शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंना राहुल गांधींच्या घरी मागे बसवलं? संजय राऊत म्हणाले, "आम्हाला स्क्रीन समोर बसून पाहताना..."
2
Kapil Sharma : "जो सलमानसोबत काम करेल तो मरेल", कॅफे गोळीबारानंतर लॉरेन्स गँगची कपिल शर्माला धमकी
3
थरारक! गोपीचंद पडळकर समर्थकाचं फिल्मी स्टाईल अपहरण; पोलिसांच्या सतर्कतेमुळे वाचला जीव
4
Video - 'ते' आले अन् धारदार शस्त्रांनी केला हल्ला; हुमा कुरेशीच्या भावाच्या हत्येचे CCTV फुटेज
5
Ajit Pawar: पुणे जिल्ह्यात तीन महापालिका होणार; चाकण, हिंजवडी आणि..., अजित पवारांची मोठी घोषणा
6
पालकमंत्रिपदाचा तिढा सुटेना; आता ध्वजवंदनावरून वादंग; १५ ऑगस्टचा मान गोगावलेंना देण्याची मागणी
7
पाक क्रिकेटर बलात्कार प्रकरणात अडकला; पोलिसांनी मॅच सुरु असतानाच ठोकल्या बेड्या
8
मी सापाच्या तीन पिल्लांना जन्म दिला; महिलेच्या दाव्याने खळबळ, समजताच गर्दी जमू लागली...
9
सुप्रीम कोर्टाचा १ निर्णय अन् अलाहाबाद हायकोर्टचे १३ न्यायाधीश नाराज; मुख्य न्यायाधीशांना पत्र
10
डोनाल्ड ट्रम्प यांना सुधरेना...! ५० टक्के टॅरिफवर देखील काहीच प्रतिक्रिया नाही, आता चर्चा बंद केल्याची घोषणा...
11
Intel CEO Lip Bu Tan Networth: कोण आहेत लिप-बू टॅन, ज्यांच्या मागे हात धुवून पडलेत डोनाल्ड ट्रम्प, किती संपत्तीचे मालक?
12
तिसरा श्रावण शनिवार: तुमची साडेसाती सुरू आहे? अश्वत्थ मारुती पूजनासह ‘हे’ ५ शनि उपाय कराच!
13
सत्ताधारी, निवडणूक आयोगाने देशाला फसवले; संपूर्ण निवडणूक प्रणालीची झाली चोरी; राहुल गांधी यांचा आरोप
14
शेअर बाजारात सलग चौथ्या दिवशी घसरण; सेन्सेक्स १४५ आणि निफ्टी ५२ अंकांच्या घसरणीसह उघडले
15
आरोग्याचा विषय जास्त महत्त्वाचा; पण कबुतरांबाबतही जाणिवा दाखवा : मंत्री लोढा
16
अत्याचाराच्या प्रकरणातून सोडवण्यासाठी अजितदादांच्या आमदाराला फोन; उपमुख्यमंत्री म्हणाले, 'तुमची जीभ कशी रेटते'
17
Trump Tariff On India: ट्रम्प यांचं टॅरिफ संधी ठरू शकते का? कॉर्पोरेट इंडिया म्हणतोय भारत बनू शकतो नवा 'पॉवरहाऊस'
18
अभिनेत्री हुमा कुरेशीच्या भावाची निर्घृणपणे हत्या; दिल्लीत दोघांना अटक, क्षुल्लक कारणावरुन झाला वाद
19
सिद्धिविनायकाच्या दर्शनाला लॅपटॉप, कॅमेरा साेबत नकाे
20
डबल जॉली, डबल ट्रबल! सौरभ शुक्लांनी दिलं 'जॉली एलएलबी ३'चं मोठं अपडेट, कधी रिलीज होणार?

Corona virus : 'कोरोना योद्धे' लढतायेत तुटपुंज्या वेतनावरच ; भत्ते, वैद्यकीय सवलतींपासूनही चार हात लांब

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2020 12:36 IST

किमान वेतन, कायम करणे, वैद्यकीय सवलती याबाबत सातत्याने पाठपुरावा करूनही त्यांच्याकडे दुर्लक्ष

ठळक मुद्दे‘एनयुएचएम’मधील कर्मचाऱ्यांना तुटपुंजे वेतन;भत्ते, सवलतीही नाहीत 'एनयुएचएम'अंतर्गत २०० हून अधिक आरोग्य कर्मचारी; त्यांना मिळत नाही साधे किमान वेतनकिमान वेतन, कायम करणे, वैद्यकीय सवलती याबाबत सातत्याने पाठपुरावा करूनही त्याकडे दुर्लक्ष

राजानंद मोरे-पुणे : कोरोना विषाणुशी दोन हात करणारे डॉक्टर, परिचारिका, प्रयोगशाळा तंत्रज्ञ आदी कर्मचाऱ्यांनाच किमान वेतनाशिवाय काम करावे लागत असल्याचे समोर आले आहे. पुणे महापालिकेत राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियानांतर्गत (एनयुएचएम) काम करणारे हे कोरोना योद्धे तुटपुंज्या वेतनावरच लढा देत आहेत. त्यांना भत्ते, वैद्यकीय सवलतींपासूनही चार हात लांब ठेवण्यात आले आहे. त्यातच नवीन भरती झालेल्या त्याच पदावरील कर्मचाऱ्यांना मात्र वाढीव वेतन दिले जात असल्याने असुरक्षिततेची भावना निर्माण होत असल्याची व्यथा काही कर्मचाऱ्यांनी मांडली.कोरोनाबाधित रुग्णांची सेवा करणारे डॉक्टर, परिचारिकांसह सर्व आरोग्य सेवकांसाठी देशातील विविध राज्यांनी वेतनवाढीसह विविध सवलती जाहीर केल्या आहेत. राज्यातही काही महापालिकांनी 'एनयुएचएम' तसेच कंत्राटी कर्मचाऱ्यांना किमान वेतन तसेच सवलती देऊ केल्या आहेत. पुणे महापालिकेने मात्र त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप कर्मचारी करत आहेत. राज्यात मुंबई पाठोपाठ पुणे शहरात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आहेत. त्यामुळे डॉक्टर, परिचारिका तसेच इतर कर्मचाऱ्यांचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे त्यांना साप्ताहिक सुट्टीशिवाय इतर सुट्टयाही दिल्या जात नाहीत. त्यातच त्यांना तुटपुंज्या वेतनावरच काम करावे लागत आहे. पालिकेत 'एनयुएचएम'अंतर्गत २०० हून अधिक आरोग्य कर्मचारी आहेत. त्यांना साधे किमान वेतनही मिळत नाही. इतर कायम कर्मचाऱ्यांप्रमाणे त्यांना भत्ते, वैद्यकीय सवलतीही मिळत नाहीत. कोरोना महामारीमध्ये या कर्मचाऱ्यांनाही संसर्गाचा धोका आहे. पण तरीही ते आपले कर्तव्य पार पाडत आहेत. किमान वेतन, कायम करणे, वैद्यकीय सवलती याबाबत सातत्याने पाठपुरावा करूनही त्यांच्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे कर्मचाऱ्यांनी 'लोकमत'ला सांगितले.--------------स्थानिक स्वराज्य संस्थेतील कंत्राटी, अनियमित, मानधनावरील कर्मचाऱ्यांना किमान वेतन मिळायला हवे. ' एनयुएचएम'मधील कर्मचाऱ्यांसाठी २०१५ पासून आमचा पाठपुरावा सुरू आहे. राज्य शासन, कामगार मंत्री, कामगार आयुक्त, पालकमंत्री यांचे यासंदर्भातील आदेश आहेत. पण त्याची दखल घेतली जात नाही. सद्यस्थितीतही आरोग्य कर्मचाऱ्यांकडे दुर्लक्ष केले जात असून त्यांची आर्थिक पिळवणुक सुरू आहे.- दीपक कुलकर्णी, प्रदेश सरचिटणीसभारतीय मजदुर संघ--------------नवीन कर्मचाऱ्यांना दुप्पट वेतन‘एनयुएचएम’अंतर्गत काही वर्षांपासून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना ८ ते १० हजार रुपयांपर्यंत वेतन मिळते. तर कोरोनाच्या पार्श्वभुमीवर नुकत्याच नव्याने घेण्यातलेल्या कर्मचाऱ्यांना त्यांच्यापेक्षा जवळपास दुप्पट वेतन दिले जात आहे. माझे पाच वर्षात केवळ दोन हजार रुपयांनी वेतन वाढले आहे. आम्हाला कोणतेही वैद्यकीय संरक्षण नाही. कुटूंबियांचा वेठीस धरून काम करत आहोत. पालिका प्रशासनाकडे वारंवार मागणी करूनही याची दखल घेतली जात नाही. केवळ वेतनवाढीचे प्रस्ताव दिले जात आहेत. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये असुरक्षिततेची भावना पसरू लागली आहे.- महिला आरोग्य कर्मचारी----------------------काही वर्षांपासून महापालिकेच्या सेवेत असलेले व सध्या कोरोना बाधितांची सेवा करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांना कायम सेवेत घ्यावे, वेतनवाढ, वैद्यकीय संरक्षण द्यावे, अशी मागणी महापौरांकडे केली होती. पण अद्याप त्यावर काहीच विचार झालेला नाही.- एक डॉक्टर------------नवीन कर्मचाऱ्यांसाठी वाढीव रक्कम 

पद                      सध्याच्या कर्मचाऱ्यांचे वेतन                  नवीन कर्मचाऱ्यांचे वेतनपरिचारिका                ८,६४०                                                     १९,२५०फार्मासिस्ट               १०,०००                                                   १९,२५०ऑपरेटर                 १०,०००                                                   १९,२५०स्टाफ नर्स                १२,०००                                                   १९,२५०प्रयोगशाळा             ८४००                                                      १९,२५०तंत्रज्ञसहायक                  ६,०००                                                     १६७५०-------------------------------------------

टॅग्स :Puneपुणेhospitalहॉस्पिटलdoctorडॉक्टरCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाState Governmentराज्य सरकार