शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Modi vs Congress: "काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचाराची जननी, त्यांना विकासाची ABCD माहिती नाही"; पंतप्रधान मोदी विरोधकांवर बरसले!
2
...तर पक्ष तेव्हाच फुटला असता; शरद पवारांच्या दाव्यावर छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
3
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
4
Video: धोनी मॅच संपल्यावर RCBच्या खेळाडूंशी जे वागला, त्यावर विश्वासच बसेना! नेटकऱ्यांनीही केली टीका
5
शेतातील ५० लाख झाडांवर कुऱ्हाड! अधिक पिकांसाठी जमीन हवी म्हणून तोडली झाडे - अहवाल 
6
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले
7
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
8
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट
9
नाशिकमध्ये निवडणुकीत कोणाला पाठिंबा देणार? मनोज जरांगे पाटलांनी स्पष्टच सांगितलं
10
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
11
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
12
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
13
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
14
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
15
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
16
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
17
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
18
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
19
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
20
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार

Corona virus : चीनमध्ये स्वयंशिस्तीमुळेच कोरोनावर नियंत्रण; भारतातही 'सेल्फ क्वारंटाईन' हाच मौलिक उपाय

By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2020 12:42 PM

सरकारकडून मिळणाऱ्या सूचनांचे पालन करून स्वत: काही बंधने घालून घेतल्यास कोरोनावर नियंत्रण मिळवणे शक्य

ठळक मुद्देभारतात लॉकडाउन आहे. त्यामुळे बऱ्यापैकी सर्व नियंत्रणात असल्याची स्थितीलॉकडाउननंतर जनता मोठ्या संख्येने रस्त्यावर येण्याची शक्यतासेल्फ क्वॉरंटाईन हाच मौलिक उपाय

धनाजी कांबळे - पुणे : चीनमधून सुरुवात झालेला कोरोनाचा विषाणू जगभर पोचेल असे वाटत नव्हते. मात्र, सरकारने सुरुवातीला काही देशांमधून आपल्या लोकांना मायदेशी आणले. त्यानंतर योग्य ती खबरदारी घेतली गेली नाही. त्यातून संसर्गाचे प्रमाणे वाढले. चीनमध्ये मात्र, स्वयंशिस्तीमुळेच कोरोनावर नियंत्रण मिळविण्यात आले आहे. तसेच भारतातही सेल्फ क्वारंटाईन हाच मौलिक उपाय असल्याचे चीनमध्ये वास्तव्याला असलेले भारतीय नागरिक मिलिंद उजळंबकर यांनी ' लोकमत' शी बोलताना सांगितले.कोरोना विषाणू कधी कुठे प्रवेश करेल, याची काही गॅरंटी नसते. त्यामुळे गरीब-श्रीमंत असा कोणताही भेद न करता देशोदेशी पोहचणाऱ्या या विषाणूचे भारतातही एक हजारांहून अधिक रुग्ण आढळले आहेत. ही चिंतेची बाब असल्यामुळे नागरिकांनी स्वत:हून काळजी घेणे आणि सरकारी यंत्रणांनी दिलेल्या सूचनांचे पालन करणे अतिशय महत्त्वाचे आहे. कारण चीनमधील वुहान शहरात साधारण ७५ दिवस लॉकडाऊन होते. या शहरातून बाहेरच्या शहरात विषाणूचा प्रसार होणार नाही, असे कटाक्षाने बघितले. त्यामुळे जवळच असणाऱ्या हाँगकाँगमध्ये कोरोनाचे प्रमाण अत्यंत कमी आणि तुलनेने नियंत्रणात आहे. आजही हाँगकाँगमध्ये कोणत्याही प्रकारचे लॉकडाउन करण्यात आलेले नाही. सर्व व्यवहार सुरळीत सुरु आहेत. त्यामुळे स्वयंशिस्त आणि स्वत:सह कुटुंबाची काळजी घेणे हेच यावरचे महत्त्वाचे औषध आहे. चीनमध्ये आता लॉकडाउन शिथिल झाले असले, तरी ज्या ज्या ठिकाणांहून संसर्ग होण्याची अधिक शक्यता आहे, असे भाजीमार्केट किंवा इतर सार्वजनिक गर्दीच्या ठिकाणी सुरक्षा आणि काळजी घेतली जात आहे, असे उजळंबकर यांनी सांगितले.सरकारने एक अ‍ॅप डेव्हलप केले होते. त्याच्या आधारे कुणालाही ६०० स्क्वेर फुटापेक्षा अधिक लांब जाता येत नव्हते. तसे केल्यास तत्काळ सरकारला मेसेज जात होता. त्यामुळे अतिशय विचारपूर्वक हे अ‍ॅप तयार करण्यात आले होते. त्यानुसार संशयिताच्या हातात एक पट्टी बांधली जात होती. तसेच त्याच्या मोबाईलमघ्ये हे अ‍ॅप डाउनलोड केले जात. त्यामध्ये त्या व्यक्तीच्या जवळपास कोणी कोरोनाबाधित असल्यास संबंधिताला त्याची माहिती मिळत होती. तसेच सरकारी आरोग्य यंत्रणेला देखील अलर्ट केले जात होते. त्यामुळे या ठिकाणी कोरोनावर नियंत्रण मिळवणे शक्य झाले आहे, असेही ते म्हणाले.

भारतीयांनी काळजी घ्यावी...आता भारतात लॉकडाउन आहे. त्यामुळे बऱ्यापैकी सर्व नियंत्रणात असल्याची स्थिती आहे. मात्र, सार्वजनिक ठिकाणी सामाजिक संसगार्तून या विषाणूचा प्रसार होऊ शकतो. लॉकडाउननंतर जनता मोठ्या संख्येने रस्त्यावर येण्याची शक्यता असते. त्यामुळे नागरिकांनी सरकारकडून मिळणाऱ्या सूचनांचे पालन करून स्वत: काही बंधने घालून घेतल्यास कोरोनावर नियंत्रण मिळवणे शक्य आहे. सर्वांनी स्वयंशिस्त आणि सेल्फ क्वॉरंटाईनचे महत्त्व लक्षात घेऊन काळजी घ्यावी, असे आवाहनही मिलिंद उजळंबकर यांनी केले आहे.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

टॅग्स :Puneपुणेchinaचीनcorona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारतGovernmentसरकार