शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

Corona virus : रुग्णांच्या आकड्यातील घोळ सुरूवातीपासूनच; जूननंतर हजाराने फरक

By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2020 10:47 AM

पुण्याच्या कोरोनाबाधितांच्या आकडेवारीतील घोळ, अ‍ॅक्टिवसह बाधितांचा आकड्यातही तफावत

ठळक मुद्देप्रशासनाने सुरूवातीपासूनच दुर्लक्ष केल्याने देशपातळीवर पुणे ‘हॉटस्पॉट’ बनलल्याचे चित्र

पुणे : राज्य व जिल्हा आरोग्य विभागाच्या कोरोना अहवालातील घोळ मागील काही दिवसांतील नसून सुरूवातीपासूनच असल्याचे आकडेवारीवरून समोर आले आहे. अगदी शेकड्यामध्ये रुग्णसंख्या असतानाही दोन्ही यंत्रणांमध्ये ताळमेळ नव्हता. बाधितांच्या आकड्यांमध्येही शेकड्याने तफावत आढळून येत होती. ही स्थिती अद्यापही कायम असून आता आकड्यांमधील तफावत काही हजारांच्या घरात गेली आहे. या फरकाकडे जिल्हा व पालिका प्रशासनाने सुरूवातीपासूनच दुर्लक्ष केल्याने देशपातळीवर पुणे ‘हॉटस्पॉट’ बनलल्याचे चित्र आहे.  राज्यात कोरोनाचा पहिला रुग्ण दि. ९ मार्च रोजी पुण्यात आढळून आला. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात सुरूवातीला रुग्णांचा आकडा १०० च्या आत होता. त्यामुळे राज्य व जिल्ह्याच्या आकड्यांमध्ये फारशी तफावत नव्हती. पण रुग्णसंंख्या वाढत गेल्यानंतर दोन्ही यंत्रणांकडील संख्येतही फरक पडत गेला. दि. २० एप्रिल रोजी राज्याकडे ५८८ तर जिल्ह्याकडे ७५६ बाधितांची नोंद होती. संपुर्ण एप्रिल व मे अखेरपर्यंत जिल्ह्याच्या अहवालातील बाधितांपेक्षा राज्याकडील बाधितांची संख्या कमी दाखविली जात होती. राज्याच्या अहवालामध्ये दि. २७ मे पासून अ‍ॅक्टिव रुग्णांची संख्या देण्यास सुरूवात केल्यानंतर त्यातही तफावत दिसू लागली. मात्र, हा आकडा जिल्ह्याच्या तुलनेत जास्त होता. त्यामध्ये आजअखेरपर्यंत सातत्याने वाढच होत गेली.जुलै महिन्यात रुग्णसंख्ये वेगाने वाढ होत गेल्याने दोन्ही अहवालांमध्ये बाधितांच्या तुलनेत अ‍ॅक्टिव रुग्णांमधील तफावतही वेगाने पडत गेल्याचे आकडेवारीवरून दिसते. ही तफावत शनिवारपर्यंत दुप्पट आहे. मागील १५ ते २० दिवसांतच ही तफावत मोठ्या प्रमाणावर वाढत गेल्याचे दिसते. पण यंत्रणांकडून सुरूवातीपासूनच त्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने जुलै महिन्यातही फारसे गांभीर्याने पाहिले गेले नाही. ----------

राज्य व जिल्ह्याच्या अहवालातील फरक                          राज्य                                        जिल्हा       बाधित   अ‍ॅक्टिव                                      बाधित      अ‍ॅक्टिव२० ए. ५८८     -                                              ७५६          ६२२१ मे   १३१६    -                                             १८१५        १३५५२५ मे ५९९६।   -                                             ६१५३       २६७८१० जून १०४०६ ३८८८                                    १०३९४     ३२६३१ जुलै २३३१७ १०९८९                                  २३६८०।     ८३९८१० जुलै ३५२३२ १८६८०                                ३५९९७    १२७८३२० जुलै ५७०२४ ३५३१२                                ५४०१३    १८२१५२५ जुलै ७३००७ ४६०१३                               ६६९६५।   २३९२७--------------------------------------------------------बाधितांमध्ये तफावत कशी?प्रयोगशाळांना बाधित रुग्णांची माहिती भरण्यासाठी स्वतंत्र लिंक देण्यात आली आहे. ही माहिती त्यांच्याकडून भरली जाते. त्यावेळी प्रत्येक रुग्णाचा युनिक आयडी तयार होतो. त्यानंतर जिल्हा व पालिका प्रशासनाकडेही त्याची माहिती येते. रुग्णालये व कोविड सेंटरकडून युनिक आयडीच्या आधारावरच रुग्णाची माहिती अद्ययावत करणे अपेक्षित असते. हीच माहिती राज्य आरोग्य विभागाकडून ही माहिती कोविड पोर्टलवरून घेतली जाते. असे असताना राज्य व जिल्हा प्रशासनाकडून बाधित रुग्णांच्या आकड्यांमध्येही तफावत आढळून येत असल्याने यंत्रणेतील कारभारावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. ----------------

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाNavalkishor Ramनवलकिशोर रामCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसhospitalहॉस्पिटलcommissionerआयुक्तState Governmentराज्य सरकार