शहरं
Join us  
Trending Stories
1
बाळासाहेबांच्या खोलीतील कधीही न ऐकलेला गौप्यस्फोट; देवेंद्र फडणवीस म्हणाले...
2
६० नातेवाईक मिळून देवदर्शनाला गेलेले, बसला पहाटे भीषण आग, ८ जणांचा मृत्यू, २४ गंभीर
3
चिमुकल्याचा मृतदेह, रहस्यमय चिठ्ठी अन् 'ते' ७ शब्द; तांत्रिकाच्या मदतीनं अघोरी डाव?
4
किर्गिस्तानमध्ये स्थानिकांचा भारतीय, पाकिस्तानी विद्यार्थ्यांविरोधात हिंसाचार; तीन विद्यार्थ्यांची हत्या
5
Infosys नं वाढवली ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची संपत्ती; पत्नीनंही केली मोठी कमाई, जाणून घ्या
6
तिकडे मोदींची सभा, इकडे ठाकरे गटाचा मिहीर कोटेचांच्या कार्यालयात जोरदार राडा
7
मद्य धोरण प्रकरणात ‘आप’देखील आरोपी; ईडीने दाखल केले नवे आरोपपत्र, इतिहासातील पहिलीच घटना
8
सोढीने केला संसार त्याग?; 25 दिवसानंतर गुरुचरण सिंगची घरवापसी, दिली पहिली प्रतिक्रिया
9
आजचे राशीभविष्य १८ मे २०२४; जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्तीसाठी चांगला दिवस
10
तुमच्या हातात विकसित भारत सोपवूनच जाईन, मुंबईला धक्का लागू देणार नाही: PM नरेंद्र मोदी
11
महागाई, बेरोजगारी, खोटेपणा हीच मोदी यांची गॅरंटी: खरगे, २ कोटी रोजगारांवरुन चढवला हल्लाबोल
12
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही: सोनिया गांधी
13
सच्चा शिवसैनिक काँग्रेसला मतदान करणार नाही, आमच्याकडे खरी शिवसेना: CM एकनाथ शिंदे
14
अतिरेकी हल्ल्यातील शहिदांचा अपमान करणाऱ्यांना जागा दाखवा: देवेंद्र फडणवीस
15
नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार, त्यांच्याकडून महाराष्ट्राच्या अपेक्षा: राज ठाकरे 
16
तिकडे सगळे गद्दार, नकली, भाडोत्री लोक... इकडे सगळे असली आहेत; उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल
17
हीच भटकती आत्मा तुम्हाला सत्तेबाहेर बसवेल हे नक्की; शरद पवारांची सडकून टीका
18
आम्हाला जेलमध्ये पाहायचे नसेल तर इंडिया आघाडीच्या उमेदवारांना विजयी करा: अरविंद केजरीवाल
19
महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण, आमच्यासोबत आले आहेत राज ठाकरे: रामदास आठवले
20
मतदानाची आकडेवारी प्रसिद्ध करण्यात अडचण काय? सर्वोच्च न्यायालयाचा निवडणूक आयोगाला सवाल

Corona virus : अँटिजन टेस्टमुळे ससून रुग्णालयाचा ताण झाला कमी, पुण्यात आत्तापर्यंत ६९ हजार ५७५ टेस्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2020 11:12 AM

संशयित रुग्णांचे ५० बेड कोरोना रुग्णांसाठी झाले रिकामे

ठळक मुद्देपुण्यात गेल्या काही दिवसांपासून अँटिजन टेस्ट करण्यास सुरुवात

पुणे : अँटिजन टेस्टमुळे ससून रुग्णालयाचा ताण काही प्रमाणात कमी झाला आहे.अँटिजन टेस्टचा निष्कर्ष १०-१५ मिनिटात कळत असल्याने ससून रुग्णालयात कोरोना संशयित रुग्णांसाठी राखीव ठेवलेले बेडस् आता कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांना वापरासाठी उपलब्ध झाले असल्याची माहिती ससून रुग्णालयाचे समन्वयक एस. चोक्कलिंगम यांनी दिली. पुण्यात गेल्या दिवसांपासून कोरोनाची अँटिजन टेस्ट करण्यास सुरुवात झाली. सध्या हे प्रमाण चांगलेच वाढले असून, सध्या पुणे शहर आणि ग्रामीण भागात देखील अँटिजन टेस्टची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. अँटिजन टेस्टचा निष्कर्ष त्वरीत म्हणजे १०-१५ मिनिटांत उपलब्ध होतो.तर रिअल-टाइम रिव्हर्स ट्रान्सक्रिप्शन पॉलिमेरेज चेन रिएक्शन (rRT-PCR) या टेस्टचे निष्कर्ष येण्यासाठी किमान २४ तास लागत आहेत. यामुळे आतापर्यंत ससून रुग्णालयात कोरोना संशयीत अथवा इतर आजारासाठी दाखल होणाऱ्या पण काही प्रमाणात कोरोनाची लक्षणे असलेल्या रुग्णांना ओपीडीतून कोरोना संशयित रुग्णांसाठी राखीव ठेवण्यात ५० बेडस् च्या वाॅर्डमध्ये पाठवले जात. त्यानंतर अशा सर्व रुग्णांचे स्वॅब घेऊन तपासणीसाठी लॅबमध्ये पाठवले जात. परंतु स्वॅबचा रिपोर्ट येण्यासाठी किमान एक दिवसाचा कालावधी जात होता. यामुळे रिपोर्ट आल्यानंतर संबंधित रुग्णाला कोरोना अथवा अन्य विभागात शिफ्ट केले जात होते. परंतु आता अँटिजन टेस्टचा पर्याय उपलब्ध झाल्याने येणाऱ्या सर्व रुग्णांची अँटिजन टेस्ट करुन पाॅझिटिव्ह येणाऱ्या रुग्णाला थेट कोरोना विभागात शिफ्ट केले जात असल्याचे चोक्कलिंगम यांनी सांगितले.------पुण्यात आता पर्यंत ६९ हजार ५७५ अँटिजन टेस्ट गेल्या काही दिवसांत पुण्यात अँटिजन टेस्ट करण्याचे प्रमाण चांगलेच वाढले आहे. यात एखाद्या सरकारी अथवा खासगी आस्थापनामध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्यानंतर त्वरीत अन्य सर्व कर्मचाऱ्यांची अँटिजन टेस्ट करण्याचा कल वाढत आहे. यामुळेच आतापर्यंत पुणे जिल्ह्यात ६९ हजार ५७५ लोकांनी अँटिजन टेस्ट करुन घेतल्या आहेत. यात सर्वाधिक ४२ हजार १२७ पुणे शहर, २३ हजार पिंपरी-चिंचवड आणि ग्रामीण भागात ३ हजार ७४५ लोकांनी ही चाचणी केली आहे.

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाsasoon hospitalससून हॉस्पिटलCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस