शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
2
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
3
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
4
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
5
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
6
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
7
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
8
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
9
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
10
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
11
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
12
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
13
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
14
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
15
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
16
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
17
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
18
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
19
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
20
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल

Corona virus : पुणे विभागात ८९० कोरोना बाधित रुग्ण; ११५ रुग्ण बरे होऊन घरी परतले : डॉ.दीपक म्हैसेकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2020 21:53 IST

पुणे औद्योगिक क्षेत्रात उद्योजकांना कुठलीच सवलत नाही...

ठळक मुद्देफक्त मेडीसीन, एलपीजी यासारख्या अत्यावश्यक सेवा आहे त्याच सुरू आजपर्यंत विभागामधील ४४ लाख ५ हजार ३६९ घरांचे सर्वेक्षण पूर्ण

पुणे: पुणे विभागातील ५ जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या आता ८९० झाली आहे. विभागात ११५ कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. अ‍ॅक्टीव रुग्ण ७१७ आहेत. विभागात आतापर्यंत कोरोनाबाधीत एकुण ५८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. २० रुग्ण गंभीर स्थितीत आहेत. उर्वरीत रूग्ण निरीक्षणाखाली असून त्यांच्यावर औषधोपचार सुरू आहेत, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिली.

पुणे जिल्हयातील बाधित रूग्णांची संख्या ८१३ आहे.५३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सातारा - १६ बाधित, मृत्यू - २

सोलापूर - २५ बाधित, मृत्यू - २

सांगली - २७ बाधित, मृत्यू - १ 

कोल्हापूर - ९ बाधित. 

आजपर्यंत विभागामध्ये एकूण १० हजार ३७ नमूने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यातील ९ हजार ५११ चा अहवाल मिळाला. त्यातील ८ हजार ५७३ नमून्यांचा अहवाल निगेटीव्ह आहे. ८९० चा अहवाल पॉझिटिव्ह आहे.आजपर्यंत विभागामधील ४४ लाख ५ हजार ३६९ घरांचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले आहे. त्यात १ कोटी ६७ लाख ७७ हजार ६४९ जणांची तपासणी झाली. त्यापैकी ८२८ जणांना अधिक तपासणीसाठी सुचित करण्यात आले आहे.

...........

पुणे औद्योगिक क्षेत्रात उद्योजकांना कुठलीच सवलत नाही   राज्य सरकारने कोरोना लॉकडाऊन मधून काही क्षेत्रातील ऊद्योगांना दिलेली सवलत पुणे महानगर क्षेत्रात मात्र नाकारण्यात आली आहे.  कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रार्दुभावामुळे हा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे पुणे, पिंपरी-चिंचवड,पुणे ग्रामीण तसेच एमआयडीसी  क्षेत्रामधील सर्व ऊद्योगांची स्थिती आता आहे तशीच राहील. विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी ही माहिती दिली. 

या क्षेत्रामध्ये फक्त मेडीसीन, एलपीजी यासारख्या अत्यावश्यक  सेवां, ज्यांना १७ एप्रिल पूर्वी परवानगी देण्यात आली आहे त्याच सेवा सुरू राहतील. या उद्योगांच्या व्यवस्थापनानेही त्यांच्या कामगारांना लॉकडाऊनच्या कालवधीमध्ये उद्योगाच्या ठिकाणीच निवासाची व्यवस्था करणे आवश्यक आहे. त्यांच्या कामगारांना कोणत्याही परिस्थितीमध्ये इतर ठिकाणी कुठेही जाण्याची परवानगी दिली जाणार नाही 

टॅग्स :PuneपुणेCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसhospitalहॉस्पिटलdoctorडॉक्टरbusinessव्यवसाय