corona virus ; शिरूरमध्ये डॉक्टरला कोरोनाची लागण ; संपर्कातल्या १४४ रुग्णांची तपासणी सुरु
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2020 16:44 IST2020-04-14T16:42:38+5:302020-04-14T16:44:31+5:30
शिक्रापुर येथील एका सोनोग्राफीसेंटर मधील डॉक्टराला त्रास होऊ लागल्याने आणि त्याला करोनाची लक्षणे जाणवू लागल्यामुळे त्याने प्रथम पुणे येथील एका हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू केले. त्यानंतर पुण्यातील दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असताना तेथे करोनाच्या तपासण्या करण्यात आल्या असता अहवाल पॉझिटिव्ह आला

corona virus ; शिरूरमध्ये डॉक्टरला कोरोनाची लागण ; संपर्कातल्या १४४ रुग्णांची तपासणी सुरु
पुणे : शिक्रापूर (ता .शिरूर)येथे एका डॉक्टरला करोनाची लागण झालेली असून त्याच्या तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला असून या सेंटरमध्ये कामाला असलेल्या आठ कामगारांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. गेल्या पाच दिवसात या सेंटरमध्ये तपासलेल्या १४४ पेशंटची देखील तपासणी करण्यात येणार असल्याची माहिती तालुका वैद्यकिय अधिकारी डॉ राजेंद्र शिंदे यांनी दिली.
शिक्रापुर येथील एका सोनोग्राफीसेंटर मधील डॉक्टराला त्रास होऊ लागल्याने आणि त्याला करोनाची लक्षणे जाणवू लागल्यामुळे त्याने प्रथम पुणे येथील एका हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू केले. त्यानंतर पुण्यातील दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असताना तेथे करोनाच्या तपासण्या करण्यात आल्या असता अहवाल पॉझिटिव्ह आला .पुन्हा नायडू हॉस्पिटलमध्ये तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आली असता चांगलीच खळबळ उडाली आहे .
याबाबत तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ राजेंद्र शिंदे यांनी सांगितले की, 'खबरदारी म्हणून परिसरात फवारणी सुरु केली आहे. दरम्यान शिक्रापूर पोलिसांनी नागरिकांना फिरण्यास बंदी घालत कठोर कार्यवाही सुरू केली असून सर्व रस्ते बंद करण्यात आले आहेत.