शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
3
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
4
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
5
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
6
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
7
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
8
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
9
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
10
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
11
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
12
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
13
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
14
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
15
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
16
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
17
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
18
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
19
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
20
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात

Corona virus : सावधान ! सोशल मीडियावर कोरोनाविषयी चुकीची माहिती पसरविणाऱ्यांविरोधात कारवाईला सुरुवात 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2020 17:59 IST

सातारा व सांगली येथे कारवाई करण्यास सुरुवात

ठळक मुद्देपुण्यातील 170 लोक जे महिन्याभरात भारताबाहेर गेले आणि आले त्यांच्यावर लक्ष यात्रा आणि गर्दीच्या ठिकाणी लोकांनी जाऊ नये

पुणे : गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियाव्दारे चुकीच्या अफवा व माहिती पसरवली जात आहे. तसेच दुबईहून पुण्यात आलेल्या विमान प्रवाशांची यादी देखील काही दिवसांपूर्वी फिरत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली होती. याविरोधात कडक कारवाई करण्याचे निर्देश विभागीय आयुक्त व जिल्हा प्रशासनाने दिली होती. त्याप्रमाणे सातारा व सांगली येथे कारवाई करण्यास सुरुवात करण्यात आलेली नाही. त्यामुळे यापुढील काळात ही कारवाई आणखी कडक पध्दतीने करण्यात येणार असल्याची माहिती पुणे जिल्हा विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली. पुण्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते.या पत्रकार परिषदेला जिल्हाधिकारी नवल किशोर राम, निवासी जिल्हाधिकारी जयश्री कटारे उपस्थित होते. म्हैसेकर म्हणाले, सोशल मीडियावर चुकीची माहिती टाकलयाप्रकरणी दोन केसवर काम सुरू केले आहे. यात सातारा व सांगली येथे सोशल मीडियावर चुकीची माहिती व अफवा पसरविणाऱ्यांच्या विरोधात कारवाईचा बडगा उगारण्यात सुरुवात झाली आहे.अशा लोकांना मोकळीक देणार नाही. लोकांनां फसवलं जाणं खपवून घेतलं जाणार नाही.   पुणे वगळता कोल्हापूर 44 , सातारा 9, सांगली 6, सोलापूर 7 इतके परदेशी जाऊन आलेले प्रवासी आहेत. त्यांना घरात विलगीकरण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.  त्यांनी घरतल्यांशी कमीतकमी संपर्क ठेवावा. पुण्यातील 170 लोक जे महिन्याभरात भारताबाहेर गेले आणि आले. त्यांच्यावर लक्ष ठेवले जाईल, तपासणी केली जाईल. संशयित असल्यास विलगीकरण कक्षात ठेवण्यात येईल. तसेच 5 स्टार हॉटेलमध्ये आलेले विदेशी नागरिकही तपासणार आहे. सिनेमागृहबाबत लोकांनी एसी असलेल्या ठिकाणी जाऊ नये.यात्रा आणि गर्दीच्या ठिकाणी लोकांनी जाऊ नये.

जिल्हाधिकारी नवल किशोर राम म्हणाले,  पुण्यातील दहापैकी नऊ केसेस या परदेशी भेट देणाऱ्या नागरिकांच्या आहेत. स्थानिक फक्त एक वाहन चालकाची आहे.भारतीय लोक किंवा जे भारतात आहेत त्यांना संसर्ग होण्याचा धोका कमी आहे. लोकांनी फार घाबरू नये. या ऋतूत खोकला, ताप येऊ शकतो. तो साधा असू शकतो. लोकांनी संभ्रम दूर करावा. पुण्यातील १७० लोक जे महिन्याभरात भारताबाहेर गेले आणि आले. त्यांच्यावर लक्ष ठेवले जाईल, तपासणी केली जाईल. संशयित असल्यास विलगीकरण कक्षात ठेवण्यात येणार आहे. ५ स्टार हॉटेलमध्ये आलेले विदेशी नागरिकही तपासणार. सिनेमागृह बाबत लोकांनी एसी असलेल्या ठिकाणी जाऊ नये.यात्रा आणि गर्दीच्या ठिकाणी लोकांनी जाऊ नये.

टॅग्स :PuneपुणेSatara areaसातारा परिसरSangliसांगलीCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसSocial Mediaसोशल मीडियाNavalkishor Ramनवलकिशोर राम