शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

Corona virus : मार्केटयार्ड पुढील आदेश येईपर्यंत राहणार 'लॉक'च; प्रशासनाच्या निष्क्रिय कारभाराचा फटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2020 19:35 IST

प्रशासनाच्या निष्क्रिय कारभारामुळे भाजीपाला फळे, कांदा व बटाटा व्यापार राहणार नसल्याचे स्पष्ट

ठळक मुद्देपुणे आणि पिंपरी चिंचवड शहरामध्ये रविवारपासून सर्व जीवनावश्यक दुकाने दिवसभर सुरू राहणार

पुणे : पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरामध्ये रविवार (दि.१९) पासून सर्व जीवनावश्यक दुकाने दिवसभर सुरू राहणार असल्याचे प्रशासनाने स्षष्ट केले आहे. परंतु शहरातील मुख्य बाजार आवार आणि उपबाजार सुरू करण्यासाठी भाजीपाला व कांदा - बटाट्याचा व्यापार करण्याची वेळ ही सकाळी ८ते १२ च्या ऐवजी रात्री ९ ते दुपारी १२ अशी वेळ द्यावी की ज्यामुळे मार्केटयार्ड मधील फळे, भाजीपाला, व कांदा-बटाटा विभागातील व्यापार सुलभ होईल, अशी मागणी बाजार समिती प्रशासनाकडून करण्यात आली होती. परंतु याबाबत जिल्हाधिकारी महानगरपालिका आयुक्त यांच्याकडून सायंकाळी 5 वाजेपर्यंत वेळ वाढून देण्यासंदर्भात कोणताही निर्णय झाला नाही.प्रशासनाकडून कुठलाही प्रतिसाद मिळाल्याने रविवारी भाजीपाला व फळे, कांदा व बटाटा व्यापार सुरू राहणार नसल्याचे आडते असोसिएशनच्या वतीने स्पष्ट करण्यात आले.गुलटेकडी मार्केटयार्ड येथील फळे, भाजीपाला, व कांदा- बटाट्याचा व्यापार कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने १३ जुलै ते १८ जुलैपर्यंत पुणे शहरामध्ये संपूर्ण लॉकडाऊन केलेल्याने बंद आहे. त्यानंतर १९ जुलैपासून प्रशासनाने जीवनावश्यक वस्तूंच्या व्यापारामध्ये शिथिलता आणण्याचा निर्णय घेतला होता व यासाठी दिनांक १९ जुलैपासून सकाळी ८ ते १२ या वेळेमध्ये भाजीपाला व आडत व्यवसाय करण्यास मुभा देण्याचा निर्णय घेतला होता. परंतु, शासनाच्या सदर आदेशामध्ये पुणे मार्केटयार्ड मुख्य बाजार आवार व त्याचप्रमाणे उपबाजार याचा कुठेही उल्लेख केलेला नव्हता.यामुळे शुक्रवार ( दि.१७ ) रोजी कृषी उत्पन्न बाजार समितीचे मुख्य प्रशासक बी.जे. देशमुख यांच्याशी आडते असोसिएशनचे अध्यक्ष विलास भुजबळ व पुणे मर्चंट चेंबर चे अध्यक्ष पोपट ओसवाल संपर्क साधला होता. त्यानुसार बी.जे. देशमुख पुण्याचे जिल्हाधिकारी व पुणे महानगरपालिकेचे आयुक्त यांना पत्र लिहून फळे, भाजीपाला व कांदा - बटाट्याचा व्यापार करणेची वेळ ही सकाळी ८ ते १२ च्या ऐवजी रात्री ९ ते दुपारी १२ अशी वेळ द्यावी की ज्यामुळे मार्केटयार्ड मधील फळे, भाजीपाला, व कांदा-बटाटा विभागातील व्यापार सुलभ होईल.परंतु, शनिवारी सायंकाळ पर्यंत जिल्हाधिकारी व महानगरपालिका यांच्याकडून याबाबत कोणतेही उत्तर अथवा स्षष्ट आदेश आले नाही. यामुळे प्रशासनाचे पुढील आदेश येईपर्यंत फळे भाजीपाला व कांदा-बटाटा विभागातील सर्व व्यवहार बंद राहणार असल्याचे विलास भुजबळ यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :PuneपुणेMarket Yardमार्केट यार्डvegetableभाज्याfruitsफळेcollectorजिल्हाधिकारीcommissionerआयुक्त