Corona virus: comforting! The total number of people who have recovered from Corona in Pune city has crossed 10,000 | Corona virus : दिलासादायक ! पुणे शहरात कोरोनातुन ठणठणीत बरे झालेल्यांची एकूण संख्या १० हजार पार

Corona virus : दिलासादायक ! पुणे शहरात कोरोनातुन ठणठणीत बरे झालेल्यांची एकूण संख्या १० हजार पार

ठळक मुद्दे३५० रुग्ण अत्यवस्थ, २५ जणांचा मृत्यू

पुणे : शहरातील तब्बल १० हजार ४५१ कोरोनाबाधित रुग्ण आतापर्यंत बरे होऊन घरी गेले असून एकूण रुग्णांच्या तुलनेत ६१ टक्के रुग्ण बरे झाले आहेत. मंगळवारी ४८६ रूग्णांची वाढ झाली असून कोरोनाग्रस्तांचा एकूण आकडा १७ हजार २२८ झाला आहे. दिवसभरात बरे झालेल्या ५२२ जणांना घरी सोडण्यात आले आहे. विविध रुग्णालयातील ३५० रुग्ण अत्यवस्थ असून दिवसभरात एकूण २५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, प्रत्यक्षात ऍक्टिव्ह रुग्ण ६ हजार १३४ असल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली. 
मंगळवारी रात्री नऊपर्यंत शहरात नव्याने नोंद करण्यात आलेल्या ४८६ पॉझिटिव्ह रूग्णांपैकी ससून रूग्णालयात १४, नायडूसह पालिकेच्या विविध रुग्णालयांमध्ये २५६ तर खासगी रुग्णालयांमध्ये २१६ रुग्ण दाखल झाले आहेत. उपचार घेत असलेल्या रुग्णांपैकी ३५० जणांची प्रकृती चिंताजनक आहे. यातील ५९ रुग्ण व्हेंटिलेटरवर असून २९१ रुग्ण आयसीयूत उपचार घेत आहेत. 
शहरात मंगळवारी २५ मृतांची नोंद करण्यात आली असून यामध्ये पुण्याबाहेरील पाच जणांचा समावेश आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या ६४३ झाली आहे. दिवसभरात एकूण ५२२ रुग्ण आजारातून बरे झाल्याने घरी सोडण्यात आले आहेत. यामध्ये पालिकेच्या रुग्णालयांतील २९३ रुग्ण, ससूनमधील ०३ तर  खासगी रुग्णालयांमधील २२६ रुग्णांचा समावेश आहे. आजारातून बरे झालेल्यांची एकूण संख्या १० हजार ४५१ झाली आहे. तर एक्टिव्ह रूग्णांची संख्या ६ हजार १३४ झाली आहे.
-------------
दिवसभरात विविध केंद्रांवर एकूण ३ हजार ४४९ नागरिकांची स्वाब तपासणी करण्यात आली असून आतापर्यंत १ लाख १५ हजार ९९० रूग्णांची तपासणी करण्यात आली आहे.

----- 
एकूण बाधित रूग्ण : 22429
पुणे शहर : 17296
पिंपरी चिंचवड : 3300
कॅन्टोनमेन्ट व ग्रामीण : 1833
मृत्यु : 763

 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Corona virus: comforting! The total number of people who have recovered from Corona in Pune city has crossed 10,000

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.