शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वाती मालीवाल यांच्या तक्रारीनंतर पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये, विभव कुमार यांच्याविरोधात FIR दाखल
2
IPL 2024, QUALIFIER 1 च्या एका जागेसाठी तिरंगी लढत; SRH, RR, CSK यांच्यात मजेशीर चुरस
3
खासदारांच्या दिलदार शत्रूनेच चंद्रहार पाटील यांचा घात केला - विशाल पाटील
4
SRH vs GT सामन्यात पाऊस आला धावून, २ संघ गेले वाहून! आता प्ले ऑफचे एकच स्थान शिल्लक
5
स्वाती मालीवाल यांनी दिली लेखी तक्रार, गैरवर्तनप्रकरणी दिल्ली पोलीस करणार चौकशी 
6
पंतप्रधान मोदी किती जागा जिंकणार? चीननंतर आता पाकिस्तानातूनही आला आकडा! तुम्हीही जाणून घ्या
7
लोणारच्या दैत्यसुदन मंदिरामध्ये सूर्यकिरणांचा अभिषेक!
8
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे याला अटक; दोन दिवसांपासून सुरु होता शोध
9
मी फडणवीसांवर काहीच बोलणार नाही, कारण...; उद्धव ठाकरेंनी केली घणाघाती टीका
10
अमेठीतून गेले आता रायबरेलीतूनही जाणार खटा-खट-खटा-खट, पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल
11
विकेंडला तीन दिवस 'ड्राय डे' राहणार! मद्यप्रेमींना घसा ओला करणे आव्हान 
12
धक्कादायक! प्रॉपर्टीच्या वादातून नायजेरियात मशिदीत बॉम्बस्फोट; आठ जणांचा मृत्यू, १६ जखमी
13
'संपूर्ण जगाला विश्वास, भारतात BJP चे सरकार स्थापन होणार', PM मोदींचा विरोधकांवर निशाणा
14
Mahindra XUV 3XO चा रेकॉर्ड, अवघ्या एका तासात 50000 बुकिंग!
15
तू काय नवीन नाहीस! गौतम गंभीरचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी संजू सॅमसनला सज्जड दम 
16
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
17
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
18
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
19
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
20
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान

Corona virus : पुणे शहरातील कोरोनाबाधित रुग्णांमध्ये ९९ ची भर; बरे झालेले ६१ रुग्ण घरी 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 08, 2020 10:30 PM

शहरात एकूण रूग्णांची संख्या २ हजार २४५

ठळक मुद्देएकूण ७६ रुग्ण अत्यवस्थ तर १२ रुग्णांचा मृत्यू

पुणे : पुणे शहरातील कोरोनाबाधितांचा आकडा वाढला असून शुक्रवारी दिवसभरात ९९ नवीन रूग्णांची भर पडली. शहरात एकूण रूग्णांची संख्या २ हजार २४५ झाली आहे. दिवसभरात एकूण १२ रुग्णांचा मृत्यू झाला असून कोरोनावर मात करीत पूर्णपणे बरे झालेल्या ६१ रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. विविध रुग्णालयांमध्ये उपचार घेत असलेले एकूण ७६ रुग्ण अत्यवस्थ असल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.  शुक्रवारी रात्री साडे आठपर्यंत शहरात नव्याने नोंद करण्यात आलेल्या ९९ पॉझिटिव्ह रूग्णांपैकी ससून रूग्णालयात ०९, नायडू रुग्णालयात ६९ तर खासगी रुग्णालयांमध्ये २१ रुग्ण दाखल झाले आहेत. शहरातील उपचार घेत असलेल्या रुग्णांपैकी ७६ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. यातील १२ रुग्ण व्हेंटिलेटरवर असून ६४ रुग्ण आयसीयूत उपचार घेत आहेत. शहरात शुक्रवारी १२ मृतांची नोंद करण्यात आली. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या १३७ झाली असून यामध्ये ग्रामीण हद्दीतील एका मृताचा समावेश आहे. दिवसभरात एकूण ६१ रुग्ण आजारातून बरे झाल्याने घरी सोडण्यात आले आहेत. यामध्ये नायडू रुग्णालयातील ४३, ससूनमधील ८ तर  खासगी रुग्णालयांमधील १० रुग्णांचा समावेश आहे. आजारातून बरे झालेल्यांची एकूण संख्या ७३२ झाली आहे. तर एक्टिव्ह रूग्णांची संख्या १ हजार ३७७ झाली आहे.-------------दिवसभरात विविध केंद्रांवर एकूण १ हजार ६४२ नागरिकांची स्वाब तपासणी करण्यात आली असून आतापर्यंत २० हजार २७० रूग्णांची तपासणी करण्यात आली आहे. एकूण एक्टिव्ह रूग्णांपैकी पालिकेच्या दवाखान्यांमध्ये ९८२, ससून रुग्णालयात १२१ आणि खासगी रुग्णालयांमध्ये २७४ रुग्ण उपचार घेत आहेत.

टॅग्स :PuneपुणेCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसhospitalहॉस्पिटलdoctorडॉक्टर