शहरं
Join us  
Trending Stories
1
सामंतांनी मदत केली तर... रत्नागिरी-सिंधुदूर्गात राणे - ठाकरे संघर्षाचा सामना; बालेकिल्ला कोणाचा याचाही फैसला
2
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
3
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
4
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
5
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
6
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
7
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
8
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
9
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
10
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
11
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
12
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
13
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
14
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
15
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
16
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
17
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
18
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
19
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
20
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका

Corona virus: वय ७४ वर्षे...हृदयरोगासह फुफ्फुसाचा आजार, तब्बल २८ दिवस कडवी झुंज अन् कोरोनावर यशस्वी मात

By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2020 9:29 PM

चौदा दिवसांच्या तपासणीनंतरही त्यांना कोरोनाचा विळखा कायम होता. पण त्यानंतरही त्यांनी हार मानली नाही..

ठळक मुद्देससून रुग्णालयातून ''या'' कोरोना वॉरियर्सला गुरूवारी यशस्वी उपचारानंतर सोडले घरी ससून रुग्णालयातील तीन परिचारिकाही कोरोनामुक्त

पुणे : वय ७४ वर्षे... हृदयरोगासह फुफ्फुसाचा आजार... त्यातच कोरोना विषाणुचा विळखा... सर्वकाही त्यांच्या जगण्याच्या आशेच्या आड येणारे... पण ते हरले नाहीत. तब्बल २८ दिवस त्यांनी कोरोनाच्या विळख्यातून बाहेर पडण्यासाठी झुंज दिली. चौदा दिवसांच्या तपासणीनंतरही त्यांना कोरोनाचा विळखा कायम होता. पण त्यानंतरही त्यांनी हार न मानता हा लढा २८ दिवसांनी जिंकला. ससून रुग्णालयातून या कोरोना वॉरियर्सला गुरूवारी (दि. ३०) यशस्वी उपचारानंतर घरी सोडण्यात आले. तसेच बुधवारी एका गर्भवती महिलेला कोरोनामुक्त झाल्यानंतर घरी पाठविण्यात आले.ससून रुग्णालयातून गुरूवारी एकुण आठ जणांना घरी सोडण्यात आले. त्यामध्ये पाच पुरूषांचा समावेश आहे. मंगळवार पेठेतील ७४ वर्षीय व्यक्तीला ससूनमध्ये दि. २ एप्रिल रोजी दाखल करण्यात आले होते. ते दाखल झाले त्याचदिवशी अत्यवस्थ होते. त्यांना आधीपासून हृदयरोग व फुफ्फुसाचा जुनाट आजार होता. उच्च रक्तदाबाचाही त्रास होता. त्यामुळे त्यांना लगेच अतिदक्षता विभागात हलविण्यात आले. कोरोनाची लक्षणे असल्याने त्यांना नमुना तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आला. या तपासणीत त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. त्यातच अन्य आजारही असल्याने त्यांची विशेष काळजी घेण्यात येत होती. पण या आजारांमुळे त्यांचा कोरोना संसर्ग कमी झाला नाही. चौदा दिवसांच्या तपासणीत त्यांचा संसर्ग कायम असल्याचे दिसून आले. पण त्यानंतर त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत गेली. अखेर काही दिवसांपुर्वी प्रयोगशाळेच्या अंतिम अहवालात ते कोरोनामुक्त झाल्याचे दिसून आले. त्यामुळे प्रकृती स्थिर झाल्यानंतर गुरूवारी त्यांना घरी सोडण्यात आले.गुरूवारी घरी सोडण्यात आलेले आणखी दोन रुग्णांची प्रकृती दाखल झाले तेव्हा अत्यवस्थ होती. त्यामध्ये येरवडा येथील ५४ वर्षीय व घोरपडी येथील ४० वर्षीय पुरूषाचा समावेश आहे. दोघांनाही उच्च रक्तदाबाचा त्रास होता. ते अनुक्रमे १० व ४ एप्रिलला दाखल झाले होते. त्यांची प्रकृती स्थिर झाल्यानंतर घरी सोडण्यात आले. तसेच पर्वती येथील ६० वर्षीय व चिंचवड येथील ३८ वर्षीय व्यक्तीही कोरोनामुक्त होऊन घरी परतले. बुधवारी सायंकाळी एका ३१ आठवड्यांची गर्भवती महिलेलाही घरी सोडण्यात आले. ती मार्केटयार्ड भागातील असून २५ वर्षे वय आहे. रुग्णालयात दाखल जाली तेव्हा तिची प्रकृती स्थिर होती.------------तीन परिचारिका कोरोनामुक्त..ससून रुग्णालयातील तीन परिचारिकाही कोरोनामुक्त झाल्या असून त्यांना गुरूवारी घरी सोडण्यात आले.  या तिघीही ससून रुग्णालयाच्या  जुन्या इमारतीत कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करत होत्या. या दरम्यानच त्यांना कोरोनाचा विषाणुचा संसर्ग झाला होता. त्यांच्यावर ससून मधील कोविड रुग्णालयात उपचार सुरू होते. तिघींनाही सौम्य स्वरूपाची लक्षणे होती. दोन परिचारिका ३१ वर्षीय असून आकुर्डी व आळंदी येथील आहेत. तर एक ४७ वर्षीय परिचारिका लोहगाव येथील आहे.

 

टॅग्स :Puneपुणेsasoon hospitalससून हॉस्पिटलCoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्याdoctorडॉक्टर