोनाची लागण; १९ पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा रिपोर्ट आला निगेटिव्ह

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2020 15:18 IST

राजगुरुनगर शहरात तालुक्यात दिवसेंदिवस कोरोना रुणांची संख्या वाढत आहे.

ठळक मुद्देशहरातील ५ डॉक्टरांना यापूर्वी करणाची लागण

राजगुरूनगर: खेड पोलीस ठाण्यातील एकोणीस पोलिस अधिकारी व कर्मचारी यांचा करोना रिपोर्ट निगेटिव्ह आल्‍यामुळे पोलीस ठाण्याला दिलासा मिळाला आहे. मात्र  प्रांतधिकारी यांना कोरोनाची लागण झाल्यामुळे पुन्हा राजगुरुनगर शहरात खळबळ उडाली आहे..

राजगुरुनगर शहरात तालुक्यात दिवसेंदिवस कोरोना रुणांची संख्या वाढत आहे. शहरातील ५ डॉक्टरांना यापूर्वी करणाची लागण झाली होती. तसेच खेड पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक यांनाही ही करोनानी ग्रासले होते. संपर्कातील आलेल्या सर्व पोलीस कर्मचाऱ्यांनी करुणा चाचणी करून घेतली होती यामध्ये जवळून संपर्क आलेल्या पोलिस कर्मचार्‍यांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्यामुळे पोलीस ठाण्याला दिलासा मिळाला आहे. खेड पोलिस ठाण्यातील ठाण्याची इमारत आतून बाहेरून व परिसर निर्जंतुकीकरण करण्यात आली आहे. त्यातच प्रांताधिकारी यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यामुळे पुन्हा एकदा शहरात खळबळ उडाली आहे प्रांताधिकारी यांनी लॉकडाऊन दरम्यान तसेच गेल्या चार महिन्यापासून आरोग्य विभाग महसूल विभाग पोलीस प्रशासन यांच्या बैठका घेऊन कोरोनाचा रोगाचा संसर्ग रोखण्यासाठी उपाययोजना केल्या होत्या.तालुक्यात तालुक्यातील आळंदी राजगुरुनगर या नगर परिषदे हद्दीत कशाप्रकारे उपाययोजना सुरू आहेत. कुठे काय कमी याबाबत प्रशासनाकडून वारंवार माहिती घेत होते. तसेच चाकण हद्दीतील म्हाळूंगे येथील म्हाडाच्या इमारती मध्ये येथे सुरू केलेल्या येथील केविड सेंटरलाही भेट देत होते. मात्र त्यांनी कोरोना चाचणी करून घेतली असता यांचा करोना रिपोर्ट पाँझिटिव्ह आल्याने महसुल यत्रंणेत खळबळ उडाली तर प्रांत कार्यालयात कामानिमित्ताने येणारे नागरीकही मोठ्या प्रमाणात येत असल्याने सर्वानी काळजी घेण्याचे आवाहन प्रांतधिकारी यांनी केले आहे. 

टॅग्स :KhedखेडPoliceपोलिसCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसhospitalहॉस्पिटलNavalkishor Ramनवलकिशोर राम