Corona virus : बारामती शहरात दुसरा रुग्ण ; भाजीविक्रेत्यास झाला कोरोना संसर्ग
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2020 20:12 IST2020-04-06T20:11:29+5:302020-04-06T20:12:30+5:30
शहरातील श्रीरामनगर परिसरात २९ मार्च रोजी पहिला रुग्ण सापडला आहे. त्याच्यावर नायडु रुग्णालयात उपचार सुरु आहे

Corona virus : बारामती शहरात दुसरा रुग्ण ; भाजीविक्रेत्यास झाला कोरोना संसर्ग
बारामती : बारामती शहरात आणखी एकास कोरोना व्हायरसचा संसर्ग झाल्याचे सिद्ध झाले आहे. शहरात सापडलेला हा दुसरा रुग्ण आहे .तो रुग्ण समर्थनगर बारामती येथील असून त्यांच्या कुटुंबाचा भाजीपाला विकण्याचा व्यवसाय आहे.त्यामुळे अनेक लोकांना बाधा होण्याची शक्यता प्रशासनाने व्यक्त केली आहे.प्रशासनाने समर्थ नगर हे केंद्र (सेंटर) धरुन ३ किमी परिसरात क्वारंटाइन झोन म्हणुन व तेच केंद्र धरुन ५ किमी परिसर बफर झोन म्हणून घोषित केले आहे.त्या क्षेत्रात सर्व प्रकारची वाहतूक नियंत्रित करण्यात येत आहे. अत्यावश्यक सेवा यांना यातुन वगळले आहे. हे आलेले संकट लक्षात घेता नागरिकांनी अत्यावश्यक सेवेशिवाय कोणीही बाहेर पडू नये. क्वारंटाइन झोनच्या प्रत्येक मुख्य रस्त्यावर चौकीची व्यवस्था करण्यात आली आहे. तेथुनसर्व वाहने तपासणी करुन सोडण्यात येतील.तसेच त्या भागात आरोग्य विभागामार्फत सर्व्हे केला आहे,असे प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांनी सांगितले.
दरम्यान,शहरातील श्रीरामनगर परिसरात २९ मार्च रोजी पहिला रुग्ण सापडलाआहे.तो रिक्षाचालक असुन त्याच्यावर नायडु रुग्णालयात उपचार सुरुआहे.त्याच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होत आहे. सोमवारी सापडलेल्या दुसऱ्या रुग्णावर नायडु रुग्णालयात तातडीने उपचार सुरु करण्यात आले आहेत.
———————————